Monday, December 26, 2011

अंगणातली रातराणी 
चिंब दहिवरात न्हाली
अन् डोळ्यांत साखळलेल्या रक्ताला 
आज पहिल्यांदाच जराशी ओल आली

वाटलं, तू नाहीस, 
तर तुझा आभास तरी ओंजळीत घ्यावा
आज अंमळ जास्तच 
हा सुवास रेंगाळावा 

झुपका तोडून ओंजळीत घेतला
आणि एक शहारा उठला
तुझ्या केसांचा स्पर्श 
परत एकदा स्मरला..

रातराणी ओंजळीत होती
पण गंध हरवला होता
कागदाच्या फुलांसारखा
एक झुपका समोर होता..

मीही बहुतेक ह्या फुलांसारखाच झालोय
तुझ्यापासून विलग होऊन गंधाला मुकलोय
 
हिरमुसलेली फुलं मला
पाहात होती टक लावून  
मोठ्या मनाने त्यांनी माफ केलं
उधारीचं हसू आणून.....

 
....रसप....
हात सुटल्याचं दु:ख
हात तुटण्याच्या वेदनेपेक्षा कमी नाही

मला असंच थोटं बनून जगायचंय..
मरायचा अधिकारच नाही
कारण दुस-या हातात काही हात आहेत..
तुझ्यासारखं, सोडू शकत नाही

त्यांना पर्वा आहे माझी
काळजी आहे
त्यांनी पाहीलेलं स्वप्न
मीच स्वत: आहे
मला ठेच लागली
तर त्यांच्या डोळ्यात पाणी येतं
कसं दावू त्यांना
हात 'तुटल्या'चं दु:ख?

शब्द न् शब्द बोलायचा
तोलून, मोजून, मापून..
मुकाट आसवांना प्यायचं
उधारीचं हसू आणून….


....रसप....
अधाशी भुंग्यासारखं
सतत हुंगत राहा
म्हणजे तुम्हाला सुख मिळेल
हाच एक उपाय आहे आयुष्यात सुखी होण्याचा

सुख तुमच्याकडे येत नाही..
हुडकून काढावं लागतं
आणि दु:ख..?
कधीच चुकत नाही
बरोब्बर घाला घालतं….

पण तरीही…
आपण आपला शोध सुरूच ठेवायचा
अविरत हुंगत राहायचं..

आणि जे काही थोडंफार मधाळ मिळेल
त्याच्या क्षणैक माधुर्यात
आनंद मानायचा..
.
.
उधारीचं हसू आणून....



....रसप....
हातावरच्या रेषांना काही अदृश्य वळणं असतात
किंवा ती फक्त मायक्रोस्कोपनेच दिसतात
कारण कसं शक्य आहे..
आयुष्य इतकं सरळसोट किंवा एकवळणी असणं?
वर्षानुवर्षांची कहाणी काही इंचांत लिहिणं..?

- विचार करायला लावणारा विचार.
रोजच ढोसतो rum जसं मी
as if there is no tomorrow
धुरांडे सिगरेटचे सुरूच आसते
but she never raises eyebrow
तरी चमचमीत चकना पुरवते
..........उधारीतं हसु आणून

येतो कधी कधी हाले डूले घरी मी
attending wet party with friends
पाहिजे तेव्ह्डी पित जा घरीच मग
no chance of sneering by neighbors
प्रेमाने मलाच समजून सांगते
..........उधारीतं हसु आणून

कधी कधी मलाही कळतात वेदना तिच्या
but I go back to same old "routine "
प्यायच खुप बेधुन्ध अन ऐश करायचं
for bad habits there is no medicine
तडजोड करते संसार अन मुलं बघून
उधारीतं हसु आणून , उधारीतं हसु आणून ......


............oceanheal
हातावरच्या रेषांना काही अदृश्य वळणं असतात
किंवा ती फक्त मायक्रोस्कोपनेच दिसतात
कारण कसं शक्य आहे..
आयुष्य इतकं सरळसोट किंवा एकवळणी असणं?
वर्षानुवर्षांची कहाणी काही इंचांत लिहिणं..?
.
.
- असं मला पूर्वी वाटायचं
की सगळं खोटं असतं
पण आता पटतंय
एखादंच वळण असतं
तेव्हाच सावरायचं असतं
आणि जपून चालायचं असतं
तिथे तोल गेला की..
गडगडत खाली यावं लागतं
मग फक्त झाल्या जखमांना
भरून निघेपर्यंत सहन करायचं..
उधारीचं हसू आणून..

....रसप....
तू ओरबाडलं नाहीस..
तरी ओरखडा उठला
मी अश्रू ढाळले नाहीत
पण हुंदका फुटला

काट्या-काट्यामध्ये फरक आहे
गुलाब आणि बाभळीचा
दु:खा-दु:खामध्ये फरक आहे
आवडीचा-नावडीचा

माझं दु:ख मी जपतो
प्रेम केलंय म्हणून
प्रेमाच्याच बदल्यात मिळालंय…
“अमूल्य ठेव” म्हणून!

आपणच आपले खरे सोबती
मला चुकलंय कळून
हीच जाणीव लपवत असतो…
उधारीचं हसू आणून


....रसप....
मग इच्छा नसतानाही
मुखवटा चढवावा लागतो
झापडं बांधावी लागतात
आणि जन्म घेतो
एक बेमुर्वतखोर स्वभाव
काही केल्या ऐकणार नाही..
ऐकायचंच नाही..!
कुणाचंही.. अगदी स्वत:चंही!
अडूनच बसायचं उदासीन बनण्यासाठी!
काही आवडलं तर हसायचं नाही..
काही नावडलं तर चिडायचं नाही..
कुणी बोलावलं तर ऐकायचं नाही..
कुणी हटकलं तर बधायचंही नाही

कृत्रिम चाल..
त्रोटक संवाद..
शून्य नजर..
आणि खरा चेहरा..?
तो लपवायचा..
उधारीचं हसू आणून….


....रसप....

उधारीचं हसू आणून...


विसरण्याचा प्रयत्न मी किती वेळा केला
तो हिशोब विसरलो..
पण तुला नाही विसरू शकलो
रडण्याचा प्रयत्नही मी किती वेळा केला
वाटलं रडून शांत होईन..
पण रडूच नाही शकलो
मी पुरुष आहे ना..
डोळ्यातल्या विहिरी आटलेल्या असतात
मी मोठा झालोय ना..
आता भावनांना प्रौढत्वाच्या सीमा असतात
कुणास ठाऊक कुणी आखल्या..?
आणि का आखल्या..??
पण कैद होतात माझ्यासारखे..
बोलताही येत नाही..
रडताही येत नाही..
बस.. कुढत बसायचं...
आतल्या आत,
कुणाला ऐकू न येऊ देता
रडत राहायचं
डोळे न भिजवता..
आणि सारं काही विसरण्याचा
केविलवाणा प्रयत्न करायचा
उधारीचं हसू आणून...


....रसप....

एड्स


अनमोल आहे जीवन त्याची नका करू बरबादी
क्षणिक सुखा साठी बाजारी स्त्रीयांच्या लागु नका नादी
भावनेच्या भारात नकलत होऊंन जाईल चुक
मग आयुष्य भर हरउन बसावी लागेल
तहान आणि भूक
संपून जातील अंगातील पेशी नाही उरणार शक्ति
कोणीच नसेल मदतीला ना उपयोगी पडेल भक्ति
रहाव एकरूप आपल्या जोड़ीदाराशि
नका फसउ तिला
हाच तर गोड मंत्र साधू संतांनी
आपणास दिला
सुन्दरशा या जीवनाला अस मातीमोल करू नका
गोड आपल्या जीवनाला अस अर्ध्यावर सोडू नका
तुम्ही जाल मरून पाठच्या लोकांनी काय करायच
" आई , बाबा कधी येणार ग " याच उत्तर त्या निरागस बालकांना कोणी दयायच
तुमच्या पाठी माघे त्यांचे खुप होतील हाल
कोण घालेल त्यांच्या अंगावर मायेची ती शाल
आयुष्य भर शोधत फिरतील आई आणि बाप
कोण फिरवेल पाठीवरून मायेची ती थाप
एक रूप रहा जोड़ीदाराशी एवढच पथ्य पाला
तरच एड्स सारख्या महाभयंकर रोगाला बसु शकेल आला
शब्द :- विनोद आप्पासाहेब शिंदे
कशी आज तू गे उभी पाठमोरी
जशी देवतेची असे सावली
तुझी आज आली छबी या महाली
जशी ती मनाच्या वसे राउळी

तुझा भास होतो जसा भोवताली
तसे श्वास माझे उरी दाटती
जशी रात येई छुप्या पावलांनी
तशी आर्त होते तुझी याद ही

जशी रोहिणी गे नभाच्या किनारी
तशी आज शोभा असे अंगणी
खुळा तोच भुंगा अश्या शामपारी
असावीस तू मोगर्‍याची कळी

तुझी पैंजणे वाजली आज दारी
तशी काळजाची थबकली गती
कसे काय जाणू कसे काय बोलू
असावे तुझे गूज लपले मनी

बेहेरे मकरंद
आज काल मी असते कोठे मलाच मी शोधीते
गाली माझ्या भार्गववेळी खळीच का उमलते

श्वास हरवतो श्वास गवसतो, हीच क्षणाची स्थीती
ह्रदयाची ही कशी वदावी, चुकचुकणारी गती
संध्येपासून रामपारी अभास त्याचा छळे

तना मनातच तोच भिनला श्याम सावळा सखा
अवती भवती चराचरी या पुरून उरला जसा
काय म्हणावे स्पर्शाला त्या, ओस जाळतो कसे

आकाशगंगा नभी वाहते, जशी दुधाची नदी
बरस बरसते अशी रात्रभर भर भरून दुथडी
वाहुन जाते सवे मी त्याच्या विश्वाच्या पलिकडे

बेहेरे मकरंद
वाट काळ्या कुंतलाची वाटते ती पाहताना
पावले धुंदीत वेडी भासली गे चालताना

पावसाने कहर केला अंगणातच झेलताना
सावरावे ते कशाला ओढणीने वाळताना

आरशातच मी बघावे अनवधाने येत जाता
बोलतो तो गूज वेडे काय घडते नाहताना

कवडशातच चांदव्याच्या बिल्वरे का वाजली ती
लाजली तू काय सांगू मोगरा मी माळताना

घास तुजला भरवताना मीच हाती तांबुलाचा
कात तो पडला फिका गे ओठओठी दाबताना

बेहेरे मकरंद
बिलगून चांदण्याला ही रात जागलेली
राधा निळ्याचसाठी होती तशीच वेडी

हातात हात होता, पाशात ते शहारे
ओठात ओठ होते, सवतीस स्थान नव्हते
पुर्वेस तारका ती स्वप्नात दंगलेली

मंदावले जरासे होतेच गार वारे
कानात गुंजलेले त्याचेच नाम सारे
त्याच्या सुरात शोधे कान्हास भावलेली

होती जशीच राधा होती तशीच मीरा
असतो कधी तरी तो तुलसीस लाभलेला
गवसेल आज गोपी वाटेत बैसलेली

बेहेरे मकरंद

आली पहाट आली



आली पहाट आली
वेड्या नशेत आली
श्वासात श्वास त्याचा
रुतवून आज आली- ध्रु

नाते युगायुगांचे
आले कळून तेव्हा
जेव्हा निशा हरवली
क्षितिजावरी धुक्याशी
नेत्रात स्वप्न पाही
तुलसी कृष्ण सख्याची- १

गाणे मना मनाचे
गावे कशास आता
विरला न तो उसासा
काही बकुळ फुलांशी
रोखू मनास माझ्या
की देह सावरू मी- २

हरवू नये कधी ही
हा सूर जीवनाचा
राधा सखाच व्हावा
हा सावळाच माझा
राहील साथ आता
माझ्या भव्य कपाली-३

बेहेरे मकरंद
रोज रोज मी तुलाच आसवात ढाळतो
पापण्यांत चांद तो असाच रोज नाहतो

का उगा तुझीच प्यास
लागते क्षणा क्षणास
सांगतो पुन्हा मनास
यायची कधी न ती उगीच वाट पाहतो

सावलीस आपुल्याचं
घेउनी असा कवेत
एकटाच गात गात
या फुलात चांदण्यात का उगा शहारतो

लोक बोलती मलाच
वेड हे "तुझेच" खास
आस पास हा अभास
शोधतो वृथा तुलाच रात्र रात्र जागतो

बेहेरे मकरंद
सख्या मला सवे तुझ्या कवेत रे फिरायचे
नभात शुक्रचांदणे अजून ही दिसायचे

कशास लाज लाजसी घडी घडीस साजणा
मनात काय माझिया, कळेल का प्रिया तुला
मिठीतले शहार हे धुक्यात रे जपायचे

अजून "श्यामसावळ्या" कुशीत गुंतलास ना
बटेत सोनकेवडा अजून माळलास ना
नको व्रुथा करु उशीर मावळेल चांद रे

तुझ्याच आज अंगणी हरीप्रिया खुणावते
भरून टाक भांग ही हळूच कुंकवात रे
उठेल आसमंत हा जपून कोर श्वास रे

बेहेरे मकरंद

शेजेवरी तुझ्या गे......



शेजेवरी तुझ्या गे सुचावी ही गजल
तू बरस ना अशी की हरावी ही गजल

श्रुंगार तू असा का करावा साजणे
पाहून दर्पणी तुज रुसावी ही गजल

देशील ना प्रिये तू मला माती जिथे
घे काळजी तिथेही उरावी ही गजल

बोलू किती कसे मी, करावे वर्णना
वाटे मलाच माझे रचावी ही गजल

झाले पुरे,सख्या रे जसे तू बोलली
ठरले मनात ओली जपावी ही गजल

बेहेरे मकरंद
हीच का ती झिंगलेली रात आहे
थांब चंद्रा पेंगलेली जाग आहे

आज तो वणवा असा का पेटलेला
ही युगांची धुमसती गे आग आहे

काल तू नटली अशी की मैफिलीला
लोक देती दाद ती "क्या बात आहे"

रोज येती राजनेते भेटण्याला
ही भिकार्‍यांचीच आली साथ आहे

मी सखी अन् तू सखा तो आसमानी
या जीवाची त्या शीवाला साद आहे

त्या नभीच्या चांदण्याचे सुख घेऊ
पांघराया सागराची लाट आहे

मी कधी ना जाळलेला दर्भ साधा
आज गवतानेच केली राख आहे

वेळ वेळी वळवळे तो षंढ काटा
हीच वांझोट्या कलीची प्यास आहे

बेहेरे मकरंद
गुन्हे आज दोघे करूया जरासे
विणू श्वास दोघे मरूया जरासे

कशी सांज गेली कशी रात गेली
पहाटे दवाशी उरूया जरासे

धुक्याचाच शेला, सवे शुक्र तारा
नभाच्या किनारी फिरूया जरासे

तुझा प्रश्न आहे तसा प्रश्न माझा
जबाबास खोट्या फसूया जरासे

हवा ही कशी शेवटी भ्रष्ट झाली
सहारा न दूजा जगूया जरासे

बेहेरे मकरंद
धुक्याची मनी पावले वाजली
सजे साजणाची उरी सावली
निशेच्या महाली उषेचा उखाणा
तशी सावळ्याची बजे बासुरी

बेहेरे मकरंद
रूप तेही खास होते हास्य गाली गूढ होते
चालताना तोल गेला चालणे कमनीय होते

नयन ते करती इशारे होश तो नव्हता तीला ही
देत होती अन् बुलावे जीव घेणे भाव होते

मोकळ्या केसात काळ्या, गुंतलेली वाट होती
नेसलेले वस्त्र ते ही पारदर्शी सर्द होते

माळलेली ती फुले ही लाजली अन् झिंगली ही
ओठ ते नाजूक आणिक गाल लाली लाल होते

काय ललना ती असावी हे तिला माहीत नव्हते
लोक आले शोधुनी की या परीचे गाव कोठे

बेहेरे मकरंद
तुझ्या वागण्यानेच रातीस छळले मला ते
वियोगा तुझ्या साहले मीच सलले मला ते

किती दोष द्यावे जगाला कसे वागण्याचे
मनाचे तसे रूप खोड्याळ दिसले मला ते

मला वाटले मीच मेलो जसे रक्त आले
तुझे का दिसावे उरी श्वास रुतले मला ते

तुझी गे कुडी श्वास ते घेत होती जरासे
किती जिद्द होती तुझी आज कळले मला ते

जगाचीच आहे मक्या वाकडी वाट वेडी
तसा एक साधा असा मीच वळले मला ते

बेहेरे मकरंद
मला वाटले रे छळावे जरासे
कसे श्वास तुटती कळावे जरासे

जसे नाव तू घेतले रे मुक्याने
मुक्यानेच नाते जुळावे जरासे

तुला आज माझी कथा सांगते मी
जरा मी जरा तू रुळावे जरासे

जरी वाकडी वाट ही यौवनाची
तरी त्याच वाटे वळावे जरासे

सख्या माळशी देह आताच राया
जरा थांब "मित्रा" ढळावे जरासे

बेहेरे मकरंद
दवाची फुले अन् सडा चांदण्याचा
कसा स्पर्श सांगू बिलोरी धुक्याचा
सुगंधा जपावे कसे रात राणी
मनी काय आहे कळू दे सख्याच्या

बेहेरे मकरंद
मनात माझ्या सवाल कुठले तुला कळावे
खळीस कुठले गुपित सुटले, मला कळावे

जसे शशी अन् नभी भेटती निशाच राणी
तुझा उसासा रुतुन जाता, कुणा कळावे?

कुणा न कळली तुझी मिळाली असंख्य पत्रे
तुझीच "छाया" मलाच दिसता, उगा कळावे?

तयार झाली अताच माझी चिता जळाया
विलीन झालो कधीच तिजला, जरा कळावे

कसा असावा "मरंद" वेडा खुळा दिवाणा
उशीर माझा "जराच" होता, फुला कळावे

बेहेरे मकरंद
सोडलेला जीव सांगा कोण जाणे काय होतो
पेटलेल्या या शवाचा का वृथा तो दाह होतो
सुटुन जातो तोच साला जो करी कृत्ये पिशाची
भोगण्यासी ह्याच षंढा अन् फुकाचा त्रास होतो

बेहेरे मकरंद
का उगा मी का वृथा मी क्षालनाची शर्थ केली
राजनीतीची पुजा मी अंधभक्ति व्यर्थ केली

मार्ग माझ्या दैवतांचे बदललेले का न कळले
मीच त्यांचे पाय धुण्या ही जवानी खर्च केली

ना कधी हव्यास केला कोणत्याही मी पदांचा
त्या प्रलोभी मर्कटांची सुश्रुशा बिनशर्त केली

होत गेला खेळ माझा, बाहुले बनलो कसा मी
नीच लोकांचीच सेवा मानली उस्फुर्त केली

ना कुठे दिसलास तू ना भेटलासी शेवटाला
ही पुराणे वेद स्तोत्रे मी वृथा गुरुतुल्य केली

बेहेरे मकरंद
तुझ्या रे स्मशानी जगावे कसे
तुझ्या मृत्युभुमी मरावे कसे

उभा तू समोरी जसा आरसा
प्रिया सांग ना मी सजावे कसे

असे चोरशी श्वास का साजणे
मला मीच माझे जपावे कसे 

मला जिंकवायास तू खेळशी
तुझे डाव खोटे हरावे कसे

फुलांच्या बगीचास तू सोडले
स्वत:शी "मरंदा" उरावे कसे

बेहेरे मकरंद
तोच होता आज संगे भावलेला यार माझा
कोण मी उरलो विचारे हरवलेला यार माझा

विखुरलेल्या चांदण्यावर ओस पडले यामिनीचे
ना कळे अर्ध्यावरी का झोपलेला यार माझा

मीच केले लाख होते वार वर्मी पाशवी हो
अन् जनांचा दगड ही तो सोसलेला यार माझा

काल केल्या कान गोष्टी का सख्यानों बावळ्याच्या
नाव घेतानाच दिसला मातलेला यार माझा

आज मी करते वृथा तो शोक माझ्या बोलण्याचा
का तिच्या विळख्यात होता, गमवलेला यार माझा

बेहेरे मकरंद
कसे काय जगतो कसे काय मरतो
कुणी ही कुणाचा कधी कोण नसतो
नसे वेळ थोडा रुकाया जगाला
भवापार नेण्या भुकेलाच जो तो

बेहेरे मकरंद

मकरंद तो दिवाणा


डोळ्यात वाच माझ्या हे गीत भावनांचे
आता हवे कशाला खोटे वृथा बहाणे

कोन्यात बावरूनी पदरास वेढताना
लाजून गेली रंभा तुझिया अशा अदेने

ओठात दात रुतला, नयनात साद आहे
ये ना कवेत माझ्या कळु दे तुझे उसासे

उरला सवाल का तो तुझिया मनात राणी
जपल्या खुणेस आता, वदले तुझ्या बटेने

हळुवार मोगर्‍याची फुलली फुले कशाला
मकरंद तो दिवाणा झुलतो कसा नशेने.....

बेहेरे मकरंद
आता करू कशाला पर्वा तिच्या मनाची
निर्धास्त मी मला तू, सोडून जा कुठे ही
येउन ती स्वत:ने गेली गुन्हा करूनी
श्रुंगार तो तियेचा ऐका तुम्ही समोरी

बेहेरे मकरंद

सकाळी


कळी मोगर्‍याची उमलली सकाळी
उशीरा जराशी, बहरली सकाळी

दवाचा बिछाना सडा चांदण्याचा
कहर काय झाला, उसवली सकाळी

धुक्याच्या हवेचा शहारा निराळा
झुल्यावर नशेच्या बिलगली सकाळी

कशी काय सांगू कशी रात गेली
सखी शेवटाला बहकली सकाळी

जबाबास आता तिच्या काय तोलू
सवालास जपले निसटली सकाळी

बेहेरे मकरंद

नाही कधी कुणाला


चीतेवरी स्वत:च्या जोहार मांडले मी
नाही कधी कुणाला ओलीस ठेवले मी

काटेच रोज होते वाटेवरीच माझ्या
आता गुलाब का हो ते शेवटास माझ्या

नेते असेच काही वागावयास शिकले
त्यांच्या परे बरे ते हिजडे, छिनाल वेश्या

आहे तुझीच जादू झाली कली अताशा
मिथ्यास राजगादी, सत्यास येथ फाशी,

डोळ्यात माझिया तो होता तुझा बिछाना
आव्हान तू दिलेले गेला हरून राजा

बेहेरे मकरंद
आता कशास होती ते भास आरशाला
नाही कळावयाचे ते दु:ख पारध्याला
तुकडे करून गेला बेदर्द मोगरा तो
एकेक आसवांचा जखमी सवाल उरला

बेहेरे मकरंद

मी [हज़ल]


असा मी कसा मी तुम्हा सांगतो मी
रकान्यात बद्नाम ही गाजतो मी

जुगारात मटक्यात माझाच एक्का
तसे राजनीतीतही खेळतो मी

मला वर्ज दारू न बाई कधी ही
तरी साधु संतासवे राहतो मी

जगाचेच होवो किती काय वांदे
कराया भले आपले पाजतो मी

विरोध्यास केले मनानेच जवळी
वरातीत त्यांच्या "असा" नाचतो मी

गुन्हेगार आहे जसा आज मोठा
तुरुंगात जातो सजा भोगतो मी

किती ही असू देत काळेच धंदे
सफेदीस देहावरी घालतो मी

बेहेरे मकरंद
ना उगम उरला ना अंत उरला
मिटला अताशा तो अंश उरला
वारा तिथे तो धुंडाळताहे
जो आसवांनी गिळला कधीचा

बेहेरे मकरंद
ना जात मानतो मी ना पात मानतो मी
नाही कधीच वेडा तो धर्म मानतो मी
ना त्यागले कुणाला न शोषले कुणाला
गर्दीत श्वापदांच्या "तो देव" शोधतो मी

बेहेरे मकरंद

काय झाली ही अवस्था.....


आज तुमचे ध्यान कोठे काय झाली ही अवस्था
होत आहे दोनदा हा साजरा हो जन्म तुमचा

बांधवांच्या मृत्युसाठी का करावी त्याग पदवी
राष्ट्रगीताचीच होते आज का हो पायमल्ली

का दिला तो तिखट दणका इंग्रजांच्या हुकुमतीला
आज नावालाच असतो हार तुमच्या तसबीरीला

सागराला विनवणी ती देशमाते भेटण्याला
का उपेक्षा सोबतीला आज तुमच्या प्राक्तनाला

का लिहावी राज्यघटना, शोषितांसाठीच झटलां
आज ही या जात पाती राजपत्री का उराव्या

आज बापू मार्ग तुमचा राज नेते चघळती हो
बोलती त्याच्याच उलटी भ्रष्ट आहे करणी यांची

का उगा बलिदान केला तो अमोलिक जीव तुमचा
चाड नाही आज उरली देश सारा षंढ झाला

बेहेरे मकरंद

आज कट्टा ओस झाला


आज कट्टा ओस झाला
दोसतीचा जोक झाला

काय केला मी गुन्हा तो
या गळ्याला फास झाला

ये जरा शेजेत माझ्या
या कवेचा पाश झाला

हा तुम्ही यल्गार केला
"मी हजारे" घोष झाला

मी तुझ्या गे साथ होतो
गावकीचा रोष झाला

ही पिढी बरबाद झाली
का नशेचा शौक झाला

"खोपडी आता सटकली"
तरुण हा बेहोष झाला


बेहेरे मकरंद

आतातरी.......


जीवनाला दान थोडे मागायचे आतातरी
रे मना तुझिया कलाने वागायचे आतातरी

ही वजाबाकी नव्याने मोजायची का रे पुन्हा
हे नशीबा मी ठरवले भागायचे आतातरी

काय झाले काल ते हो उगळायचे नाही मला
या जगाला माफ केले, टाळायचे आता तरी

काय सांगू काय होती माझी परी अन् ती कथा
का तिचे मी नाव वेडे काढायचे आतातरी

भोगलेली आपबीती मकरंद मी बोलू कुणा
एकटे मी प्रेत माझे जाळायचे आतातरी

बेहेरे मकरंद

सनम.........


उगाच छेड काढुनी नको असा वळू सनम
मनास चेतवून रे नको असा छळू सनम

अशी कशी निशा सखी नभात तो नसे शशी
तुझ्याविनाच मी तसा झुरे हळू हळू सनम

गुलाब शेज बोचते क्षणा क्षणास टोचते
उरात आग लावुनी नको असा जळू सनम

शपथ दिली तुलाच आज बरस तू जरा जरा
मलाच प्रेम रोग आज लागला कळू सनम

पहाट जाहली पुन्हा, करून टाक रे गुन्हा
सुना सुनाच चांद तो लागला ढळू सनम

बेहेरे नेक्टर
मला सांगना मी तुझा कोण आहे
कसा बोलू गाऊ असा प्रश्न आहे
रंगात येऊन दे दाद रसिका
दवाच्या फुलांची तुला भेट आहे

बेहेरे नेक्टर

दिवस तुझेच हे फुला चुकायचे जरा जरा

दिवस तुझेच हे फुला चुकायचे जरा जरा
वयात या जपुन जपुन भुलायचे जराजरा

वसंत येतसे तसाच जातसे कसा कुठे
स्मरून त्यास एकदा खुलायचे जराजरा

भ्रमर दुष्ट करीत गान रोज रोज मधुर रे
ठरव कसे मनात या झुलायचे जराजरा

तुझाच जन्म जाहला समर्पणास चांगल्या
दगड असो खडक असो फुलायचे जराजरा

असेच जीवनी सदा नमन करी मुखात रे
उन्हात ताप सोसुनी सुकायचे जराजरा

बेहेरे मकरंद

प्यासलेल्या पाकळ्या या......


ठेव जपुनी जीव माझा आणलेल्या मोगर्‍याला
आजच्या वेड्या क्षणाला राखलेल्या मोगर्‍याला

रे सख्या लेवून आले साज कंकण कोर भाळी
घे जरा बाहूत तुझिया भाळलेल्या मोगर्‍याला

वाट झाली गंधवेडी हरवली ती साथ माझ्या
परतलो घेऊन सजणे माळलेल्या मोगर्‍याला

काय बोलू शब्द नुरले धुंद झाले कैफ चढला
स्पर्श रे झाला तुझा तो भारलेल्या मोगर्‍याला

प्यासलेल्या पाकळ्या या आज गे माझ्या उशाला
उंबरा घेईल का या मातलेल्या मोगर्‍याला

बेहेरे नेक्टर

आज आली....


आली तिच्या प्रियावर बरसून आज आली
घनघोर पावसाला भिजवून आज आली

गाली गुलाब दिसले नजरेत गुपित काही
सर्वस्व ते स्वत:चे हरवून आज आली

ओठात दात रुतले केसात हात होता
ओल्या खुळ्या क्षणाला फसवून आज आली

सोडून लाज लज्जा उसवून अंग आली
शेजेस आज कळले बहकून आज आली

केला बहोत गलका बेदर्द या जगाने
"मकरंद जान" माझी कळवून आज आली

बेहेरे नेक्टर
पाट सुकले, रक्त गेले आज वाया पुर्वजांचे
सोकलेले भ्रष्टनेते नासताती नाव तुमचे
मृत झाला देश सारा षंढ झाले लोक सारे
का तुम्ही हातात दिधले माकडांना राज्य सारे

बेहेरे नेक्टर
तू बोललीस काही मिसरा सुचून गेला
तू तान छेडली अन्, मतला सुचून गेला
शेरास काय बाकी, गजलेस पेश केले
मी प्राशले तुला गे श्रोता नशेत गेला

बेहेरे नेक्टर

तुझ्या पावसाळी सख्या मी बरसले

तुझ्या पावसाळी सख्या मी बरसले
तरी कोरडा तू उगा चिंब झाले

कशाला गरजला दिली साद खोटी
जुन्या मोसमाची तुझी शपथ झूठी
सवे चातकाच्या, किती मी असुसले

तुझ्या आज दारी सजावे किती मी
किती वेदना या तुळस ऐकते ती
असा ये तुफानी भिजव रे नशेने

नको येउ आता नको तोडु वचने
कशी मीच माझी ढगा स्वार होते
नभापार जाता तुझे काय माझे

बेहेरे मकरंद

पात डावी लवे, कौल माझ्या मना

पात डावी लवे, कौल माझ्या मना
सजण येणार ना, आज सजले पुन्हा

सुकला नयनातला आसवांचा झरा
वाट बघता तुझी दिवस जाई पुरा
वाळला, माळला गंध ना मोगरा
काय चुकले कुठे काय झाला गुन्हा

याद येता झुले, अंगणी तो झुला
स्वप्न रचली किती काय सांगू तुला
धीर गेला असा चैन नाही मला
सुचवी तो आरसा कोर लावी पुन्हा

प्रेम खाणाखुणा शिकवल्या तू मला
काळजा साजणा जपुन मी ठेवल्या
उधळते त्या प्रिया, तू कुठे हरवला
बरसते मी कशी परत ये तू पुन्हा

बेहेरे मकरंद

तुझेच रोज व्हायचे.......


तुझेच रोज व्हायचे प्रिया असे हळू हळू
नभात भेटती शशी निशा जसे हळू हळू

अता कुठे मला दिसे वसंत रोज पाहुणा
फुले फुलेच शोधती तुला कसे हळू हळू

तुला मिठीत घेउनी नभापल्याड जायचे
न भेटताच चांद तो प्रिया रुसे हळू हळू

गुलाबशेज नाहते कुशीत नाजुकेसवे
मुजोर तो मनी तिच्या सख्या वसे हळू हळू

हळद पावले तुझी घरात आज पाहिली
गजांत योग भासला तुझ्या ठसे हळू हळू

बेहेरे मकरंद

मीच का करू प्रीती.......


मीच का करू प्रीती, एकटा असा वेडा
टाकला अता का तू, घेतला वसा वेडा

ये करू नवे आता, प्रीतकायदे ते गे
पाहू दे जनांना या, आपला ठसा वेडा

सोडले नभाच्या त्या, तू मला किनारी गे
मेघ का रडे आता, तो ढसा ढसा वेडा

भासले कसे माझे, मरण काय बोलावे
मी मिठीत गेलो जेव्हा, तिच्या जसा वेडा

चाळलीस तू माझी, राख ती नव्याने का
आसवात वाहे मी गे, तुझ्या कसा वेडा

बेहेरे मकरंद

आता कशाला हे बहाणे.....


आता बहाणे हे कशाला, जवळ तू येना जरा
वेचून जा ना चांदण्याला माळ गे ताराफुला

का वाट बघतो चांद तो, ती रात येई याद का
दोघांस आहे ओढ अन् मिलनास आता देर का
ही शेज विरहा सोसते, तू साथ ती देशील ना

बोलावयाचे आज ना, सांगावयाचे आज ना
समजेल माझा जीव ही, ह्रद्यातली तव बात ना
ये तू जराशी साजणे तोडून सार्‍या बंधना

केसात काळ्या मी तुझ्या, फसलो कसा रुतलो कसा
ओठी गुलाबी ओठ माझा प्राशतो तव अमृता
दे ना विषाचा घोट ही मरतो सुखे बाहूत या


बेहेरे मकरंद

मीच माझे झोपडे ते वेड्या नशेने थाटले का?

मीच माझे झोपडे ते वेड्या नशेने थाटले का?
क्रुर निर्दय या जगाने वेड्या नशेने तोडले का?

आसवांचा गे सडा मी वाटेवरी तव पाडला हा
आज तू परतून आली पाणी कडांचे आटले का?

सोडुनी तू चालला का हातास राजा परत ये ना
त्या नभीचे मेघ माझ्या नयनात वेडे दाटले का?

देर थोडी जाहली गे भेटावयाला आज तुजला
थांब मृत्यो, बोललो मी, आता अवेळी गाठले का?

हे जगा माझ्याचसाठी थोडा जरासा थांबना रे
जन्म मृत्यू थांबले ना वेड्या भितीने ग्रासले का?

बेहेरे मकरंद

बघता तुझ्या रुपाला.....


तो:- बघता तुझ्या रुपाला आरसा तो भाळला
गगनात सांजतारा आज वेडा लाजला

ती:- अस तू बघू नको लोक ते, रे पाहती
बदनाम मीच झाले, प्रेमचाळा गाजला

तो:- नमकीन तू अशी की, मी असा नादावलो
दिल हा गुलाम झाला हरवलेला भासला

ती:- दिन रात जागते रे चांद तारे पाहते
तन मन तुझेच झाले, देह माझा माळला

तो:- जग हे सुनेच होते, जानही बेजान ही
क्षण क्षण तुझ्याचसाठी जीव माझा जाळला

बेहेरे मकरंद

आला भिजून आला....


आला भिजून आला बरसून आज गेला
ओल्या कवेत माझ्या हरवून आज गेला

विश्वास तो बसेना ठेवू कसा कळेना
मज भावतेस गे तू बरळून आज गेला

प्रीतीत वेड त्याच्या जडले कसे कळेना
राधेस शाम तीचा गवसून आज गेला

कित्येक गूज गोष्टी बोलून आज गेला
मतला, ग.जल व मिसरा सुचवून आज गेला

समजावयास मजला "मौनास" वेळ झाला
आला बसंत आला कळवून आज गेला

बेहेरे मकरंद

अजून का मी वाटेवरी तव रेंगाळतो

अजून का मी वाटेवरी तव रेंगाळतो
मनात माझ्या रूपास तुझिया धुंडाळतो

तुझ्या सुरांचा का भास होतो मजला असा?
कुठे कसाही वेळी अवेळी भंजाळतो

किती किती रडले एकटे ते आभाळ का
कवेत माझ्या तीचा शहारा गंधाळतो

मला अताशा वेडावतो का तो आरसा
कशास तीच्या त्या स्पर्शगंधा सांभाळतो?

मनात आशा तू भेटण्याची घोघावते
नभी कसा त्या वेळेस तारा खंकाळतो

बेहेरे मकरंद

फार झाले


आता जगाचे पुरे वार झाले
सोसावयाचे किती? फार झाले

मल्हार त्याचा असा बरसला की
धुंदीत त्याच्या फिदा "गार" झाले

आदर्श होती इथे रोज आता
मातेस नेते भुई भार झाले

आले किती अन् किती एक गेले
स्वार्थीच माझे कसे यार झाले?

आता न येणे न जाणे पुन्हा ही
नामासवे मी भवा पार झाले

बेहेरे मकरंद

चुकले कशी कळेना....


केली तुजवर प्रीती चुकले कशी कळेना
ओल्या अधीर वेळी हुकले कशी कळेना

सतवायचेच मजला होते जरा जरासे
अवचीत तोच हसला खुलले कशी कळेना

सरल्या निशेस आला भेटावयास वारा
बेभान त्या क्षणाला मुकले कशी कळेना

होते जपावयाचे श्वासात चांद तारे
अवसेस जवळ केले भुलले कशी कळेना

होते झुलावयाचे आणि फुलावयाचे
बहरात यौवनाच्या सुकले कशी कळेना

बेहेरे मकरंद

काय वानू मी तुम्हाला ......


काय वानू मी तुम्हाला त्या परीची ती अदा हो
कोण कुठली, कोण जाणे भासली मजला खुदा हो

रंग तीचे रूप तीचे पाहिले ना मी कधी ही
सोडलेल्या कुंतलावर मीच का झालो फिदा हो

त्या निळ्या नयनातुनी का बोलली वेडी अशी ती
त्या नभातुन अमृताचा बरसला मग तो सडा हो

पाहताना नाहताना ती बघे का दर्पणी त्या
तोच दर्पण मीच व्हावे वाटते मजला सदा हो

तीच आली बोलली ती मी तुझी रे मी तुझी रे
भेट दिधला जीव मजला, ओल झाल्या या कडा हो

बेहेरे मकरंद

चांदण्याची शेज होती....


चांदण्याची शेज होती आज माझ्या सोबतीला
चांद वेडा लुटत होता शेज माझ्या सोबतीला

ती खळी खुलली अशी की स्वर्ग तो दिसला मला रे
रूप होते? काय होता? "ताज" माझ्या सोबतीला

त्या नभाचे चांद तारे आज ते पडले फिके रे
त्या खुदाचे स्वप्न होते "राज' माझ्या सोबतीला

गोड मंजुळ त्या स्वरांनी गूज केले या मनीचे
धुंद वारा धुंद होती गाज माझ्या सोबतीला

सागराच्या साथ होती बहरलेली ती धरा ही
सागराची लाट होती "बाज" माझ्या सोबतीला

बेहेरे मकरंद

सांजवेळी रोज गातो.....

सांजवेळी रोज गातो मीच वेडा मारवा तो
का तुला का शोधतो गे प्रीतवेडा पारवा तो

तू दिलेल्या त्या फुलांचा बहर ना सरला अजूनी
ती मिठी अन् तो शहारा याद करतो गारवा तो

धुंद होते शब्द सारे धुंद होत्या दश दिशा ही
आजही होतो सुगंधी आठवांचा कारवा तो

ही फुले कोमेजली गे काय हे सांगावयाचे
मीच माझ्या आसवांनी भिजवला गे ताटवा तो

शेज आहे, रात आहे, रातराणी वाट पाहे
शोधतो त्याच्या प्रियेला मजसवे गे चांदवा तो

बेहेरे मकरंद

द्यावे कशास आता प्रेमास दाखले ते

द्यावे कशास आता प्रेमास दाखले ते
प्रेमात धुंद होणे प्रेमास प्राशणे ते
जखमा उरातल्या त्या विरुनी कधीच गेल्या
प्रेमात फक्त आता जगणे पुन्हा पुन्हा ते

बेहेरे मकरंद

जीवात जीव आहे


झेलून वार सारे सोशीक जीव आहे
आहे अजून माझा जीवात जीव आहे

नाही अजून गेला वेडे तुझा नशा गे
सोडून जा कितीही गेलाच जीव आहे

होतो तुझ्याच दारी व्यापार रोज खोटा
देवा तुझ्या पुजेला बाजारभाव आहे

लोटून द्या कितीही खाईत ह्याच देशा
घेण्या हिशेब केला, "त्यानेच" डाव आहे

जालीम या जगाला सोडून दे "मक्या" तू
कोन्यात तो मनाच्या घायाळ घाव आहे

बेहेरे मकरंद

डोळ्यात भावना या


डोळ्यात भावना या दिसती अशा पुन्हा का
रडणे कसे कळेना ठरतो असा गुन्हा का

क्रांती करावयाची ठरली अता नव्याने
घेण्या जना निघालो रस्ता रिता सुना का

मी बोलते कमी रे लोका नको सुगावा
नयनात जे उमलले कळणार ते तुला का

स्वातंत्र ते मिळाले, धुळ राख आज झाली
झाले शहीद नेते गेले वृथा सुळा का


नियती कशी जगाची तो भोग दोष कोणा
मनमौज तो करी अन् आरोप तो फुला का

देण्यास तूच होता घेण्यास मीच होते
आता मला कळेना सुनसान तो झुला का


झाले सख्या पुरे रे, करशी किती बहाणे
झाली पहाट झाली मकरंद तू खुळा का

बेहेरे मकरंद

जमले पुन्हा नव्याने


रडते पुन्हा पुन्हा रे रडले पुन्हा नव्याने
होणे न वेगळे ते ठरले पुन्हा नव्याने

चुकले सख्या प्रिया रे सोडून दे अबोला
देते तुला हवे ते हरले पुन्हा नव्याने

बेचैन या मनाला दे ना जरा दिलासा
आकाश ते ढगांनी भरले पुन्हा नव्याने

गेली सरुन गेली ती रात्र तारकांची
लाजून चांदणे हे सजले पुन्हा नव्याने

चोरून भेटल्याचे शेजेस गूज कळले
सोडून आज लज्जा धजले पुन्हा नव्याने

सजवून कोर भाळी आली समोर जेव्हा
गेला ऋतू न आला स्मरले पुन्हा नव्याने

सोडून तो दिला रे होता प्रयास त्याने
परतून तीच आली जमले पुन्हा नव्याने

बेहेरे मकरंद

आकाश तारकांनी.....

आकाश तारकांनी सजवून रात गेली
बंधात साजणाच्या भिजवून रात गेली

कळले मला कसे ना हळुवार ज्योत झाली
उडवून होश माझा बहकून रात गेली

आता नवीनव्याने जनलाज सोडली ती
सखया तुझ्या उशाला हरवून रात गेली

माझे गुपित तुजला कळले प्रिया कसे रे
मी बोलले न काही फसवून रात गेली

निजल्या जगास आता उठवायचे कशाला
नाही सरावयाचे ठरवून रात गेली

बेहेरे मकरंद

श्वासात श्वास माझा

श्वासात श्वास माझा फसला कधी कळेना
ह्र्दयात घाव त्याचा जपला कधी कळेना

वदला कधी न माझा मुखचंद्र येत जाता
अवचीत ओठ माझा हसला कधी कळेना

शेजेवरीच माझ्या रुसला सखा अवेळी
लाडीक राग त्याचा सरला कधी कळेना

झाली तना मनाची जवळीक,काय सांगू
हलकेच तो कुशीला वळला कधी कळेना

खेळात खेळ त्याचा खेळीत यार गेला
डावात आज माझ्या हरला कधी कळेना

बेहेरे मकरंद

बहर येतो मोगर्‍याला....


जीव असतानाच होतो टाकलेला वेगळा
जीव गेला देह माझा जाळलेला वेगळा

का तुझ्या मुखड्या वरी रे भाव दिसला वेगळा
ऐकता तो प्रश्न माझा राखलेला वेगळा

वार तू केलेस जखमा लाघवी ह्रदयावरी
जपुन आहे "हा" कलेजा माखलेला वेगळा

रोज करती "लाल" अपुली साधु नेते मंडळी
बापुजींचा मूक पुतळा वाकलेला वेगळा

बहर येतो मोगर्‍याला याद ती येता तुझी
अंगणातच एकटा तो वाळलेला वेगळा

बेहेरे मकरंद

मीच माझा

दावणीला श्वास वेडा लावणारा मीच माझा
जीवघेण्या मैतरीला जागणारा मीच माझा

जीवनाचे एकतानी गीत गाणे ध्येय माझे
वेगळ्या वाटेवरी ना चालणारा मीच माझा

पदर रे गेला ढळूनी, सहज का? मग, ठरवुनी तो
ऐनवेळी लाजलज्जा पाळणारा मीच माझा

संपलेले शब्द सारे संपल्या ह्या भावना ही
रोज चंचल या मनाला चाळणारा मीच माझा

घेतले बंदी करूनी कोश विणला भोवताली
कोसतो आता स्वत:ला जाळणारा मीच माझा

आज होता साथ तुझिया जान जिगरी दोस्त माझा
बहरलेले फुल हाती वाळणारा मीच माझा

आज मी पडलो सुखाने बंध ना अन् पाश ही ते
हार गजरा त्या फुलांना घालणारा मीच माझा

बेहेरे मकरंद

हाती कळ्याच माझ्या...


हाती कळ्याच माझ्या सजवून साथ गेली
फुलवून त्या कळ्यांना उमलून रात गेली

आता कशास होती संवाद गूज गोष्टी
करुनी मुक्या मुक्याने सहजात बात गेली

होते नभात तेव्हा अगणित लाख तारे
दावून ती दिशाही कोन्यात वात गेली

झाली युगा युगांची शेजेत भेट जेव्हा
लाजून ती निशाही अडवून हात गेली

हरलो कसा कळेना गाफील राहिलो मी
माझी प्रियाच तेव्हा देऊन मात गेली

बेहेरे मकरंद

कसेतरी

सडायचे कुजायचे जगायचे कसेतरी
असेच शाप भोगता मरायचे कसेतरी

असेच घाव घातले कुणातरी कधीतरी
तसेच घाव सोसता हसायचे कसेतरी

असा कसा तुझा प्रभू मलाच न्याय वेगळा
तुलाच दोष लावता रहायचे कसेतरी

कितीकदा तुलाच साद घात घात घातली
स्वत:स कोसता स्वत: हरायचे कसेतरी

अखेर मीच हारलो तुलाच जिंकवावया
कळेल एकदा तुला रडायचे कसेतरी

बेहेरे मकरंद

आज मी पुसले जुने ते कोरलेले नाव माझे

आज मी पुसले जुने ते कोरलेले नाव माझे
आज मी उध्वस्त केले वेदनांचे गाव माझे

येउ दे कोणी कधी ही काढण्याला माग माझा
ना कधी गवसायचे ते पावलांचे ठाव माझे

का करू आता नव्याने या जनांची ती तमा ही
ना कधी कोणी समजले या मनाचे भाव माझे

वार केले या जगा ने क्रुर निर्दय पाशवी ते
मीच होतो एकटा झेलावयाला घाव माझे

बेरकी दुनिया असू दे ढोंग घेउन मतलबी ती
राखले मी खेळण्याला थोडके ते डाव माझे

बेहेरे मकरंद

म.क.वरील शांतता


माणसांचे पेव फुटावे
अशी होती इथे गर्दी
काही होती नवी वासरे
काही होती जुनी दर्दी

पायावरती पाय पडती
थोडीबहूत रेटारेटी
कधी शब्दांच्या लढाया
कधी आनंदी भेटी


आता मात्र पहा येथे
सारे कसे शांत शांत
बोंब ठोकली तरी
कोण ऐकेल ही भ्रांत

कधीतरी एखादीच
व्यक्ती इथे थांबते
तेवढ्यापुरती तरी
कुजबूज जरा लांबते

-हरीश दांगट

Sunday, December 25, 2011

तुझ्या-माझ्यात


शांतता हवेत
शांतता नभात
अशा रम्य वेळी
आणि तुझी साथ

आकाश निरभ्र
रात्र चांदण्याची
अन् तुझा चेहरा
आभा चंद्रमाची

एक हास्य तुझे
गालावर खळी
मिटता पापणी
गुलाब-पाकळी

मंद वाहे वारा
हवेत गारवा
आणि तुझा स्पर्श
सुगंधी मरवा

तू माझ्या मनात
मी तुझ्या मनात
आणि तुझे माझे
हातांमध्ये हात..

--प्रशांत उदय मनोहर

मोहोरी

दूरवर विस्तारला
गावाच्या बाहेर
मोहोरीच्या मोहराचा
पिवळा आहेर

पानोपान बहरली
फुलांनी मोहोरी
जणु हिरव्या शालूला
काठ जरतारी

पुनवेच्या रात्री पडे
चांदी सुवर्णात
वाऱ्यासवे अन् मोहोरी
आनंदे डोलत

सूर्योदयी नभ जणु
केशरात न्हाले
सांडलेले ओज होई
मोहोरीची फुले..




--प्रशांत उदय मनोहर

Thursday, February 24, 2011

उणे उणे होत चाललेत



लांब होत चालल्या सावल्या
उतरणीला लागली उन्ह
मनाची उदास गाज
भावनांचा कोरडा समुद्र

मळभ दाटलय मनात
ढगांच्या पल्याड आकाश
झाकोळलय इंद्रधनुष्य
उन - पावसाच्या खेळात

बहरलीच होती रातराणी
पण अविश्वासाचा सडा
काचेच्या भांड्याला गेला
तुझ्या शब्दांचा तडा

उणे उणे होत चाललेत
सर्व सुखाचे क्षण
मनावर उरतात फक्त आता
झालेल्या जखमांचे व्रण


स्नेहा ( देवराई )

Saturday, February 19, 2011

कार्ट प्रेमात पड़लय


हळूच हसतय
कधी कधी रुस्तय
जेवताना उठतय
ग्यालरित बसतय
विचारात असतय
गुपचुप हस्तय
चोरून बोलतय
बाहेर जातय
उशिरा येतय
टेंशन घेतय
पैशाची उधल पट्टी करतय
घरी नीट बोलना
रस्त्याना नीट चालना
सुट्टीत घरी थामबना
रात्रभर एस एम एस करतय
मोबाइल कुनाकड़ देईना
बाथरूम मधे पण मोबाइल घेउन जातय
एस एम एस पण लोक़ करून टाकतय
लग्नाचा विषय काढला की भांडंन काढतय
फोन रिसीव केला तर शिव्याच घालतय
आपण जवळ गेलो की फ़ोन कट करतय
कुणाचा फ़ोन आला की लांब जाऊंन बोलतय
वरील लक्षण दिसली की समजायच कार्ट प्रेमात पड़लय
 

तिने विचारले मला कविता कशी सुचते ?


तिने विचारले मला कविता कशी सुचते ?
कल्पनाच आसते ती की सत्य शब्दात गुंफते ?
मी म्हटले माहित नाही कशी ती बनते
तूच सांग मला बिज्याला हिरवे रूप कसे मिळते ?
ती म्हणाली सोप्पे आहे बिज पुरावे लागते.
ख़त पानी घालून ते रुजवावे लागते .
काल जाता काही चमत्कार तो घडतो.
बिज्याला तेव्हा हिरवा मोक्ष्य मिळतो.
मी म्हटले कवितेचे आगदी तसेच असते .
आजूबाजू ला आपल्या जे काही घडते .
कळत नकळत ते ह्रुदयात जावुन बसते .
आच्यानक मग त्याला शब्दरूप मिळते .
कळत नकळत एक काव्य बनते .
दुःख जेव्हा हृदयाला प्रमाणा बाहेर छळते.
आप्रधाचे ओझे जेव्हा मनाला सलते .
आसत आपल कोणी जे बरोबर नसते.
तेव्हा शब्द जुळतात कविता बनते .
कोणाच्या भेटीने जेव्हा आपण फुलतो.
स्वताच्याच कल्पनेत आसमंतात उडतो.
स्वप्नाच्या झुल्यात मनसोक्त झुलतो .
तेव्हा लय लागते आणि कविता जन्मते.

कोणास ठाऊक का ?

तुझ्याशी नाही बोलता आलं
तर काही तरी राहून गेल्यासारखा वाटत
कोणास ठाऊक का ?

भेटतेस जेव्हा मज , हसू उमटते गालावरी
भेटल्यावर शब्द अपुरे पडतात तरी....
कोणास ठाऊक का ?

रोज ऑनलायीन येऊन ... तुझ्हीच वाट पाहत असतो
कंटाळलेल्या मनाला विसावा द्यायसाठी तुझी साथ बघत असतो
कोणास ठाऊक का ?

तुझा चेहरा .. झगमगतो अंतरात.
तुझी ती गोड आठवण .. आणि सोनेरी पायवाट
कोणास ठाऊक का ?

विरह जरी वाटे इतका कठीण
हुरहूर असते काळजात, तू भेटशील आजपण
कोणास ठाऊक का ?

अंतर जरी दोघातले दिसे सूर्याचे चंद्रापासून इतके ..
तुझ्या लक्ख प्रकाश पाहुनी ... रात्र सुद्धा लाजते ...
कोणास ठाऊक का ?

प्रत्यक्षात जरी तुला नाही पाहता आलं तरी
मनातच तुझी प्रतिमा उमटून येते परी
कोणास ठाऊक का ?

तुला रोज पाहून हसत असलेला एक फुल जरी दिसे तुला मी
तरी तुझी चाहूल लागताच ...गंध दरवळू लागतो मी .
कोणास ठाऊक का ?

तुझा स्पर्श झालाच तर . कली उमलते भाग्याची लगेच हि
आणि तू तोडलेस जरी मला .. तरी हसत हसत प्राणाला मुकेन मी .
कोणास ठाऊक का ?

वेश्या


संध्याकाळी ८ वाजता ती मला मारून झोपवायची
तिला माझ्या दुसऱ्या दिवशीच्या भुकेची काळजी असायची

गज्र्यांच्या वासाने,अत्तराच्या घमघमाटाने माझ डोक दुखायच
चुर्गळलेल्या फुलांचं टोपलं माझ्या घरात नेहमीच असायचं

मामांना पाहिलं आहे मी आईची पप्पी घेताना
माझ्या समोर नाही म्हणताच ......लाथांनी मार खाताना

माझ्याघरी येणार प्रत्येक जण माझा मामाच होता
पण खाऊ साठी पाठीवरून फिरणारा हात मला खूप बोचत होता

आई दिवसभर झोपायची आणि रात्र भर मामासोबत गप्पा मारायची
मला नेहमी प्रश्न पडायचा मला फीस साठी इतके पैसे कुठून द्यायची

मी कॉलेज ला गेल्यावर सर्व मामा माझ्याशीच सलगी करू लागले
न मागताच माझ्या हातावर पाचशे/हजाराच्या नोटा ठेवू लागले

आईने माझ्या हातात जेव्हा ती नोट पहिली
काना खाली मारून माझ्या ओक्साबोक्सी रडू लागली

"केली चूक जी माझ्या आईने ती मला करायची नाही
नरकात माझ्या पोरी, तुला मला ढकलायचं नाही"

मला घडवण्यासाठी जिने नर्क भोगला ती माझी आई आहे
.............................जरी तुमच्या नजरेत ती वेश्या आहे.


By -rajesh




कस सांगू मी ह्या जगाला


कस सांगू मी ह्या जगाला कि तू माझ्यासाठी काय होते ,
तुझ्या डोळ्यातून अश्रू पडताना माझे डोळेही भिजून जाते ...

कस सांगू मी ह्या जगाला कि तुझे माझे नाते काय होते ,
आपलं नांत तर, नातांच्या अंधकारातून निघणारी एक ज्योत होते ..

कस सांगू मी ह्या जगाला कि तू माझे सर्वस्व आहे ,
तुझ्या विना मी तर एक न चकाकणार चांदण आहे ...

कस सांगू मी ह्या जगाला कि तू माझे काय होते ,
तुझ्याविना तर माझी कविता हि पूर्ण होवून अपूर्ण होते ...

कस संगु रे शोन्य कि तुचं माझे जीव कि प्राण होते ...

कस सांगू ग मी ह्या जगाला ...
कारण सांगण्यासाठी हे अमूल्य शब्द हि अपुरे होते ...

कस सांगू ...

चार पावलं...


चार पावलं आपण
सोबत चालत जाऊ
तुझे आणि माझे सूर
कुठवर जुळतात पाहु...

अर्थात जमत असेल तर चल
मी आग्रह करणार नाही
आज तरी, "तुला यावच लागेल,
असा हट्ट ही धरणार नाही

पण मनातल्या मनात कुढण्यापेक्षा
व्यक्त करणं बरं असतं
कारण इथून तिथून ऐकलेलं
सारंच काही खरं नसतं

कुणी कुणाला का आवडावं
हे सांगता येत नाही
चार चौघांना विचारून कुणी
हृदय देत नाही

तसंच काहीसं माझं झालं
त्याच धुंदीत propose केलं
जवळ अशी कधी नव्हतीसंच
propose ने आणखीच दूर नेलं

जे झालं ते वाईट झालं
पण झालं ते बरंच झालं
खरं सांगणं गुन्हा असतो
एव्हढं मात्र लक्षात आलं

जाऊ दे,
झालं गेलं विसरून जा
मागे न वळता चालत राहा
मला विसर असं मी म्हणणार नाही
पण तू तो प्रयत्न करून पाहा...

थांब...
इथून पुढं मला एकट्यालाच जायचंय
पण धन्यवाद; तू इथवर आलीस...
सारं आयुष्य नसलीस तरी
चार पावलं माझी झालीस....

पुन्हा प्रेम करणार नाही...


भेट आपली शेवटची हसून निरोप घेत आहे

वरून शांत असलो तरी हृदयातून रडत आहे

जात आहेस सोडून मला, नाही अडवणार मी तुला

असशील तिथे सुखी राहा, ह्याच माझ्या शुभेच्छा तुला

निरोप तुला देतांना अश्रू माझे वाहतील

काळजाच्या तुकड्यांना सोबत वाहून नेतील

त्या वाहणाऱ्या अश्रुतही प्रतिबिंब तुझेच असेल

नीट निरखून पहा त्यांना, प्राण त्यात माझा दिसेल

वाट आपली दुभंगली आता पुन्हा भेटणे नाही

प्रवास जरी एक आपला मार्ग एक होणे नाही

आठवण तू ठेवू नकोस, मी कधीच विसरणार नाही

भेटणे तुझे अशक्य तरी वाट पाहणे सोडणार नाही

जातेस पण जातांना एवढे सांगून जाशील का?

भेटलोच जर कधी आपण ओळख तरी देशील का?

जाता जाता थोडे तरी मागे वळून पाहशील का?

प्रत्येक्षात नाही तरी डोळ्यांनी काही बोलशील का?

बोलली नाही तू जरी, नजर तुझी बोलेल

गोंधळलेल्या अंत:कर्णाची खबर मला सांगेल

कोठेतरी हृदयात इतिहास सारा आठवशील

तो आठवण्या पुरता तरी, तू नक्कीच माझी राहशील!

नजरेने जरी ओळखलेस तू, शब्दांनी मी बोलणार नाही

तुझ्या माझ्या आयुष्यात नसती वादळ आणणार नाही

नेहमीच पराभव झाला तरी, हक्क तुझ्यावर सांगणार नाही

तुला कळेलच........


तू असशील तुझ्या जगात सुखी
इथे तुझ्या नावाचे श्वास घेतो मी

ओंजळीत समेटून अश्रू सारे

तुलाच त्याचे अर्घ्य देतो मी



तुला कळेलच, उशिरा का होईना

माझं प्रेम नव्हतं इतकं व्यवहारी

दिल्या-घेतल्याचा हिशोब ठेवलास

पण तू राहशील प्रेमाशिवाय भिकारी



कधी कधी उगाच वाटतं मला

काय पाहिलं होतं मी तुझ्यात

तुझ्या-माझ्या नात्याचं भविष्य

तेव्हापासूनच होतं तळ्यात-मळ्यात



इतकं सारं सोसून, पाहूनही

मी माझ्या नशिबावर थक्क आहे

दारं उघडी ठेवलीत मी हृदयाची

पुन्हा प्रेमात पडण्याचा मलाही हक्क आहे

Thursday, February 10, 2011

मैत्रीण माझी नाजुक फुलासारखी

मैत्रीण माझी नाजुक फुलासारखी
वाऱ्याबरोबर डोलणाऱ्या इवलाश्या रोपटयासारखी

हसण तिच खळखळणाऱ्या झऱ्यासारख
मनही तिच त्यातील निर्मळ पाण्यासारख

आहे ती अशीच अश्रुसोबत हसणारी
मनातील वादळांना मनातच थोपवणारी

भासते कधी आकाशातील चांदणीसारखी
तर कधी सागराबरोबर खेळणाऱ्या लाटेसारखी

तशी आहे ती माझ्यापासुन दुरवर
तरीही अंतःरात रुतलेली खोलवर

तुझ्या मैत्रीच्या छायेत मला क्षणभर विसावू दे
हरलेi जरी मी, आपली मैत्री मात्र सदैव जिंकू दे

जो धोका पत्करण्यास कचरतो, तो लढाई काय जिंकणार

मी नथुराम गोडसे बोलतोय...
पण कोणी सुद्धा ऐकत नाही !
डोळे बंद, तोंड बंद...
बुद्धी ही चालवत नाही !

प्रत्येक जण इथे स्वतःच्या फ़ायद्यासाठी जगतोय,
वेगवेगळे रंग, आकार एकाच गोल चश्म्यातून बघतोय,
खोट्याची आरेरावी...
खऱ्याची भिक सुद्धा मागत नाही,
डोळे, कान, तोंड बंद...
बुद्धी ही चालवत नाही !

सत्याग्रह, त्याग अहिंसा... सगळ साफ झुठ आहे,
सत्य फक्त रक्ताची धार लागलेलं शिवबाचं बोट आहे...
जखम केव्हाच सुकली आहे,
पण रक्त मात्र थांबत नाही...
डोळे, कान, तोंड बंद...
बुद्धी ही चालवत नाही !

सज्जनांनी कधीच शस्त्र नव्हते त्यागले,
म्हणूनंच ना अटके पार, झेंडे आपले लागले ?
स्नान संध्ये साठी आता,
जल सिंधुचे संगत नाही...
डोळे, कान, तोंड बंद...
बुद्धी ही चालवत नाही !

संभवामी युगे युगे म्हणत्, कोणीच कसा आला नाही ?
खुदाने हिफ़ाजत केली नाही.. आणि विष्णु पुन्हा अवतरला नाही...
अस्त होणे अटळ आहे,
त्याशिवाय उदय होत् नही,
डोळे, कान, तोंड बंद...
बुद्धी ही चालवत नाही !

जे जे उत्तम उदात्त उन्नत, ते आम्ही स्मरणारच,
देशासाठी जन्मणार आणि देशासाठी मरणारंच,
महानतेला त्रिवार प्रणाम, पण.....
काळाची 'गरज' सरत नाही !
मी नथुराम गोडसे बोलतोय...
पण कोणी सुद्धा ऐकत नाही !
 
 
 जी हा........
जो धोका पत्करण्यास कचरतो, तो लढाई काय जिंकणार
 
 

एका मुलीने ने देवाला विचारलं प्रेम काय असत ?


एका मुलीने ने देवाला विचारलं प्रेम काय असत ?
देव म्हणाला

बागेतून एक फुल घेवून ये.

ती मुलगी फूल आणायला गेली ,

तिला एक फूल आवडल ,

पन तिला त्यापेक्षा सुंदर फूल हव होत ,

ती पुढे चालली गेली ,

पण तिला चांगल फूल नाही मिळाल ,

जेव्हा ती परत तेच फूल आणायला गेली ,

तेव्हा ते फूल तिथे नव्हत ,

तिला खूप पश्चाताप झाला ,

तिने देवाला येऊन सांगितलं ,

तेव्हा देव म्हणाला , " हेच आहे प्रेम "

जेव्हा प्रेम तुमच्याजवळ असत .

तेव्हा त्याची कदर नाही करत ,

पण जेव्हा ते निघून जाते तेव्हा कळते ते काय असत ..!!

Thursday, February 3, 2011

एकदा एक प्रियकर.....

एकदा एक प्रियकर आपल्या प्रेयेसी कडे गेला दार ठोकून म्हणाला प्रिये दार उघड.
त्यावर प्रेयसी म्हणाली कोण आहे?
प्रियकर म्हणाला: मी आहे
प्रेयेसी म्हणाली : अजून तू प्रेमासाठी तयार नाहीस पुढच्या वेळेला ये.......
पुढच्या वेळेला तो गेला दार ठोकून पुन्हा म्हणाला प्रिये दार उघड
त्यावर प्रेयसी म्हणाली कोण आहे?
प्रियकर म्हणाला: मी आहे
प्रेयेसी म्हणाली : अजून तू प्रेमासाठी तयार नाहीस पुढच्या वेळेला ये.......
पुढच्या वेळेला पुन्हा तो गेला दार ठोकून म्हणाला प्रिये आता तरी दार उघड
ती पुन्हा म्हणाली: कोण आहे?
प्रियकर म्हणाला: मी आहे
ती पुन्हा म्हणाली:सांगितल ना तू प्रेमासाठी अजून तयार नाहीस पुढच्या वेळेला ये.....जा.......
तो गेला वेडा पिसा झाला घायाळ झाला........
पुन्हा तिच्या दाराशी आला आणि दार ठोकून म्हणाला;प्रिये दार उघड
ती पुन्हा म्हणाली: कोण आहे?
प्रियकर म्हणाला: आता मी उरलेलोच नाही आता फक्त तू आहेस फक्त तूच तू...........!

सारांश एवढाच कि प्रेमात आणि भक्तीत तसं काहीच अंतर नाही मी पणा विसरून केल जात ते प्रेम....
लीन
होऊन केल जात ते प्रेम अस्तित्व भिजून टाकत ते प्रेम.......! माझ हि
अस्तित्व या प्रेमातच बुडालय आणि तरी सुद्धा या प्रेमानेच मला
सावरलंय..............!

A software engineer calls his friend



Hello,
plss.. talk to me... y u r not picking up the call ?????"

Friend:  "everything is alright?"

"wat alright.. noting is alright.. see the time.. its 11pm.. n I m
coming now from office..no food for me today also.. now I will cook...
From the past 3 days. I m eating only maggie... n my PM eating only
me. see the price hikes, everything is 2/- more frm yesterday.. except
my salary...I think the begger in front of my office.. earns more than
me.. wat shud I do..."

"wat happened.. wat r u talking"

"wat I m talking???? no, I m not talking.. Manager dont allow anyone to
talk except the client.. who always talks something.. from past 3 months
I didnt take any leave..now from 3 weeks.. I m just begging for one dam
leave.. n wat response i got....'why u want to waste an important day of
ur life??'

i now finalize one more time... yes..i m gonna quit.. this project...
but, i cant. no, i can.. but i wont..uh..."

"ok.. now Relax..."

"How can i relax... for relaxation ppl do yoga, but its night so i cant,
then else they watch movies... but see, in every channel all bogus
movies r repeating, same.. 'Welcome', 'Suryavansham',Govinda's movies...
it really irritates... everyone is faking in TV, fake news, fake
stories, fake swaynwars, fake reality...ah see the movies u will get to
know... In "Rock-on" last scene... Arjun Rampal's wife says to taxi
driver, that "hurry up, we r going late for Airport..." Airport...??? I
dont understand, how can  thought he find a job in Cruze.. not
Airlines..

In 3 Idiots... starting scene... Madhvan does the drama to leave his
flight, then what happened to his luggage??
In same movie... Kareena is a doctor.. that too a surgeon.. to bcame a
surgeon.. It requires atlest 5[MBBS]+3[MS] years..
so she shud be 28... n Aamir as a student.. only 18 or 20 ?? then after
10 years they decide to marry.. means she is 38 ??
I dont understand, how can spiderman reach to the church-bell in part-3,
when he lost all his power ??
I dont understand, how Balakrishna can send a train back just by Hitting
his thighs, when I cant ??
I still dont understand how could Rajnikanth fly without wings ?? i just
dont....."

"hey stop it now.."

"am I a train who will stop it, by pulling chain... ohh train.. I dont
understand, how can I didnt   see one in last 3 months... how will i see
?
All the time monitor is in front of me.. in night also wen I open my
eyes, I find my username and password window..
I need to cool down..

10 9 8 7 6 5 4 3 2 1

but someone tell me howw.. everytime there is a powercut here..
except wen i m not in home.. home, wat rubbish,its a dam single room..
where i m living alone with my pillow..

I also want girlfriend yaar, like my rivals have..
smita, rashmi, priti, sruti, madhu.. anyone frm my odc is ok, but they
all r engaged, u know y ?
Bcoz their boyfriends do not work in IT companies, outside girls do have
chat wid me but only on my salary day..
I got rejected 31 times.. u know y ?? each time I propose them, they ask
where do u live..
I say in my Cubicle.. Bcoz thats the only place u can find my soul all
the time.."

"hey man, u better take rest, we will talk in Morning"

" Morning.. are u talking the same morning.. Sun rises, bird flies,
omlette fries, employee cries... dam , i didnt see the Sun,from 3
years.. how it looks like... every morning I catching shuttle, reaching
my birthplace 'cubicle' working n working n leaving when Sun uncle is
not there... i will hit my room-owner some days, every morning he used
to cry for increasing room rent, I will always tell him to go n meet my
Manager... I dont understnd how can i be so nice to my colleagues..
Each time they want leave, they repeat the same old dialogue... "my
sister's marriage".. my colleague's 9 sisters got married,
3 times grandpa expired,
5 times frnd went to ICU.. but my colleague is fine..
and his favorite dialog "i need to drop a frnd to hospital, as he is not
feeling well" later i find movie tickets in his purse... then my pm's
motivational speech.. 'u will work.. u will grow'.. means if i wont
work.. i will shrink or what...

when I need hike, I m junior.. still need to grow.. when I do mistakes..
comon man u r senior now, u can not do mistakes.. ahhh God gimme some
power to understand the greatness of a super natural person known as PM
in this world.."

"ok enough now, i m disconnecting"

"wait.. i called you.. n u r disconnecting.. u know previously i was
normal, when i was in college, i used to talk continuosly watever i
want, now i m talking only this much... 'yaa its done', 'that work is
completed', 'Please..', 'Good Morning','Lunch','Tea','Snacks'..

I dont know wat i m talking abt, i shud b happy.. i have saturday n
sunday..
Saturday to recover from the disaster been made from monday to friday..
Sunday to think about upcoming disaster from monday to friday.. cool
naa..

you heard that in 2012 earth will end.. then also my ODC and my cubicle
will remain as it is.. u know why ??
because that's not a part of earth.. n we employees are not human
beings... we are aliens, so better before u start getting headache... go
have a nice dream.. me, I will again start my day tomorrow like I m
starting everyday..
good night..."

beeeeeeeeep...beeeeeeeeeep...beeeeeeeeeep
**********************************************************

Next Day, in office:-

Manager: "Dude, Please come here"

"Yes sir.....!!"

M: "I approved your leaves.. i think you should go and have some fun"

I happily came out, and checked my phone Dialled calls..
"Ohhh my God, yesterday I called my PM instead of my friend...
shiiiiittt "  

Thursday, January 27, 2011

तुला रोज येतो कधीही शहारा

तुला रोज येतो कधीही शहारा
कसा सांग व्हावा ? नशेचा उतारा

किती ऊन सोसून मी वाट पाहू ?
तुझ्या सावली चा मला दे किनारा

बिछाना च होईल आकाश गंगा
तु ये ना जरा लाजवू शुक्र तारा

उभा जन्म काट्यात आहे तरीही
तुझी आस आहे सुगंधी फुलोरा

जरी अंगणे विस्तवाचीच माझी
तुझ्या आठवांचा मिळो गार वारा

अनाहत तुझ्या अंतरी मीच आहे
मुक्या काळजाचा घुमे हा दरारा

...मयुरेश साने

वेडी....... विंदांची कविता......



एका ढगाला कुशीत घेऊन झोपली,तेव्हा तिला गर्भ राहिला.
पुढे सर्व सुरळीत झाले.आपल्या घरातील मातीचे मडके
मनमुराद फोडून ती देहान्ताच्या यात्रेला निघाली.
वाटेत तिला गाढव भेटले,तिने त्याची समार्म्भपूर्वक पूजा केली.
धुपाटण्यांतला उरलासुरला धूप कनवटीला लावून ती म्हणाली,
"ह्याचीसुद्धा राख होती तर कोणाला काय सांगणार होत्यें?
पण दैव शिकंदर आहे म्हणून कुत्र्यासारखे पुढें जाते."
नंतर तिने वडाची पाने पिंपळाला लावली;आणि म्हणाली,

"आता मी कूणाचे काही लागत नाही,पौर्णिमीवढेहि".
पुढे सर्व सुरळीत झाले(हे मागे सांगितलेच आह.े)
वेडीला वीज झाली;आपले स्तन विजेला देऊन
वेडी आपली पुढे गेली;वाटेमध्ये विदूषक भेटला;
राजा भेटला,राणी भेटली;’अ’ भेटला,’ब’ भेटला;
पण वेडी शहाणी होती;तिने कोणालाच ओळखले नाहीं.


------विं. दा. करंदीकर.

फसगत


गेल्या पावसाळ्यात
शब्द पक्षी बनून
देशांतरास गेले !

मग ढगांनी डोळ्यांना समाजावले,
ढगांचे दुख:
मग
डोळे कायम कोरडे राहीले ....

पुन्हा आभाळाकडे डोळे
लावले,
तर पक्षी आले परत,
शब्द मागे ठेऊन !

ढग आले परत पावसासह,
सरीवर सरी कोसळल्या,
डोळ्याना जाणीव झाली,

फसगतीची...........................

--पुन:श्च

Tuesday, January 25, 2011

तसे किती काटे रुतले - गाणारे झाड़


तसे किती काटे रुतले आमुच्या गतीला,
तुझा सूर केवळ होता एक सोबतीला..

अनोळखी बनले अवघे सोबती यशाचे,
दूर दूर झाले सारे सोयरे सुखाचे..
कुणीही न पुसले डोळे हाय त्या घडीला,
तुझा सूर केवळ होता एक सोबतीला..

कसा हाय घरट्यांचा ही उडाला निवारा,
तुझ्या चार चिमण्यांसाठी राहिला ना चारा..
दार दार परके झाले मायबापडीला,
तुझा सूर केवळ होता एक सोबतीला..

मग हळूच आम्हांलाही तुझे पंख आले,
मग हळूच आमुचे डोळे सूर्य-चंद्र झाले..
दिशा दिशा तेवत उठल्या तुझ्या आरतीला,
तुझा सूर केवळ होता एक सोबतीला..

रचना : सुरेश भट
अल्बम : गाणारे झाड़

अन कुणाला राग आला जर कधी...


शब्द फ़ुट्ला वेदनेला जर कधी
काळजाला सुर गवसला जर कधी

जाळूनी टाकील ब्रह्मांडास हा
उघडला तो नेत्र ओला जर कधी

ही कुणाची पालखी भोई कुणी
आडवा रस्ताच आला जर कधी

हे नको नि ते नको मी का करु
कोण आले चौकशीला जर कधी

कोणत्या शब्दांत मांडू भावना
बोलतांना जीव गेला जर कधी

प्रेम करणं सोपं नसतं.....................


प्रेम करणं सोपं नसतं

सर्व करतात, म्हणून करायच नसतं

चित्रपटात बघीतलं, म्हणून करायच नसतं

पुस्तकात वाचलं , म्हणून करायच नसतं

तर कुणाकडून ऐकलं, म्हणून करायच नसतं

कारण प्रेम करणं सोपं नसतं

शाळा कॉलेजांत असच घडतं

एकमेकांना बघीतलं की मन प्रेमात पडतं

जागेपणी ही मग प्रेमाचं स्वप्नं पडतं

ज्या वयात शिकायचं असतं त्यावेळी भलतचं घडतं

करीयरचं सत्यानाश तर आयुष्याचं वाटोळं होतं

सहाजीकचं मग आईवडीलांच्या ईच्छांवर पाणी पडतं

कारण प्रेम करणं सोपं नसतं

हॉटेल सिनेमागृहात नेहमी जावं लागतं

पैशाचं बजेंट नेहमी बनवावं लागतं

फोन कडे नेहमी लक्श ठेवावं लागतं

मग जागेपणीही स्वप्न दिसायला लागतं

डोक्याला ताप होऊन डोक दुखायला लागतं

आनंद कमी दुःख जास्त भोगावं लागतं

एवढ सगळं करणं खुप कठीण असतं

कारण प्रेम करणं सोपं नसतं...............

गुंतवण.....


का असा देव दगडात, शोधत राहीलो मी ?
का मनीच्या भावनांना, रोधत राहीलो मी ?

का नाही जमले, मला स्वार्थीपणे वागणे ?
का असा दुसार्‍यांसाठी, झगडत राहीलो मी ?

शब्दांनी सावरले नाही, व्यथेला आवरले नाही;
का असा माझ्याच श्वासात, घुसमटून राहीलो मी ?

केली मी प्रित, जीव ओवाळला....
तरीही का मनाने, अधुरा राहिलो मी ?

जळाली भावना, मेले माझे मन...
तरीही हास्याला ओठांवर, का फुलवत राहीलो मी ?

Monday, January 24, 2011

हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...





आपलं जे असतं;
ते आपलं असतं
आपलं जे नसतं;
ते आपलं नसतं
हसतं डोळे पुसुन आतुन फळासारखं पीकलो
हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...


आलेला मोहोर;
कधी जळुन जातो
फुलांचा बहर;
कधी गळुन जातो
पुन्हा प्रवास सुरु केला, जरी चालुन थकलो
हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...


कधी आपलं गाव;
आपलं नसतं
कधी आपलं नाव;
आपलं नसतं
अश्या परक्या देशात वाट नाही चुकलो
हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...


पींजऱ्यात कोंडुन;
पाखरं आपली होत नाहीत
हात बांधुन;
हात गुंफले जात नाहीत
हे मला कळलं तेंव्हा हरुन सुध्दा जींकलो
हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...


झाड मुकं दीसलं तरी;
गात असतं
न दीसणाऱ्या पावसात;
मन न्हात असतं
कळोखावरं चांदण्याची वेल होऊन झुकलो
हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...


-मंगेश पाडगांवकर
गाडी मिरवणाऱ्या श्रीमंत पेक्षा
झोपडीत हसणाऱ्या गरीबाकडे पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत.......

नशिबाची चाकरी करण्यापेक्षा
कर्तृत्वाला आपल्या हाताखाली बाळगाव
आयुष्य जास्त सुंदर बनत..........

भविष्याचे चित्र काढण्यापेक्षा
वर्तमानातल पूर्ण कराव
भूतकालातल रंगवून पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत.........

कायमच मागण्या करण्यापेक्षा
कधीतरी काहीतरी देऊन पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत......

हरल्यावर एकटेच पश्चात्ताप करण्यापेक्षा
मित्राच्या खांद्यावर रडून पहावं
आयुष्य नक्कीच सुंदर वाटत...........

चारचौघात एकट बसण्यापेक्षा
कधी कधी समुद्रकिनाऱ्यावर आठवणींना घेऊन बसावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत........

आपल्याला कोण हवंय यापेक्षा
आपण कोणाला हवंय हे सुद्धा कधीतरी पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत......

आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत................

यात काही पाप नाही


सिगरेटचा जेव्हा तुम्ही, मजेत घेता मस्त झुरका,
आवडलेल्या आमटीचा, आवाज करीत मारता भुरका,
विश्वास ठेवा यात काही पाप नाही,
आनंदाने जगायचं नाकारणं, याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही !
जबरदस्त डुलकी येते, धर्मग्रंथ वाचता वाचता,
लहान बाळासारखे तुम्ही, खुर्चीतच पेंगू लागता,
विश्वास ठेवा यात काही पाप नाही,
आनंदाने जगायचं नाकारणं, याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही !
देवळापुढील रांग टाळून, तुम्ही वेगळी वाट धरता,
गरम कांदाभजी खाऊन, पोटोबाची पूजा करता,
विश्वास ठेवा यात काही पाप नाही,
आनंदाने जगायचं नाकारणं, याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही !
प्रेमाची हाक येते, तुम्ही धुंद साद देता,
कवितेच्या ओळी ऐकून, मनापासून दाद देता,
विश्वास ठेवा यात काही पाप नाही,
आनंदाने जगायचं नाकारणं, याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही !


--मंगेश पाडगावकर

नसलेल्या आजोबांचं असलेलं गाणं



जेवताना आजोबा लाडात येत,
मला आपल्या ताटातली भकर देत;
जेवता जेवता मधेच थांबत
आणि एक भला मोठा ढेकर देत !

मी म्हणायची रागवूनः
"आजोबा, बॅड मॅनर्स,
व्हॉट आर यू डुइंग?"
आजोबांचं हसून उत्तरः
"आय अॅम जस्ट ढेकरिंग !"

आजोबांच्या खोलीत आता
धुकं... धुकं... धुकं...
आजोबांचं जग सगळं
मुकं...मुकं...मुकं...

आजोबांना पडलं होतं भलंमोठं टक्कल !
आजोबा म्हणायचेः
"ज्याला असं टक्कल
त्यालाच असते अक्कल !"
मी खिजवून म्हणायचोः
"आजोबा, यमकासाठी
घ्या आता बक्कल !"
आजोबा मोठयाने ओरडून म्हणतः
"अरे साल्या यमक्या,
मला देतोस धमक्या?यमकांच्या धंद्यामधे
मी आहे खमक्या !"

आजोबांच्या खोलीत आता
धुकं... धुकं... धुकं...
आजोबांचं जग सगळं
मुकं...मुकं...मुकं...

आजोबा आपल्याच नादात
स्वतःशीच गात असत,
गाता गाता मधेच थांबून
स्वतःशीच गोड हसत !

मी जवळ गेले की
मला म्हणतः
बेटा एक लक्षात ठेवः
एकटं एकटं जाता आलं पाहिजे;
स्वतःला स्वतःशीच गाता आलं पाहिजे !"

मी गोंधळून विचारीः
"म्हणजे काय?"
आजोबा मोठयाने हसून म्हणतः
" म्हणजे काय? म्हणजे काय?
म्हणजे नाकात दोन पाय !"

आजोबांच्या खोलीत आता
धुकं... धुकं... धुकं...
आजोबांचं जग सगळं
मुकं...मुकं...मुकं...

"आजोबा, एक गोष्ट विचारु?"
"विचार बेटा!"
"आजोबा, तुम्हांला मैत्रिणी होत्या का हो?"
"वा! वा! होत्या म्हणजे होत्याच की !
एक ती अशी होती,
दुसरी ती तशी होती !"

इतक्यात खोलीत आजी यायची,
आजोबांची जीभ एकदम बोबडी व्हायची !
आजोबा स्वतःला सावरायचे,
चटकन विषय बदलायचे,
घसा खाकरत म्हणायचेः
"बेटा, तुला गीतेमधला
स्थितप्रज्ञ कसा असतो ठाऊक आहे?
चालतो कसा, बोलतो कसा ठाऊक आहे?"

आजोबांच्या खोलीत आता
धुकं... धुकं... धुकं...
आजोबांचं जग सगळं
मुकं...मुकं...मुकं...


आजोबा संध्याकळी
अंगणातल्या झाडाखाली
आपल्या आरामखुर्चीवर
एकटेंच बसत;
एकटक डोळे लावून
दूर कुठे बघत असत...
दूरदूरच्या ढगात असत,
कुठल्या तरी न दिसणा-या जगात असत !!

पाय न वाजवता मी हळूच
तिथे जाई,
त्यांच्या आरामखुर्चीमागे
उभी राही!
काय बघत असतील हे?
मी दूर पाहीः
मला वेगळं काहीसुध्दा दिसत नसे,
तीच घरं...तीच झाडं...
सगळं अगदी तसंच असे !

पाय न वाजवता मी हळूच
परत मागे घरात यायची;
आजोबांची आरामखुर्ची
सावल्यांमधे बुडून जायची !

- मंगेश पाडगांवकर 

प्रेम म्हणजे प्रेम असतं


प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं काय नि आमचं काय,
अगदी सेम असतं!

मराठी मध्ये इश्य म्हणुन प्रेम करता येतं,
ऊर्दू मध्ये इश्क म्हणुन प्रेम करता येत!
व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं,
कान्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं!

लव्ह हे त्याचचं दुसरं नेम असतं!
प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं काय नि आमचं काय,
अगदी सेम असतं!

वयाची सोळा जेव्हा सरु लागतात,
जागेपनी आठवणीचे झोपाळे झुलू लागतात.
आठवत का?
तुमची माझी सोळा जेव्हा सरली होती,
होडी सगळी पाण्याने भरली होती!
त्या होडीवर आनंदाने बेभान होऊन नाचलो होतो,
होडीसकट बुडता बुडता वाचलो होतो!
बुडलो असतो तरी सुद्धा चाललं असतं,
प्रेमानचं अलगद वर काढलं असत!

हे तुम्हाला सुद्धा कळलं होतं
आणि मला सुद्धा कळलं होतं; कारण,
प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं काय नि आमचं कायं,
अगदी सेम असतं
प्रेम म्हणजे प्रेम असतं!

तिच्या लग्नाची पत्रिका आज घरी दिसली...

 
 
 
तिच्या लग्नाची पत्रिका आज घरी दिसली,
थरथरत्या हातांनी त्यावरची आसवं पुसली,
एक आसू नेमका तिच्या नावावरच पडला,
नाव ख़राब होइल, म्हणुन पुसनारा हात अडला...,
दोन-चार थेम्बं तिच्या बापाच्या नावावरही पडली होती,
ज्याच्याकडे पदर पसरवून ,'ती' माझ्यासाठी रडली होती,
एक थेम्ब पडला तिथे, जिथे आप्तांची नावे दाटली होती,
बहुदा माझ्यासोबत फिरताना, तिला ह्यांचीच भीती वाटली होती.,
'आमच्या ताईच्या लग्नाला नक्की यायचे हं'..,
यावरही एक थेम्ब पडला,
'ताई तू जा, मी नाही सांगणार कुणाला,..
तो भाबडा बोल आठवला...,
काही घसरलेली आसवं, लग्नस्थळ दर्शवत होती,
अगदी त्याच्याच समोर आमची भेटायची जागा होती,
'अहेर आनु नये' यावरही थोडा ओलावा होता,
तिच्या बर्थडे गिफ्ट साठी, मी मोबाइल विकला होता.......,
सगळी मित्रमंडळी माझ्यावर हसली.,
तिच्या लग्नाची पत्रिका आज घरी दिसली.......,
आज घरी दिसली............!
 


Thursday, January 13, 2011

काल तुझ्या हातावरची रेषा पाहिली आणि वाटलं, माझ्या हातावरची कवितेची रेघ तुला द्यावी आणि कविता म्हणून तुलाच माझ्या हाती घ्यावी... पण मागाहुन कळालं, असं रेषा बदलून काही होत नसतं... कारण... वर... आभाळात... तो बसलेला असतो, रेषांची लांबी ठरवायला... आता मी हातावरच्या रेषांकडे बघणंच सोडलंय... मधूनच बघतो आता, तुझ्याकडे...  रेषांमधून कॉन्टॅक्ट करण्यापेक्षा सरळ बघणं बरं ना...!!!

Saturday, January 8, 2011

मी.......


वाटे घातलेत आयुष्याचे
मी नाही, तुम्हीच माझ्या
उभी मी निस्तब्ध, निशब्द
या वैराण आयुष्यात

जिकडे जाव तिकडे फुले
पण ती तुमची
काटे त्या बरोबरचे
आहेत माझ्या वाट्याला

पाण्यात डोकवून सुद्धा
नाही दिसत प्रतिबिंब
इतकी सोलवट्ली गेली
आता मीच माझी नाही

जळाव की नाही पटकन
लाकडानी आता सारणावरच्या
पण हे सर्व उभे कोल्हे
भिजवत आहे उगीच अश्रूनी त्याना

माझ्यासाठी इतकेच कर...


माझ्या अश्रूं वर आता
एक उपकार कर
घाल शपथ डोळ्याना
बाहेर यायला बंदी कर

तुझ्या आठवणी
मागत आहे मेहेरबानी
प्रत्येक आठवण होऊन
चांदणी लुकलुकायच नभी

माझ्या काही क्षणांवर
आज तू दया कर
प्रेमात भिजवून तुझ्या
त्याना अजरामर कर

आता हे हुंदके ही
आहेत आशेने बघत
कधी घेशिल ओढून
मला पटकन जवळ

जखम....


समजतो शब्दानचा आक्रोश
कोण ऐकणार मनाचा
उसन्या हास्यामागे
लपउन झाकायचा
आक्रोश मनाचा आपल्या
त्याच त्याच खपलया
त्या बरया नाही होनार
तू कधि नाही येनार
मलाही आता आवडत खपलया निघालेल्या
त्याचया आठवानित भळाभळा वहायला

निशब्द.....


म्हणतात प्रत्येक गोष्टीला
असतो उगम
तसाच आहे
माझ्या कवितेलाही

मी त्याच्या वर केलेले
जीव ओतून प्रेम
आणि त्याने केलेली
माझी फक्त उपेक्षा

उपेक्षा घर पाडून
जाते काळजाला
आसवान्चि धार
माझ्या डोळ्याना

मग शब्द उतरतात
त्या घरांमधून
दुखचे दागिने लेऊन
बसतात ओळीने जागा पकडून

तुमच्या मनाला भिडतात हे शब्द
पण तो पर्यंत झालेली असते मी निशब्द

वेदना..


आता मनाने तरी किति खचाव
प्रत्येक वेळी का उगी बसाव

हृदयाने किति जखमा झेलाव्या
जगसमोर कशा लपवाव्या

आता हे डोले येतात सारखे भरुन
काय फायदा नेहमी अश्रु ना रागाउन

वेदनाही थकल्या मला त्रास देउन
मी सोसते त्या सर्व हसुन

नाहीस ईथे पन तू सर्व जानतोस
तुझा शिवाय सम्पतेय हे तूही मानतोस

फक्त तुझ्यासाठी.....


जरी न घेतल्या आणाभाका
साथ सोबतीने राहण्याच्या
तरीही माझ्या सर्व भावना
असतील तुझ्या सोबतीला

असेल माझ्या स्वप्नात नेहमी
सारखी तुझीच चाहूल
जरी तू देऊन जाशिल
नेहमी सारखी मला हुल

माझे हुंदके ,उसासे
का तुला जाणवत नाही
ओठींचे शब्द माझ्या
असतात फक्त तुझ्यासाठी

कसला समाज,कसली बंधन
दिलय सगळ झुगारून
तुझ्यावर प्रेम करतेय
माझ्या मनालाच विचारून

विसरशिल म्हणता म्हणता
मला नाही विसरू शकणार
जीव ओतनारी माझ्या ईतकी
तुला कधीच नाही मिळणार 
 
स्नेहा ( देवराई )  

माझा होशील.........


तुझा संग मी कधी ना भुलावा
अंगणी माझ्या तुझ्या आठवणींचा सडा पडावा

तुझ्या रंगात मिसळून माझा रंग
तयार व्हावा आयुष्याचा एक नवा रंग

माझ्या ओंजळीत तुझी शब्दफुले पडावी
त्याचीच मला मी आयुष्यभर जपावी

तू घ्यावे पिऊन पूर्ण मला तुझ्या नजरेने
नजरेच्या तुझ्या प्याल्यात मी बेहोश व्हावे

असावी माझी जागा तुझ्या अंतरी कुठेतरी
जाणीव ठेवेल ही मला जिवंत कसेतरी

रोशन करावी शमा तू माझ्या सुन्या मैफीलीत
त्या प्रकाशातच मी माझे जीवन उजळून घेईन 
स्नेहा ( देवराई ) 

का जगतेय मी...?


हे जगणे दिन झाले
श्वास क्षीण झाले
दिलासा नसे हुंदक्याना
अश्रुही मूक झाले

झाकोळल्या दाही दिशा
नभी सूर्य नसे
पुनवेची रात तरीही
अमावस्या ही भासे

आला बहर पालवीचा
हसे वृक्षा-लता
पण माझ्या फुलांना
एथे सुगंधही नसे

ऐक गान कोकिळेचे
ऋतू वसंत आला
पैजनांचे घुंगरू माझ्या
का माझ्यावरच रूसले

बरास्तात या सरी
किती आवेश घेऊन
मला चिंब होण्यास
तुझी उगीच ना आहे

शिशिरातला हा दवबिंदू
चमकतोय तुझ्या ओठांवर
टिपून घेण्यास त्याला
माझ्या ओठाना मनाई आहे

जगण्यास काय उरले
मग आता या आयुष्यात
तरीही त्या देवाची मला
जगण्यास बळजबरी आहे

स्नेहा (देवराई)

माझ्यातला तू.....


माझ्या कवितेला मिळते दाद
खर तर ती तुला हवी
जर तू आयुष्यात नसता
तर त्या कुठून जन्मती

हृदयातले प्रेम माझ्या
मनीचे भाव तुझ्या
गुंफुन तयार होते
माझ्या शब्दांची माला

माझ्या शब्दाना आता
तू ओळखीचा झालास
असतो माझ्या मनात
मग ते लेखणीत उतरतात

रहा असाच आयुश्यात
टिपुर चांदन बनून
मग माझ्या शब्द चांदण्या
नाचतील तुला फेर धरून 
स्नेहा ( देवराई ) 

तुझे डोळे....


तुझे डोळे म्हणजे खलखळनारी नदी
भासतात पापण्या नदीचे काठ

तुझे डोळे म्हणजे शांत डोह
वाटत त्यात बुडूनच जाव

तुझे डोळे म्हणजे साकीचा जाम
वाटत तो पिऊन व्हाव बेहोश

तुझे डोळे म्हणजे दोन शिम्पले
उघडले तू तर मोतीच चमकले

तुझे डोळे म्हणजे काळे काळे भोर
उजडतो त्यातूनच रामप्रहार

तुझे डोळे म्हणजे फक्त तरलता
प्रेमाचेच भाव उधळतात

तुझे डोळे म्हणजे बानांचा भाता
तू नजर टाकलिस की समोरचा गार

तुझे डोळे म्हणजे तुझ्या मनाचा आरसा
सुंदर, अप्रतिम तुझ्याचसारखा

तुझे डोळे म्हणजे लोहचुंबक वाटे
तुझ्याकडे पाहील की मी खेचली जाते

तुझे डोळे म्हणजे फक्त तुझेच डोळे
जगात नसणार ईतके सुंदर कोणाचे

स्नेहा {देवराई}

तुझ्या आठवणी....


आठवत मला समुद्रावर बसलेलो
हातात हात घेऊन,डोळ्यात डोळे घालून
पण तो स्पर्श आता शरीर जळत जातो

आठवत मला नेहमी तुझा होकार असायचा
माझ्या प्रत्येक अरेरावीला
पण आता ते शब्द डोळ्यात अश्रू आणतात

आठवत मला चांदण्या रात्री किती
बिलगुन असायचो एकमेकाना
आता त्या चांदण्या मला वाकुल्या दाखवतात

आठवत मला ,माझ्या बोटाना वेड होत
तुझ्या गर्भरेशमी केसांमधून फिरायच
तो रेशमी स्पर्श आता निवडुंग झाला वाटत

आठवत मला सर्व हळवे
प्रेमाचे क्षण तुझ्या बरोबरचे
वाटत त्या क्षणांमध्ये कधीच जिवंत श्वास नव्हता

आठवत मला काहीच नसताना
तू भांडून गेलास कायमचा
वाटत तू लायक नव्हतास प्रेमासाठी खर्या

स्नेहा (देवराई}

खर्या प्रेमाला नाही किंमत..


सर्व वाटा सरल्या
येऊन तुझ्या पाशी
बांधून ठेवले
किती दुख उराशी

आसव ही माझ्याशी
ना बोलती झाली
मी दुखात तरीही
मला उभी करेनाशी झाली

उधळत गेली हा जीव
ज्यांच्यावर ज्यांच्या वर किती
त्यानीच त्याला ठेचून
रक्तबबाळ केले किती

तुलाही नाही उमगली
माझ्या प्रेमाची व्याख्या
खर्या प्रेमाला नाही
किंमत कळले आता

स्नेहा (देवराई )

अश्रू बनून राहशील ना...?


भेटशील मला तू जेव्हा
काय माहीत केव्हा
आवडतेस तू मला
हे तू एकदा बोलशिल ना?

एकदा तरी हातात हात
आणि डोळ्यात डोळे
घालून तू जवळ माझ्या
एक संध्याकाळ बसशिल ना?

मी आणि पान फूल
सर्व पक्षी - बिक्षी
भिजतील या पावसात
तेव्हा तू माझ्या सोबत असशिल ना?

मी असें एकटी एकटी
रात्रीच्या उदास गर्भात
खिडकीतून मग तू हळूच
होऊन चंद्र डोकावशिल ना?

वैशाख वणवा लागला
माझ्या आयुष्याला उभा
उजाड माळरान झाल आयुष्य
मग तू गुलमोहर बनून छाया देशील ना?

मी नसेन कुठेच तुझ्या
आयुश्यात आणि स्वप्नात
तू मग्न असणार पण तुझ्याच विश्वात
पण अश्रू बनून माझ्या डोळ्यात तू राहशील ना??

स्नेहा (देवराई )

नामुमकीन.....


जमाने भर की कशिश दिल मे लिये
आँखो मे आंसू होंगे तुम्हारे लिये

लब्जो पे तुम्हारे ये दिल आ गया
कभी मेरा था अब तुम्हारा हो गया

दिल चाहता है तुम्हारी मुस्कूराहट देखू
वही हसी मेरी जिंदगी मे घोल दू


तनहा नही मै ,न रहुन्गि मै कभी
तुम्हारी यादो के होते ,मै अकेली नही

सिर्फ साथ राहणे का नाम प्यार नही
कभी दूर से आजमा के देखो तो सही

हार जाओगे तुम है मुझे यॅकीन
मुझसे बडा चाहनेवाला मिलना है नामुमकीन


स्नेहा(देवराई)

आक्रोश माझा तुझ्या शब्दांसाठीच.........


रोज रोज मरून उरायच
फक्त तुझ्या आठवणींवर
मी कस काय जगायच?

चांदण्यांची चादर नको
नकोय रातराणीचा अंगरखा
हवा आहे मला फक्त
सहवास तुझ्या उबदार स्पर्शाचा

झाकोळून गेले बघ मी
कठोर तुझ्या रोजच्या वागन्याने
मीच मला दिसत नाही आरशात
आसमांत भरला माझा तू दिलेल्या वेदनेणे

सारख सारख डोळ्यात काय रे.....
कधी ओठांवर पण बघ येऊन
कुठे मुक्काम करायचा ते
तू ठरव मग मला बघून

ना आहे मला कसली खंत,
ना आहे कसली उसंत
तुझ्या मोत्यासारख्या शब्दांची
मी मोहताज फक्त

उधळतॉस शब्द फुले तुझी तू
काही न राखता सर्वांवर
माझ्या साठीही हो ना मग कर्ण
मी ही प्रेम करते तुझ्या शब्दांवर

जपल्या किती मी मनात
हळूवार भावना तुझ्या साठी
नाही का रे ऐकू येत तुला
आक्रोश माझा तुझ्या शब्दांसाठीच

अश्रुंचा ओलावा,शब्दांची आर्तता
मनाची साद की हृदयाची हाक
हे सर्व नाही..मग काय जाणवेल तुला ???
तुझ्या ना झालेली माझी शोकांतिका.......

जाणवेल नक्कीच जाणवेल
माझ्या जिवंत मनाला नाही
पण माझ्या अचेतन शरीराला तरी
तुझ्या पश्चातापाचा स्पर्श होईल...................

स्नेहा (देवराई)

प्राक्तनाची जळ्मटे.............


पिवळा धम्मक गुलमोहर

जमिनिवर पड्ला

जसा पानान्मधुन

भास्करच सान्ड्ला



चाळ्नीच्या जाळीतुन

चन्द्र पाहिलेला

ठिकर्‍या ठिकर्‍या उडलेला

मला मात्र भासलेला



निजुन स्वप्न पहानार्‍यानो

नका येउ देउ स्वप्नाना

चान्द्ण्याचा प्रत्येक कोन

काढेल रक्ताची धार



वडाच्या झाडाला बन्दिस्त...

कोणी?? किती दोरे???

त्या पारमब्यानिच धरावे

बान्धनार्‍यान्चे गळे



रात्रिच्या गर्भात फक्त

घुबडाचे डोळे चकाकती

काजवे समजुन चालले

हे अवसेच्या राती



प्राक्तनाची आयुष्याला

लागली बघा जळ्मटे

हा परत एक चालला

कोळि परत गुरफटायला



स्नेहा (देवराई )

यातनान्चे पन्ख


यातनान्चे देउ का पन्ख माझ्या

बघ दुखात किति दुर उडता येत ते

सतीला आकान्ताने जळताना पाहिल का कधी

बघ तिच्या दुखाचा घट ठेउन मनी



नाचनारीच्या पायातला चाळ होतोस

अपमानाचा आवाज असतो प्रत्येक घुन्गराला



देवदासीच्या नवसाला पुरुन उरता येत?

दासी या शब्दाला भोगनार कोण मग?



अवदसा म्हनुन कपाळाला वगवतोस टिळा

बाल विधवेपेक्षा वाटतो कधी दारचा कुत्रा बरा



तु सौन्दर्याच्या खाणीतला हिरा .....चकाकनारच

पैलु पाडताना किति घण टाळनार मग



बायको होउन बघ ना नवर्‍याची कधी

करपेल स्वपनान्चे इन्द्रधनु त्याच्या नवरेशाही खाली



एकदा एक बलात्कारित स्त्री होशिल..

अपमनाच्या जीवघेण्या कळा उठतील तनामनात



बाईच्या गर्भातला मुलीचा गर्भ होतोस

बघ कसे खरवडुन काढुन तुला बाहेर देतील फेकुन



यातनान्चे घे ना तु माझ्या पन्ख

आणि एक तरी भरारी मारुन ये....................

बघ माझ दुखाच आकाश

आणि अश्रुनी भरलेले ढग...............



स्नेहा (देवराई)

तिचि जबाबदारी?????????????????????/


पुणे तिथे काय उणे

लहानपणापासुन ऐकलय

बरोबरच आहे.....पटलय

सन्तान्च्या वास्तव्याने पावन झालेली

देवदेवतानी युक्त असलेली

शिवाजी महाराजान्ची कर्मभुमी

पेशव्यान्चे वैभव भोगलेली

विद्येच माहेर घर असलेली

आजकालच्या कलाकारानी नटलेली

इन्द्रायणीच्या काठावर वसलेली........

पण म्हणतात ना चान्गल्या गोष्टिला गलबोट लागत...

तस लागल ह्या पुण्यनगरीला...........

बर्‍याच बायका करतात तशी ती नोकरी करणारी

नेहमी जी गाडी येत तीच आली घ्यायला

ती पण बसली आणि गेली..........

जरा वेळाने लक्षात आल तिच्या हा नेहमीचा रस्ता नाही

बराच आरडाओरडा केला तिने..पण गाडीत ८-१० जण होते

ती एकटीच्...काय करनार ती.........

नेल तिला दुरवर..........

आणि सर्वानी मिळुन कुसकरुन दिलि फेकुन तिकडेच लाम्ब..................

( हे सर्व रात्री नाही तर दिवसाच घडल आहे)

पकडले असतील सर्व नराधम

त्याना कोणती शिक्षा करुन तिच नुकसान भरुन येइल...

शरीराच्या जखमा येतील भरुन कदाचित

पण मनाच्या जखमा आयुश्यभर भळभळत राहतील,

कधी खपली धरलीच तर समाज आहे ना खरवडुन कढायला...........

स्नेहा (देवराई)

हिशोब इथेच द्यायचा.............


काहीच नाही जीवनाकडे

तरी आपण मागत राहतो

खोल खोल मडक्यात

उगीच भान्ड खरवडत राहतो



भाबडी आशा मनात ठेवुन

एक एक दिवस ढकलत राहतो

आजच दुख पचवुन उराशी

आशा उशाशी थेवुन झोपतो



प्रारब्ध ,प्राक्तन यान्च्यात

स्वताहाला आपन खेळवत राहतो

नशिबाच्या जाळ्यातच आपणच

अधिकाअधिक गुन्तत जातो



जन्मापासुन मृत्यु पर्यन्त

आपन फक्त प्रवास करतो

हा प्रवास करवला जातो

विध्यात्याने आधीच लिहिलेला असतो



आपल्या नशिबाच्या दुखासाठी

उगाचच दुसर्‍याना जबाबदार धरतो

आपल्या दुखाच निमित्त

विध्यात्यानेच त्याना केलेल असत



जन्माला येवुन प्रत्येक क्षणाचा

हिशोब इथेच द्यायचा असतो

हात -कपाळाची प्रत्येक रेष

इथेच वाचुन जायच असत



स्नेहा {देवराई }

आमचा......आमचे......


आमची सन्स्कृती आमचे बाणे

रात्री उशाला दारुचे पेले



आमची मुल्ये आमची वचने

मिनिटा मिनिटाला धुराची वलये



आमचे भवितव्य आमच्या पिढ्या

बापजाद्यान्ची उडवतात दौलत रात्री गाड्या



आमचा मान आमची शान

बाई दिसली कि नजरेत घाण



आमची चिकाटी भविष्याची हाकाटी

भ्रष्टाचारापाई हे कुत्र्यान्चे तळवे चाटी



आमचे सण आमच्या परम्परा

विचित्र गाणी लावुन फक्त विकृत नाचा



आमच्या रुढी आमच्या पद्धती

बाईला सती करुन गळ्यात हुन्ड्यासाठी दोरी



आमचे अणु करार आमची अणु उर्जा

पण मुलीना मात्र गर्भातच मारा



आमची सुन आमचा मुलगा

म्हातार्‍या आई-बापाना मात्र वृद्धाश्रमात धाडा



आमचा भारत आमचा इन्डिया

बाजारात नेऊन विकायला मांडला


स्नेहा (देवराई)

भेटला एक अनाडी..


कशी रचु मी शब्द्फुले

कसे रन्गवु भाव त्यात

झरा आटला तुझ्या प्रितिचा

कशी भिजु मी त्यात सान्ग??



झरतो झरा प्रेमाचा तुझ्या

तरी तु त्यातला नर्मदेचा गोटा

फक्त शब्दन्ची उधळुन करुन

त्यातले अर्थ जानणार कोन??



गोड गुपितान्ची गुहा ह्रुदय

ठेवल्या जपुन प्रेमाचे क्षण

तु ठेवला दगड गुहेवर

त्यात दिवा लावणार कोन??



भावतरन्ग मनीचे माझ्या

येवुन आदळतात तुझ्यावर

झेलुन त्याना तनामनावर

माझ्या प्रेमात पडनार कोन??



फुटतात अश्रुन्चे बन्ध खुप

डोळ्यासमोर तुझेच रुप

रडताना नाकात शेम्बुड खुप

तुझा रुमाल माझ्या पर्यन्त आणणार कोण??



स्नेहा (देवराई )

त्रासिक मित्र............


मारुन शब्दान्च्या बाणानी

काय मिळवले तु

दिसले ना अश्रु तुला

जरी जखमा खुप



माझे शब्द प्रेमाचे

तुला भासे टोमणे

अबोलीच्या फुलाला का

येउ नये बोलणे



प्रेमाची ओल माझ्या

वाटे तुला फक्त वर्ख

का येतो तुला त्यात

कुचकेपणाचा दर्प



उघड मनाची कवाड

चान्दन्यात भिज शब्दान्च्या

अरे माझे शब्द आहेत ते

नक्षत्र होतील तुझ्या आयुष्यी



प्रेमाची ओल आहे ही

तुझ्या माझ्या मैत्रीतली

रुजेल तिथेच बी

एक सकस नात्याची



पेटाया मैत्रीची ज्योत

लागते तेल प्रेमाचे

मी होते वात जळन्या

तु हो तेल तेवण्याचे...



स्नेहा (देवराई )

मेरी दिवानगी...........


जाओगे तह तक नजर की मेरे
गौहर मिलेन्गे भरभर कर तुम्हे

दिल से मै चाहती हु
तुम्हारी आन्खो मे बस जाउ

अगर नही जगह मेरी वहा
तुम्हारे नजर के जाम तो पि लु

कभी समझ लो मेरी नजर का कहना
दिया तुमने मुझे वहा अश्को का गहना

जरा सम्भालो तुम अपनी नजर को
कयामत ढाती है जब मुझपर पडती है

झाको मेरी आन्खो मे मन्जर तो देखो
जानोगे कितने खन्जर तुमने चलाये दिलपर

जुबा की छोडो बस आखो कि समझ लो
मेरी दिवानगी तुम्हे मिलेगी वहीपर

स्नेहा (देवराई )

निरोप त्याचा...ढगाने आणलेला.......


एक आकाश पहायच
दोघानी एकावेळी
परावर्तीत होतील का
माझे भाव त्यावेळी?

भाव परावर्तीत होताना
ढग होतिल किरमिजी
एक जण उतरुन म्हणेल
मी तिची नजर आणली

बघताना त्या नजरेत तुला
दिसेल सर्व रन्गीबेरन्गी
परत माघारी धाडशील का
तुइझे हास्य त्याच्या सोबती

वाट बघत मी उभी
निरोप तुझा येतो कि नाही
काळा निळा एक ढग
दिसला येताना माझ्यापाशी

मी उभी स्तब्ध्,निश्चल
बसले त्यात रन्ग शोधत
हसुन मला म्हनतो कसा
त्याने दिलाय निरोप तुला

बेचैन मी निरोप काय
तर ढग धोधो बरसला
आणि म्हणाला हा निरोप घे
त्याची ही नजर आहे

ढग बोलला ताकिद त्याने दिली मला
भिजव माझ्या नजरेत तिला
होइल ओलेती ती जेव्हा
इकडे ह्रुदयाला जाणवेल माझ्या

स्नेहा (देवराई )

व्याकुळता ...


हिर्‍याच्या झळाळीने

स्वप्नात माझ्या उतरावे

मनातल्या दिव्याना

माझ्या पेटवुन जावे



वाळलेल्या पानान्चा ढिगारा

साप लपुन बसला

चाहुल तुझ्या पायरवान्ची

सपकन फणा काढला



शब्द भेद माझे तुला

कळतात अर्थ सर्व

पण परतावा असा की

जसे नपुसन्काचे वीर्य



अन्तर असले शरीरात

स्वप्नातला सन्ग उधळतो

स्मरणातला सन्ग स्मरुन

सर्वान्गाला कापत जातो



तुझ्या रन्गात रन्गुन

मीच दिशा हरवली

तुझ्या मनातल्या दवबिन्दुत

स्वप्नान्ची किरणे सान्डली



चन्द्रपाणी पिवून निशा

माझ्या सोबत निजली

माझ्या स्वप्नातल्या तुला

बघायची तिलाही घाई..



स्नेहा (देवराई)

पाण्याविना तडफडनारा मासा .............


अबोला धरु नकोस
चुक नसताना माझी
मनात नकळत आलास
जाणुन बुजुन का करत कोणी?

हा भावनान्चा आलेख
राहिल फक्त माझ्याकडे
कधीच नाही येणार
जमाखर्च तुझ्याकडे

मैत्रीतही प्रेम असतच ना
शिलालेख हा त्याचाच
निखळ,निरपेक्ष्,पारदर्शी
कोणताच मुलामा नसलेला

तुझ मला आवडन
सान्ग यात वावग काय?
कोणावर समरसुन प्रेम करण
हा गुन्हा होतो काय?

केला उघड तुझ्यासमोर
माझ्या मनाचा आरसा
अबोला धरुन करु नको मला
पाण्याविना तडफडनारा मासा

स्नेहा (देवराई )

नियति.........


सावलीने कधी करुणा भाकावी

उजेडालाही मग लाज वाटावी



डोन्गरानी रुसाव्,समुद्रात लपाव

सर्व माशानी मग झाडावर जावुन बसाव



देवुन देवुन पाय तिला पायवाट बनवावी

अन्कुरन्याची निर्मिती वान्झ बनवुन टाकावी



कडेलोट जीवनाचा स्वरानी करावा

मागे एक बेसुर ताल पिच्छा पुरवत रहावा



आपल्याला जे सुलट वाटवाघळाने उलट म्हनाव

इथेच नियतिने खदाखदा हसाव



स्नेहा (देवराई )

माझ आकाश विस्तारतय.................


माझ आकाश विस्तारतय

नाही ना बघवत तुला

झापड लाव मग घोड्यासारखी

आजुबाजुला काही दिसु नये म्हणुन...



थोड मुक्त व्ह्यायच म्हणतेय

तुमच्याच करकचुन बान्धल्या गेलेल्या रुढीमधुन

का नाही???तुझ बाहेरच जग......

माझ्या नजरेच्या टप्प्यात येइल म्हणुन???



चमक तर होतीच्....पण आता

दाखवावी म्हणतेय मीही जगाला

का??उम्बरा का नाही ओलन्डायचा

झाकोळुन जाशील का ढगा आडच्या चन्द्रासारखा?



समजु नको तु मला अबला

दुर्गा.चन्डी,महाकाली होता येत मला

तु ही तुझ्या मनाच क्षितिज विस्तार ना...

की बनवु टाकलेल्या काती पासुन विषाचा प्याला?????



स्नेहा (देवराई)
उन लम्हों को गुस्ताख ना कहो

उसकी यादे समाइ हुई है उसमे

साहील न मेरा बन सका तो क्या

किसी और कश्ती लगा देगा किनारे



दिये खार फिर भी मलाल नही

प्यार का जुनू जो है सवार

मेरे अहसास मे उसके लिये

रहेंगे सदा गुलाब खिलकर



तनहा सही हम महफिल मे चलो

यादों कि रोशनी तो मन मे होगी

उठेगी बात जब मेरे आसुओं की

उसके तज्कीरे के सिवा खत्म ना होगी



स्नेहा (देवराई )

रस्त्यावर होते पुढे वळन आपल्या निरोपाचे...........


ह्या काट्याना उलट उलट फिरवतेय

आणि थांबेल जेव्हा तु कोणाचाच नव्हता तिथे

म्हणजे मग मला तिथुन तुझ्याबरोबर चलता येइल



काल माझ्या बाजुच्या किनार्‍यावर ओहोटी लागली

कदाचित तिच्या किनार्‍याला भरती असेल

भरती -ओहोटी ठरवनारा चंद्र तिकडे होता का?



माझ्या शब्दातुन दिसते हृदय जळताना

आयुष्याच्या त्याच्या वाटेवर प्रकाश रहावा म्हणुन

सोबत आहे बरोबर्.प्रकाशची थोडी उणीव होती



छान विणायला घेतल होत मी नवीन नात

एक रंग माझा,एक रंग तुझा ,पण अपुर्ण राहील

तुझ्या रंगाचा दोरा बाजारात कुठेच मिळत नाहीये



सगळ सगळ रक्तबंबाळ्,तुकडे तुकडे उडालेले

शोधतेय मी कुठेच काही दिसत नाहीये

मग मनात येउन समजल स्वप्नांचेच तुकडे होते उडालेले



हा एक दवबिंदु ओठांवर माझ्या कुठुन आला

घरात मी बंद,घराची दारे -खिडक्या बंद

वर पाहिल तर फुटक्या कौलातुन तुझ्या आठवणी लोंबतायेत



क्षण बरेचसे झेलले निवांत मैत्रीच्या कुशीतले

पण त्याना घर मिळाले पापन्यांच्या अश्रुतले

रस्त्यावर होते पुढे वळन आपल्या निरोपाचे



स्नेहा (देवराई)

फानुस बनकर मिलोगे क्या...........


गुजरे लम्हों की कसम है तुम्हे

पाइ थी तुमने दिवानगी मेरी

कभी बैठ के इतमिनान से

देखो उनकी रवानी कभी



साहील बनाना चाहते थे

प्यार की कश्ती के मेरे

भवर मे छोड मुझको

पलट के भी नही देखा तुमने



तज्कीरा तो आयेगा तेरा

मेरे हर अश्क के साथ

खार दिये है कितने तुमने

प्यार के गुलाब के हाथ



जुनू मेरे प्यार का

महसूस करोगे मेरे लब्जों मे

कभी आइने मे झाको

तुम्हारे पिछे हम नजर आयेंगे



जुस्तजू तो रहेगी सदा

जिंदगी मे तेरे प्यार की

फानुस बनकर मिलोगे क्या

अंधेरी राह पर कभी?



स्नेहा (देवराई )