Monday, December 26, 2011

आता कशाला हे बहाणे.....


आता बहाणे हे कशाला, जवळ तू येना जरा
वेचून जा ना चांदण्याला माळ गे ताराफुला

का वाट बघतो चांद तो, ती रात येई याद का
दोघांस आहे ओढ अन् मिलनास आता देर का
ही शेज विरहा सोसते, तू साथ ती देशील ना

बोलावयाचे आज ना, सांगावयाचे आज ना
समजेल माझा जीव ही, ह्रद्यातली तव बात ना
ये तू जराशी साजणे तोडून सार्‍या बंधना

केसात काळ्या मी तुझ्या, फसलो कसा रुतलो कसा
ओठी गुलाबी ओठ माझा प्राशतो तव अमृता
दे ना विषाचा घोट ही मरतो सुखे बाहूत या


बेहेरे मकरंद

No comments:

Post a Comment