आता हवे कशाला खोटे वृथा बहाणे
कोन्यात बावरूनी पदरास वेढताना
लाजून गेली रंभा तुझिया अशा अदेने
ओठात दात रुतला, नयनात साद आहे
ये ना कवेत माझ्या कळु दे तुझे उसासे
उरला सवाल का तो तुझिया मनात राणी
जपल्या खुणेस आता, वदले तुझ्या बटेने
हळुवार मोगर्याची फुलली फुले कशाला
मकरंद तो दिवाणा झुलतो कसा नशेने.....
बेहेरे मकरंद
No comments:
Post a Comment