Friday, December 24, 2010

ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे

ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे
आणि या मातीतुनी चैतन्य गावे
कोणती पुण्ये येती अशी फळाला
जोंधळ्याला चांदणे लखडून जावे

ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे
आणि माझ्या पापणीला पुर यावे
पाहता ऋतुगंध कांती सांडलेली
पाखरांशी खेळ मी मांडून गावे

गुंतलेले प्राण ह्या रानात माझे
फाटकी ही झोपडी काळीज माझे
मी असा आनंदुनी बेहोष होता
शब्दगंधे, तू मला बाहूंत घ्यावे!

-- ना. धों. महानोर

Thursday, December 23, 2010

माझीया देशातले पंछी

त्या माझीया देशातले पंछी निळे जांभळे
हे मोकळे आकाश दाट वेटाळून चालले ।।

घाटातल्या वळनातली कौलार खेडी जुनी
मिरगामधी बरसातीला मल्हार गाती कुणी
पिकलेपणी तांबेवरी स्वर कोकीळेचा गळा
हळूवार त्या कंठातला रानावनाला लळा ।।

केळीतल्या दांडातले पाणी हळू वाहते
साळीतल्या ओंब्यामध्ये पडसावली हालते
जेष्ठातली चवळी नवी ढवळी फुले माळुनी
पिवळ्या निळ्या पक्षांसवे कानातली बोलणी ।।

ज्वारीतल्या कण्सातला रुजला कसा जारवा
मज वेढतो देशातल्या त्या मातीचा गारवा
तो गारवा मजला हवा.. आकाश पंखातले
या देशीच्या त्या देशीच्या डोळ्यांत ओथंबले ।।

-- ना.धो. मनोहर

रागारागात

रागारागात एखादी नोट
फाडून टाकावी त्याप्रमाणे मला
शेवटचा श्वास घ्यायचा नाही.
खरे तर मला असे...
उडून जायचे आहे की
उचकी देत दवबिंदूने जावे..
फुलाच्या श्वासाची गरज म्हणून
पाकळीवरचा दवबिंदू विरावा..
सकाळ झाली म्हणूनही
दवबिंदूने अलगद निघून जावे..
एखादी कविता म्हणता म्हणता
वृत्त छंदात काहीतरी
कमी असावे तसे..
स्वप्न लिहीता लिहीता
शाईच संपावे तसे..

--- गुलजार.

निकामी

ही निकामी आढ्यता का ? दाद द्या अन्‌ शुद्ध व्हा 
सूर आम्ही चोरतो का ? चोरिता का वाहवा

मैफिलीची साथ आम्हा दैवयोगे लाभली
न्या तुम्ही गाणे घराला फुल किंवा पाकळी 

दाद देणे हे हि गाण्याहून आहे दुर्घट
गुंफणे गजरे दवाचे आणि वायुचे घट

नम्र व्हा अन्‌ सूर जाणा जीवघेणा रंग हा
साजरा उधळून आयु हो करावा संग हा

चांदणे पाण्यातले की वेचिता येईल ही
आणि काळोखात पारा ये धरू चिमटीत ही

ना परंतु सूर कोणा लाविता ये दीपसा
सूर नोहे तीर कंठी लागलेला शापसा


-aarati prabhu.

rasagrahan -bhay ithale sampat nahi


भय इथले संपत नाही..मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो..तू मला शिकविली गीते


या जगात, तु गेल्यावर मी भयभीत झालो आहे, आई तु मला जीवन जगण्यास शिकवलेस पण तरी मला तुझी आता खुप आठवण येते आहे
तु शिकवलेले सगळे मी व्यव्हारात आनतो आहे पन भयामुळे दिवस संपल्यावर.

ते झरे चंद्र सजणांचे, ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया


ते झरे शितल चंद्रप्रमाणे आहेत, ती धरती एक रक्ताची माया देती आहे
तरी तुझ्या विचारांच्या झाडात तुझ्या रुपासहीत मी निजतो पुन्हा तुझ्याच आठवनीत उगवण्यास

त्या वेळी नाजूक भोळ्या, वारयाला हसवून पळती
क्षितीजांचे तोरण घेऊन, दारावर आली भरती


तुझ्या विचारात असताना त्या वेळा कधी निघुन जातात त्या कळत नाहीत
तरी तुला पहाताना(शोधताना) दुरवर क्षितीजांची तोरणे माझ्या मनाच्या दारावर दस्तक देती

तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू राघव शेला


तुझ्ये ते बोल माझे पुर्ण आयुष्य स्पर्शून गेले
माझ्या आयुश्याच्या वनवासात तेच माझे सोबती आहेत
जसे सीतेच्या वनवासातील राघव

देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबूळापाशी, मी उरला सुरला थेंब


देऊळ आहे येथे पलीकडे तरीही तुझ्या आठवणींचा फ़ुटका खांब माझ्यापाशी आहे आणि थरथरत्या डोळ्यात आता आठवणींशिवाय काहीच नाही हा आसवे म्हनशिल तर मीच त्यात एक उरला सुरला थेंब आहे

संध्येतील कमल फ़ुलासम, मी नटलो श्रृंगाराने
देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने


संध्याकाळी मी, तू सांगितल्या प्रमाणे नटतलेलो जगासंगे, सभोवताली आठवनींच्या क्षितीजासोबत निळाईत आकाशाची राने

स्त्रोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख्ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे


स्त्रोत्रात माझी इंद्रिये अवघी का गुनगुनती ही दुख्ख सारी
अग चांदण्या सम शितल स्मरणे तुझी सरता संपत नाहीत


ते धुके अवेळी होते, की परतायची घाई
मेंदुतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई


तू सांगीतल्या प्रमाणे मी जगतो संध्याकाळी अन रात्री
अन पहाटचे ते धुके अवेळी आले की मी भयभीत होउन लवकर परतलो कळतच नाही आणी डोक्यातून ढळते माझ्या निश्पर्ण तुझ्या शिकवलेल्या गितांची राई

भय इथले संपत नाही - ग्रेस


भय इथले संपत नाही...मज तुझी आठवण येते...
मी संध्याकाळी गातो...तू मला शिकविली गीते...

हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया

त्या वेळी नाजूक भोळ्या, वारयाला हसवून पळती
क्षितीजांचे तोरण घेऊन, दारावर आली भरती

तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू राघव शेला

देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबूळापाशी, मी उरला सुरला थेंब

संध्येतील कमल फ़ुलासम, मी नटलो श्रृंगाराने
देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने

स्त्रोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख्ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे

ते धुके अवेळी होते, की परतायची घाई
मेंदुतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई


-ग्रेस

गारव्याची प्रार्थना


फुलात धूळ शोधिता पहाड फोडतो झरा
संधिकाल थांबता शहारते जशी धरा.

भयाण गारव्यातही तुझ्या घरात ये सती
चंद्रिकाच मागते शिवालयात सद्गती...

वृक्षबीज अंगणात ही तुझी न सांगता
मठात वाचणार कोण आज रे तुझी कथा?

तुझे शरीर मंत्रफूल देहधून वैखरी;
शकून पेरणार जी पल्याडच्या निजेवरी...

स्वप्न सांध एकदाच जे उदास जाहले;
वक्षदीप तोलतील स्वस्तिकात पाउले...

सजून पाहतो तुला, तुलाच शब्द जोडतो,
उभ्याउभ्याच संग हा विषण्णतेत फेडतो.

मला स्मरून पाहणार तू तुझेच चांदणे;
मागताच संपते धुळीस धूळ मागणे...

-ग्रेस

क्षितिज जसे दिसते


क्षितिज जसे दिसते
तशी म्हणावी गाणी
देहावरची त्वचा ओंधळी
छिलून घ्यावी कोणी

गाय जशी हम्बरते
तसेच हळवे व्हावे
बुडता बुडता सांजप्रवाही
अलगद भरूनी यावे

-kavi grace

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे ?
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे ?

कशासाठी उतरावे तंबू ठोकून
कोण मेले कोणासाठी रक्त ओकून
जगतात येथे कुणी मनात कुजून
तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे

दीप सारे जाती येथे विरुन विझून
वृक्ष जाती अंधारात गोठून झडून
जीवनाशी घेती पैजा घोकून घोकून
म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे

अंत झाला असता आधी जन्म एक व्याधी
वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी
देई कोण हळी त्याचा पडे बळी आधी
हारापरी हौतात्म्य हे त्याच्या गळी साजे


****आरती प्रभू ****

चहा

मध्यमवर्गापुढे समस्या
हजार असती
परंतु त्यातिल एक भयानक
फार उग्र ती
पिडीत सारे या प्रश्नाने
धसका जीवा
.
.
.
.
.
चहा कपाने प्यावा अथवा
बशीत घ्यावा !

कुसुमाग्रज

चुकली दिशा

चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे
वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे

मी चालतो अखंड चालायाचे म्हणून
धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे

डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे
हे शीड तोडले की अनुकूल सर्व वारे

मग्रूर प्राक्तनांचा मी फाडला नकाशा
विझले तिथेच सारे ते मागचे ईशारे

चुकली दिशा तरीही आकाश एक आहे
हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्यारे

आशा तशी निराशा, हे श्रेय सावधांचे
बेसावधास कैसे डसणार हे निखारे?


कवी - विंदा करंदीकर

सकाळपासून

सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते ! तेच ते !!
माकडछाप दंतमंजन,
तोच चहा तेच रंजन
तीच गाणी तेच तराणे,
तेच मूर्ख तेच शहाणे
सकाळपासुन रात्रीपर्यंत
तेच ते तेच ते

खानावळीही बदलून पाहील्या
कारण जीभ बदलणं शक्य नव्हतं.
काकू पासून ताजमहाल,
सगळीकडे सारखेच हाल
नरम मसाला, गरम मसाला,
तोच तो भाजीपाला
तीच ती खवट चटणी,
तेच ते आंबट सार
सुख थोडे दु:ख फार

संसाराच्या वडावर स्वप्नांची वटवाघुळे
त्या स्वप्नाचे शिल्पकार,
कवि थोडे कवडे फार
पडद्यावरच्या भूतचेष्टा;
शिळा शोक, बुळा बोध
नऊ धगे एक रंग,
व्यभिचाराचे सारे ढंग
पुन्हा पुन्हा तेच भोग
आसक्तीचा तोच रोग
तेच ' मंदिर ' तीच ' मूर्ती '
तीच ' फुले ' तीच ' स्फुर्ती '
तेच ओठ तेच डोळे
तेच मुरके तेच चाळे
तोच पलंग तीच नारी
सतार नव्हे एकतारी

करीन म्हटले आत्महत्त्या
रोमिओची आत्महत्त्या
दधीचिची आत्महत्त्या
आत्महत्त्याही तीच ती
आत्मा ही तोच तो
हत्त्याही तीच ती
कारण, जीवनही तेच ते
आणि मरणही तेच ते


विंदा करंदीकर

सातवा..


चमच्यांच्या स्टॅंडवर
सात चमचे होते
एक चमचा एक दिवशी
गहाळ झाला.
उरलेल्या सहांच्या गळ्यातून
प्रथमच
अनावर हंदका फुटला
' ती असती तर ' - ते उद्गारले,
तो हरवला नसता.
मीही अनावरपणे
सातवा चमचा झालो
आणि त्याची रिकामी जागा घेऊन
सहांच्या हंदक्यात
सामील झालो - आणि
पुटपुटलो :
खर आहे, मित्रांनो,
ती असती तर
मी हरवलो नसतो.

-- कुसुमाग्रज.

ओळखलत क सर माला

'ओळखलत क सर माला?' पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.

क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून,
'गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन'.
माहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
'पैसे नकोत सर', जरा एकटेपणा वाटला.
कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिख्लगाळ काढतो आहे ,
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्‍त लढ म्हणा !
.........................................................kusumagraj

दाद


गेलेल्या दिवसांची याद नको!
तो फसव्या स्वप्नांचा नाद नको!

का घालू जगण्याशी व्यर्थ वाद?
मज याही वादाशी वाद नको!

मी उन्हात वणवणेन बेवारस...
मज कुठल्या छायेची साद नको!

मी तुला न प्रश्न 'तो' विचारणार...
उत्तरास मीही मोताद नको!

हा हिशेब दु:खांचा... जुलमांचा
कोणीही यामधून बाद नको!

मी मनात सारे तुज ऐकवीन...
ही आता शब्दांची ब्याद नको!

मी बघतो तुमचे डोळे लबाड -
मज तुमच्या कपटांची दाद नको!

- सुरेश भट

पत्र लिही... पण


पत्र लिही पण नको पाठवू शाई मधूनी काजळ गहिरे
लिपीरेशान्च्या जाळीमधूनी नको पाठवू हसू लाजरे.

चढण लाडकी भूवई मधली नको पाठवू वेलान्टीतून
नको पाठवू तीळ गालीचा पूर्णविरामाच्या बिन्दूतून

शब्दामधूनी नको पाठवू अक्ष्ररामधले अधीरे स्पन्दन
नको पाठवू कागदातूनी स्पर्शामधला कम्प विलक्शण

नको पाठवू वीज सूवासिक उलगडणारी घडीघडीतून
नको पाठवू असे कितीदा सान्गीतले मी , तू हट्टी पण !

पाठवीशी ते सगळे सगळे पहील्या ओळीमधेच मीळ्ते
पत्र त्या नन्तरचे मग वाचायाचे राहून जाते

--- इंदिरा संत ---

मौन

शिणलेल्या झाडापाशी
कोकिळा आली
म्हणाली, गाणं गाऊ का ?
झाड बोललं नाही
कोकिळा उडून गेली.

शिणलेल्या झाडापाशी
सुग्रण आली
म्हणाली, घरटं बांधु का ?
झाड बोललं नाही
सुग्रण निघून गेली.

शिणलेल्या झाडापाशी
चंद्रकोर आली
म्हणाली, जाळीत लपु का ?
झाड बोललं नाही
चंद्रकोर मार्गस्थ झाली.

शिणलेल्या झाडापाशी
बिजली आली
म्हणाली, मिठीत येऊ का ?
झाडाचं मौन सुटलं
अंगाअंगातुन
होकारांच तुफान उठलं.

- - - कुसुमाग्रज (मुक्तायन) - -

Sunday, June 6, 2010

आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही.

अहो ऐकलं का ?
आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!


आम्च्या बाईक च्या मागच्या सीट वर धूळ नेहमीच असते
बसुन बसुन त्यावर एखादा संटा,तर कधी एखादी माशीच बसते
अणी बाईक पूस्ण्याचे आम्ही काधिच श्र म घेत नाही
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!



सीनेमा बघायला आम्ही गॅंग मधे जातो
मस्त एक बास्केट पोपकोर्न तास भ र खातो
अणी बूड्ढि का बाल चा चिक्कट.वाडा काधिच घ्यावासा वाट्त नाही
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!


वीकएंड्ला आऊटींग कर.तो, फ़क्कत मित्रांबरोबर् च घालवतो
काही नाही तर मसऽत झोपा काढ्ड.तो
अणी रात्री बे रात्री काधिच कोणाला SMS करत नाही
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!


आम चे मोबाईल चे बिल फ़ार जास्त येत नाही,
दिवस भरात २-४ कॉल होतात, जे फ़क्कत घरी कींवा मीत्रांना असतात,
अणी आमचा फोन कधीच जास्त एंगएज येत नाही
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!


मीत्रांच्या सगळ्या पल्यान मध्ये आम्ही शामील असतो,
कधीच दूसर्र्यांच्या पल्यान्स मध्ये तोंड घालत नाही,
सुट्टी आम्हाला कधीच एकांतात घालवावीशी वाटत नाही,
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!


लोकांना टाळयायला आम्च्या कडे बाहाने नसतात,
आमचे तर बूवा अड्डे सग्ळ्यांनाच माहीत असतात,
अणी ठ. रल्या वेळेत तिथे जाणे जिवावर आले, तर त्याचा काहीच फ़रक पड्त नाही,
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!


सुट्ट्या अणी एक तारखे शिवाय फ़ार से कॅलेंडर चे महत्व नस.ते,
बाकी लकश्यात ठेवण्या सारखी दोघा-चौघांची बरथडेट असते,
बाकी तारखा लकश्यात ठेवायची आम्हाला गरजच भासत नाही,
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!


आमचे रेस्टॉरंट चे बील्स फ़ार मोठे नसतात,
टपरी वरच्या कॉफ़ीतच जस्त गप्पा रंगतात,
अणी सि.सि. डि त जायची कधी गरजच भासत नाही,
कारण आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!

बघीतलं नां, गर्ल्फ़्रेंड नसल्याचे बरेच फ़ायदे असतात,
तरी साले सगळे गर्ल्फ़्रेंड साठीच रडतात,
सांगा कोणी त्यांना, पांढरे हत्ती. फ़ार कामाचे नाही,
अणी अजून तरी आमचा यावरचा अभीमान गेलेला नाही,
कारण आम्हाला अजून तरी गर्ल्फ़्रेंड नाही...!

पोपटच झाला

रात्र रात्र जागून
खूप अभ्यास केला
बऱ्याच एक्झाममध्ये
साला top हि केला ......
पण एका दिवशी
घडलं आक्रीत ............
प्रेमाच्या एक्झाममध्ये माझा
पुरता पोपटच झाला
बोलू बोलू तिच्याशी
घाबरून दिवस दवडताना
मला आवडणारी मैना
मेला कावळाच घेऊन गेला
आणि मित्रानो.......
प्रेमाच्या एक्झाममध्ये माझा
पुरता पोपटच झाला
पुरता पोपटच झाला .............

मुली

समजून सगळे

नासमज बनतात मुली

चांगल्या चांगल्या मुलांना

वेडयात काढतात या मुली

अनोलखी पुरुषाला

दादा - भैय्या म्हणतात या मुली ,

पण आपल्याच वडलान्ना

काका का म्हणतात या मुली ,

बोलायला गेलो तर

लाइन मारतोय म्हणतात या मुली,

मग नाहीच बोललो की

शाइन मारतोय का म्हणतात या मुली?

मुद्द्याच बोलण थोड़च असत

तरी चिव चिव चिव चिव खुप करतात या मुली,

जेव्हा खरज बोलण्याची गरज असते ....

तेव्हा नजर खाली करून रुमाल का ख़राब करतात या मुली ?

पावसात भिजायच तर असत

तरी चिखल पाहून नाक का मुरडतात मुली ?

थंडी गुलाबीच चांगली अस म्हणतात!!!

मग 2-4 स्वेटर घालून सुद्धा कुडकुडतात का या मुली ??

वाचून ही कविता

चान्ग्ल्याच भडकतिल या मुली !!!!!

मग (कदाचित) विचार करून मनात...

थोड़ तरी बरोबर आहे महणतील या मुली ...

कुणीतरी आठवणं काढतय

कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......

बाकी काही नाही
हसता हसता डोळे अलगद भरुनही येतील
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन
कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......

रस्त्यामध्ये दिसतातच की चेहरे येता-जाता
"एका" सारखेच दिसू लागतील सहज बघता बघता
अवती भोवती सगळीकडे तेच माणूस दिसेल
स्रुष्टीमध्ये दोनच जीव आणखी कुणी नसेल
भिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......

मोबाईल वाजण्याआधीच तो वाजल्य़ासारखा वाटेल
जुनाच काढून एसएमएस वाचावासा वाटेल
दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास
पावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वास
घाबरुनं बिबरुनं जाण्यासारखं काही नाही
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......

जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता
चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडे
बोलण्याआधी आवाजाला सांभाळावे थोडे
सांगुन द्याव काळजीसारख बिलकुल काही नाही

"कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......"

हरवलेला मी

स्वप्नील डोळ्यांची उघडझाप करीत
जेव्हा तू बोलायचीस माझ्याशी
कान माझे चक्क फ़ितुरी करायचे
मात्र डोळे होते प्रामाणिक माझ्याशी

अखंड उत्साही बडबड तुझी
कानावरुन जायची वाहून
पण निरागस आविर्भाव चेहेऱ्यावरचा
न्यायचा माझं मी पण पळवून

"असा काय रे बघतोस हरवल्यासारखा",
तू म्हणायचीस नेहेमी
"अगं, मलाच शोधतोय तुझ्या डोळ्यात
सारखा हरवतो माझा मी"

"तुझं आपलं काहीतरीच"!
तू टिंगल करायचीस माझी
पण ते लाजरं खळीतलं हसू तुझं
खरं खरं बोलायचं माझ्याशी

सूर्याचं अस्ताला घाईघाईनं जाणं
अन् तुझं ते गडबडीनं उठणं
रेंगाळलेली किरणं गोळा करत
माझं उद्याची वाट पहाणं....!

"येते रे", म्हणतानाची तुझी व्याकुळ नजर
ओढाळ पावलं अन् ओली पापण्यांची झालर
पाठमोरी डोळ्यात साठवलेली तू
अन् अजूनही हरवलेला मी
अन् अजूनही हरवलेला मी.......!

तो तिला म्हणाला...

तो तिला म्हणाला "डोळ्यात तुझ्या पाहू दे"

ती म्हणाली "पोळि करपेल, थाम्ब जरा राहू दे"



तो म्हणाला "काय बिघडेल स्वयंपाक नाही केला तर॥"

ती म्हणाली " आई रागावतील, दूध उतू गेल तर॥"



"ठीक आहे मग दुपारी फिरून येवू, खाऊ भेळ"

"पिल्लू येईल शाळेतून, पाणी यायची तीच वेळ"



"बर मग संध्याकाळी आपण दोघेच पिक्चर ला जावू"

"नको आज काकू यायच्यात, सगळेजण घरीच जेवू"



"तुझ्यामुळे गेली माझी चांगली सुट्टी फुकट"

"बघ तुझ्या नादामधे भाजी झाली तिखट"



आता मात्र तो हिरमुसला, केली थोडी धुसफूस

एइकू आली त्याला सुद्धा माजघरातून मुसमुस



सिगरेट पेटवत, एकटाच तो निघून गेला चिडून

डोळे भरून बघत राहिली, ती त्याला खिड़की आडून



दमला भागला दिवस संपला तरी अबोला संपेना

सुरवात नक्की करावी कुठून दोघांनाही कळेना



नीट असलेली चादर त्याने उगीच पुन्हा नीट केली

अमृतांजन ची बाटली तिच्या उशाजवळ ठेवून दिली।



तिनेच शेवटी धीर करून अबोला संपवला

"रागावलास न माझ्यावर?" आणि तो विरघळला।



"थोडासा..." त्याने सुद्धा कबूल केला आपला राग

ती म्हणाली "बाहेर जावून किती सिगरेट्स ओढल्यास सांग"

"माझी सिगरेट जळताना तुझ जळणं आठवल

छोट्या मोठ्या गोष्टींसाठी जीव जाळण आठवल

अपेक्षांच ओझ तू किती सहज पेललस

सगळ्यांच सुख दुःख तळहातावर झेललस...

तुला नाही का वाटत कधी मोकळ मोकळ व्हावसं

झटकून सगळी ओझी पुन्हा तुझ्या जगात जावस?"



"बोललास हेच पुरे झाल...एकच फ़क्त विसरलास...

माप ओलांडून आले होते, मी-तू पण तेव्हाच गळलं

माझ जग तुझ्या जगात तेव्हाच नाही का विरघळलं?"

रेप्लिकेट

आपण नेहमीच दुसर्याला रेप्लिकेट करत असतो,
स्वतःच्या पर्सनॅलिटी मधले दोष काढत असतो,
जे गुण नाहीत ह्याची खंत बाळगत असतो,
आणि जे आहेत त्यांना कधीच वाढ देत नसतो||