Monday, December 26, 2011

तुझेच रोज व्हायचे.......


तुझेच रोज व्हायचे प्रिया असे हळू हळू
नभात भेटती शशी निशा जसे हळू हळू

अता कुठे मला दिसे वसंत रोज पाहुणा
फुले फुलेच शोधती तुला कसे हळू हळू

तुला मिठीत घेउनी नभापल्याड जायचे
न भेटताच चांद तो प्रिया रुसे हळू हळू

गुलाबशेज नाहते कुशीत नाजुकेसवे
मुजोर तो मनी तिच्या सख्या वसे हळू हळू

हळद पावले तुझी घरात आज पाहिली
गजांत योग भासला तुझ्या ठसे हळू हळू

बेहेरे मकरंद

No comments:

Post a Comment