Thursday, January 27, 2011

तुला रोज येतो कधीही शहारा

तुला रोज येतो कधीही शहारा
कसा सांग व्हावा ? नशेचा उतारा

किती ऊन सोसून मी वाट पाहू ?
तुझ्या सावली चा मला दे किनारा

बिछाना च होईल आकाश गंगा
तु ये ना जरा लाजवू शुक्र तारा

उभा जन्म काट्यात आहे तरीही
तुझी आस आहे सुगंधी फुलोरा

जरी अंगणे विस्तवाचीच माझी
तुझ्या आठवांचा मिळो गार वारा

अनाहत तुझ्या अंतरी मीच आहे
मुक्या काळजाचा घुमे हा दरारा

...मयुरेश साने

वेडी....... विंदांची कविता......



एका ढगाला कुशीत घेऊन झोपली,तेव्हा तिला गर्भ राहिला.
पुढे सर्व सुरळीत झाले.आपल्या घरातील मातीचे मडके
मनमुराद फोडून ती देहान्ताच्या यात्रेला निघाली.
वाटेत तिला गाढव भेटले,तिने त्याची समार्म्भपूर्वक पूजा केली.
धुपाटण्यांतला उरलासुरला धूप कनवटीला लावून ती म्हणाली,
"ह्याचीसुद्धा राख होती तर कोणाला काय सांगणार होत्यें?
पण दैव शिकंदर आहे म्हणून कुत्र्यासारखे पुढें जाते."
नंतर तिने वडाची पाने पिंपळाला लावली;आणि म्हणाली,

"आता मी कूणाचे काही लागत नाही,पौर्णिमीवढेहि".
पुढे सर्व सुरळीत झाले(हे मागे सांगितलेच आह.े)
वेडीला वीज झाली;आपले स्तन विजेला देऊन
वेडी आपली पुढे गेली;वाटेमध्ये विदूषक भेटला;
राजा भेटला,राणी भेटली;’अ’ भेटला,’ब’ भेटला;
पण वेडी शहाणी होती;तिने कोणालाच ओळखले नाहीं.


------विं. दा. करंदीकर.

फसगत


गेल्या पावसाळ्यात
शब्द पक्षी बनून
देशांतरास गेले !

मग ढगांनी डोळ्यांना समाजावले,
ढगांचे दुख:
मग
डोळे कायम कोरडे राहीले ....

पुन्हा आभाळाकडे डोळे
लावले,
तर पक्षी आले परत,
शब्द मागे ठेऊन !

ढग आले परत पावसासह,
सरीवर सरी कोसळल्या,
डोळ्याना जाणीव झाली,

फसगतीची...........................

--पुन:श्च

Tuesday, January 25, 2011

तसे किती काटे रुतले - गाणारे झाड़


तसे किती काटे रुतले आमुच्या गतीला,
तुझा सूर केवळ होता एक सोबतीला..

अनोळखी बनले अवघे सोबती यशाचे,
दूर दूर झाले सारे सोयरे सुखाचे..
कुणीही न पुसले डोळे हाय त्या घडीला,
तुझा सूर केवळ होता एक सोबतीला..

कसा हाय घरट्यांचा ही उडाला निवारा,
तुझ्या चार चिमण्यांसाठी राहिला ना चारा..
दार दार परके झाले मायबापडीला,
तुझा सूर केवळ होता एक सोबतीला..

मग हळूच आम्हांलाही तुझे पंख आले,
मग हळूच आमुचे डोळे सूर्य-चंद्र झाले..
दिशा दिशा तेवत उठल्या तुझ्या आरतीला,
तुझा सूर केवळ होता एक सोबतीला..

रचना : सुरेश भट
अल्बम : गाणारे झाड़

अन कुणाला राग आला जर कधी...


शब्द फ़ुट्ला वेदनेला जर कधी
काळजाला सुर गवसला जर कधी

जाळूनी टाकील ब्रह्मांडास हा
उघडला तो नेत्र ओला जर कधी

ही कुणाची पालखी भोई कुणी
आडवा रस्ताच आला जर कधी

हे नको नि ते नको मी का करु
कोण आले चौकशीला जर कधी

कोणत्या शब्दांत मांडू भावना
बोलतांना जीव गेला जर कधी

प्रेम करणं सोपं नसतं.....................


प्रेम करणं सोपं नसतं

सर्व करतात, म्हणून करायच नसतं

चित्रपटात बघीतलं, म्हणून करायच नसतं

पुस्तकात वाचलं , म्हणून करायच नसतं

तर कुणाकडून ऐकलं, म्हणून करायच नसतं

कारण प्रेम करणं सोपं नसतं

शाळा कॉलेजांत असच घडतं

एकमेकांना बघीतलं की मन प्रेमात पडतं

जागेपणी ही मग प्रेमाचं स्वप्नं पडतं

ज्या वयात शिकायचं असतं त्यावेळी भलतचं घडतं

करीयरचं सत्यानाश तर आयुष्याचं वाटोळं होतं

सहाजीकचं मग आईवडीलांच्या ईच्छांवर पाणी पडतं

कारण प्रेम करणं सोपं नसतं

हॉटेल सिनेमागृहात नेहमी जावं लागतं

पैशाचं बजेंट नेहमी बनवावं लागतं

फोन कडे नेहमी लक्श ठेवावं लागतं

मग जागेपणीही स्वप्न दिसायला लागतं

डोक्याला ताप होऊन डोक दुखायला लागतं

आनंद कमी दुःख जास्त भोगावं लागतं

एवढ सगळं करणं खुप कठीण असतं

कारण प्रेम करणं सोपं नसतं...............

गुंतवण.....


का असा देव दगडात, शोधत राहीलो मी ?
का मनीच्या भावनांना, रोधत राहीलो मी ?

का नाही जमले, मला स्वार्थीपणे वागणे ?
का असा दुसार्‍यांसाठी, झगडत राहीलो मी ?

शब्दांनी सावरले नाही, व्यथेला आवरले नाही;
का असा माझ्याच श्वासात, घुसमटून राहीलो मी ?

केली मी प्रित, जीव ओवाळला....
तरीही का मनाने, अधुरा राहिलो मी ?

जळाली भावना, मेले माझे मन...
तरीही हास्याला ओठांवर, का फुलवत राहीलो मी ?

Monday, January 24, 2011

हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...





आपलं जे असतं;
ते आपलं असतं
आपलं जे नसतं;
ते आपलं नसतं
हसतं डोळे पुसुन आतुन फळासारखं पीकलो
हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...


आलेला मोहोर;
कधी जळुन जातो
फुलांचा बहर;
कधी गळुन जातो
पुन्हा प्रवास सुरु केला, जरी चालुन थकलो
हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...


कधी आपलं गाव;
आपलं नसतं
कधी आपलं नाव;
आपलं नसतं
अश्या परक्या देशात वाट नाही चुकलो
हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...


पींजऱ्यात कोंडुन;
पाखरं आपली होत नाहीत
हात बांधुन;
हात गुंफले जात नाहीत
हे मला कळलं तेंव्हा हरुन सुध्दा जींकलो
हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...


झाड मुकं दीसलं तरी;
गात असतं
न दीसणाऱ्या पावसात;
मन न्हात असतं
कळोखावरं चांदण्याची वेल होऊन झुकलो
हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...


-मंगेश पाडगांवकर
गाडी मिरवणाऱ्या श्रीमंत पेक्षा
झोपडीत हसणाऱ्या गरीबाकडे पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत.......

नशिबाची चाकरी करण्यापेक्षा
कर्तृत्वाला आपल्या हाताखाली बाळगाव
आयुष्य जास्त सुंदर बनत..........

भविष्याचे चित्र काढण्यापेक्षा
वर्तमानातल पूर्ण कराव
भूतकालातल रंगवून पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत.........

कायमच मागण्या करण्यापेक्षा
कधीतरी काहीतरी देऊन पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत......

हरल्यावर एकटेच पश्चात्ताप करण्यापेक्षा
मित्राच्या खांद्यावर रडून पहावं
आयुष्य नक्कीच सुंदर वाटत...........

चारचौघात एकट बसण्यापेक्षा
कधी कधी समुद्रकिनाऱ्यावर आठवणींना घेऊन बसावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत........

आपल्याला कोण हवंय यापेक्षा
आपण कोणाला हवंय हे सुद्धा कधीतरी पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत......

आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत................

यात काही पाप नाही


सिगरेटचा जेव्हा तुम्ही, मजेत घेता मस्त झुरका,
आवडलेल्या आमटीचा, आवाज करीत मारता भुरका,
विश्वास ठेवा यात काही पाप नाही,
आनंदाने जगायचं नाकारणं, याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही !
जबरदस्त डुलकी येते, धर्मग्रंथ वाचता वाचता,
लहान बाळासारखे तुम्ही, खुर्चीतच पेंगू लागता,
विश्वास ठेवा यात काही पाप नाही,
आनंदाने जगायचं नाकारणं, याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही !
देवळापुढील रांग टाळून, तुम्ही वेगळी वाट धरता,
गरम कांदाभजी खाऊन, पोटोबाची पूजा करता,
विश्वास ठेवा यात काही पाप नाही,
आनंदाने जगायचं नाकारणं, याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही !
प्रेमाची हाक येते, तुम्ही धुंद साद देता,
कवितेच्या ओळी ऐकून, मनापासून दाद देता,
विश्वास ठेवा यात काही पाप नाही,
आनंदाने जगायचं नाकारणं, याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही !


--मंगेश पाडगावकर

नसलेल्या आजोबांचं असलेलं गाणं



जेवताना आजोबा लाडात येत,
मला आपल्या ताटातली भकर देत;
जेवता जेवता मधेच थांबत
आणि एक भला मोठा ढेकर देत !

मी म्हणायची रागवूनः
"आजोबा, बॅड मॅनर्स,
व्हॉट आर यू डुइंग?"
आजोबांचं हसून उत्तरः
"आय अॅम जस्ट ढेकरिंग !"

आजोबांच्या खोलीत आता
धुकं... धुकं... धुकं...
आजोबांचं जग सगळं
मुकं...मुकं...मुकं...

आजोबांना पडलं होतं भलंमोठं टक्कल !
आजोबा म्हणायचेः
"ज्याला असं टक्कल
त्यालाच असते अक्कल !"
मी खिजवून म्हणायचोः
"आजोबा, यमकासाठी
घ्या आता बक्कल !"
आजोबा मोठयाने ओरडून म्हणतः
"अरे साल्या यमक्या,
मला देतोस धमक्या?यमकांच्या धंद्यामधे
मी आहे खमक्या !"

आजोबांच्या खोलीत आता
धुकं... धुकं... धुकं...
आजोबांचं जग सगळं
मुकं...मुकं...मुकं...

आजोबा आपल्याच नादात
स्वतःशीच गात असत,
गाता गाता मधेच थांबून
स्वतःशीच गोड हसत !

मी जवळ गेले की
मला म्हणतः
बेटा एक लक्षात ठेवः
एकटं एकटं जाता आलं पाहिजे;
स्वतःला स्वतःशीच गाता आलं पाहिजे !"

मी गोंधळून विचारीः
"म्हणजे काय?"
आजोबा मोठयाने हसून म्हणतः
" म्हणजे काय? म्हणजे काय?
म्हणजे नाकात दोन पाय !"

आजोबांच्या खोलीत आता
धुकं... धुकं... धुकं...
आजोबांचं जग सगळं
मुकं...मुकं...मुकं...

"आजोबा, एक गोष्ट विचारु?"
"विचार बेटा!"
"आजोबा, तुम्हांला मैत्रिणी होत्या का हो?"
"वा! वा! होत्या म्हणजे होत्याच की !
एक ती अशी होती,
दुसरी ती तशी होती !"

इतक्यात खोलीत आजी यायची,
आजोबांची जीभ एकदम बोबडी व्हायची !
आजोबा स्वतःला सावरायचे,
चटकन विषय बदलायचे,
घसा खाकरत म्हणायचेः
"बेटा, तुला गीतेमधला
स्थितप्रज्ञ कसा असतो ठाऊक आहे?
चालतो कसा, बोलतो कसा ठाऊक आहे?"

आजोबांच्या खोलीत आता
धुकं... धुकं... धुकं...
आजोबांचं जग सगळं
मुकं...मुकं...मुकं...


आजोबा संध्याकळी
अंगणातल्या झाडाखाली
आपल्या आरामखुर्चीवर
एकटेंच बसत;
एकटक डोळे लावून
दूर कुठे बघत असत...
दूरदूरच्या ढगात असत,
कुठल्या तरी न दिसणा-या जगात असत !!

पाय न वाजवता मी हळूच
तिथे जाई,
त्यांच्या आरामखुर्चीमागे
उभी राही!
काय बघत असतील हे?
मी दूर पाहीः
मला वेगळं काहीसुध्दा दिसत नसे,
तीच घरं...तीच झाडं...
सगळं अगदी तसंच असे !

पाय न वाजवता मी हळूच
परत मागे घरात यायची;
आजोबांची आरामखुर्ची
सावल्यांमधे बुडून जायची !

- मंगेश पाडगांवकर 

प्रेम म्हणजे प्रेम असतं


प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं काय नि आमचं काय,
अगदी सेम असतं!

मराठी मध्ये इश्य म्हणुन प्रेम करता येतं,
ऊर्दू मध्ये इश्क म्हणुन प्रेम करता येत!
व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं,
कान्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं!

लव्ह हे त्याचचं दुसरं नेम असतं!
प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं काय नि आमचं काय,
अगदी सेम असतं!

वयाची सोळा जेव्हा सरु लागतात,
जागेपनी आठवणीचे झोपाळे झुलू लागतात.
आठवत का?
तुमची माझी सोळा जेव्हा सरली होती,
होडी सगळी पाण्याने भरली होती!
त्या होडीवर आनंदाने बेभान होऊन नाचलो होतो,
होडीसकट बुडता बुडता वाचलो होतो!
बुडलो असतो तरी सुद्धा चाललं असतं,
प्रेमानचं अलगद वर काढलं असत!

हे तुम्हाला सुद्धा कळलं होतं
आणि मला सुद्धा कळलं होतं; कारण,
प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं काय नि आमचं कायं,
अगदी सेम असतं
प्रेम म्हणजे प्रेम असतं!

तिच्या लग्नाची पत्रिका आज घरी दिसली...

 
 
 
तिच्या लग्नाची पत्रिका आज घरी दिसली,
थरथरत्या हातांनी त्यावरची आसवं पुसली,
एक आसू नेमका तिच्या नावावरच पडला,
नाव ख़राब होइल, म्हणुन पुसनारा हात अडला...,
दोन-चार थेम्बं तिच्या बापाच्या नावावरही पडली होती,
ज्याच्याकडे पदर पसरवून ,'ती' माझ्यासाठी रडली होती,
एक थेम्ब पडला तिथे, जिथे आप्तांची नावे दाटली होती,
बहुदा माझ्यासोबत फिरताना, तिला ह्यांचीच भीती वाटली होती.,
'आमच्या ताईच्या लग्नाला नक्की यायचे हं'..,
यावरही एक थेम्ब पडला,
'ताई तू जा, मी नाही सांगणार कुणाला,..
तो भाबडा बोल आठवला...,
काही घसरलेली आसवं, लग्नस्थळ दर्शवत होती,
अगदी त्याच्याच समोर आमची भेटायची जागा होती,
'अहेर आनु नये' यावरही थोडा ओलावा होता,
तिच्या बर्थडे गिफ्ट साठी, मी मोबाइल विकला होता.......,
सगळी मित्रमंडळी माझ्यावर हसली.,
तिच्या लग्नाची पत्रिका आज घरी दिसली.......,
आज घरी दिसली............!
 


Thursday, January 13, 2011

काल तुझ्या हातावरची रेषा पाहिली आणि वाटलं, माझ्या हातावरची कवितेची रेघ तुला द्यावी आणि कविता म्हणून तुलाच माझ्या हाती घ्यावी... पण मागाहुन कळालं, असं रेषा बदलून काही होत नसतं... कारण... वर... आभाळात... तो बसलेला असतो, रेषांची लांबी ठरवायला... आता मी हातावरच्या रेषांकडे बघणंच सोडलंय... मधूनच बघतो आता, तुझ्याकडे...  रेषांमधून कॉन्टॅक्ट करण्यापेक्षा सरळ बघणं बरं ना...!!!

Saturday, January 8, 2011

मी.......


वाटे घातलेत आयुष्याचे
मी नाही, तुम्हीच माझ्या
उभी मी निस्तब्ध, निशब्द
या वैराण आयुष्यात

जिकडे जाव तिकडे फुले
पण ती तुमची
काटे त्या बरोबरचे
आहेत माझ्या वाट्याला

पाण्यात डोकवून सुद्धा
नाही दिसत प्रतिबिंब
इतकी सोलवट्ली गेली
आता मीच माझी नाही

जळाव की नाही पटकन
लाकडानी आता सारणावरच्या
पण हे सर्व उभे कोल्हे
भिजवत आहे उगीच अश्रूनी त्याना

माझ्यासाठी इतकेच कर...


माझ्या अश्रूं वर आता
एक उपकार कर
घाल शपथ डोळ्याना
बाहेर यायला बंदी कर

तुझ्या आठवणी
मागत आहे मेहेरबानी
प्रत्येक आठवण होऊन
चांदणी लुकलुकायच नभी

माझ्या काही क्षणांवर
आज तू दया कर
प्रेमात भिजवून तुझ्या
त्याना अजरामर कर

आता हे हुंदके ही
आहेत आशेने बघत
कधी घेशिल ओढून
मला पटकन जवळ

जखम....


समजतो शब्दानचा आक्रोश
कोण ऐकणार मनाचा
उसन्या हास्यामागे
लपउन झाकायचा
आक्रोश मनाचा आपल्या
त्याच त्याच खपलया
त्या बरया नाही होनार
तू कधि नाही येनार
मलाही आता आवडत खपलया निघालेल्या
त्याचया आठवानित भळाभळा वहायला

निशब्द.....


म्हणतात प्रत्येक गोष्टीला
असतो उगम
तसाच आहे
माझ्या कवितेलाही

मी त्याच्या वर केलेले
जीव ओतून प्रेम
आणि त्याने केलेली
माझी फक्त उपेक्षा

उपेक्षा घर पाडून
जाते काळजाला
आसवान्चि धार
माझ्या डोळ्याना

मग शब्द उतरतात
त्या घरांमधून
दुखचे दागिने लेऊन
बसतात ओळीने जागा पकडून

तुमच्या मनाला भिडतात हे शब्द
पण तो पर्यंत झालेली असते मी निशब्द

वेदना..


आता मनाने तरी किति खचाव
प्रत्येक वेळी का उगी बसाव

हृदयाने किति जखमा झेलाव्या
जगसमोर कशा लपवाव्या

आता हे डोले येतात सारखे भरुन
काय फायदा नेहमी अश्रु ना रागाउन

वेदनाही थकल्या मला त्रास देउन
मी सोसते त्या सर्व हसुन

नाहीस ईथे पन तू सर्व जानतोस
तुझा शिवाय सम्पतेय हे तूही मानतोस

फक्त तुझ्यासाठी.....


जरी न घेतल्या आणाभाका
साथ सोबतीने राहण्याच्या
तरीही माझ्या सर्व भावना
असतील तुझ्या सोबतीला

असेल माझ्या स्वप्नात नेहमी
सारखी तुझीच चाहूल
जरी तू देऊन जाशिल
नेहमी सारखी मला हुल

माझे हुंदके ,उसासे
का तुला जाणवत नाही
ओठींचे शब्द माझ्या
असतात फक्त तुझ्यासाठी

कसला समाज,कसली बंधन
दिलय सगळ झुगारून
तुझ्यावर प्रेम करतेय
माझ्या मनालाच विचारून

विसरशिल म्हणता म्हणता
मला नाही विसरू शकणार
जीव ओतनारी माझ्या ईतकी
तुला कधीच नाही मिळणार 
 
स्नेहा ( देवराई )  

माझा होशील.........


तुझा संग मी कधी ना भुलावा
अंगणी माझ्या तुझ्या आठवणींचा सडा पडावा

तुझ्या रंगात मिसळून माझा रंग
तयार व्हावा आयुष्याचा एक नवा रंग

माझ्या ओंजळीत तुझी शब्दफुले पडावी
त्याचीच मला मी आयुष्यभर जपावी

तू घ्यावे पिऊन पूर्ण मला तुझ्या नजरेने
नजरेच्या तुझ्या प्याल्यात मी बेहोश व्हावे

असावी माझी जागा तुझ्या अंतरी कुठेतरी
जाणीव ठेवेल ही मला जिवंत कसेतरी

रोशन करावी शमा तू माझ्या सुन्या मैफीलीत
त्या प्रकाशातच मी माझे जीवन उजळून घेईन 
स्नेहा ( देवराई ) 

का जगतेय मी...?


हे जगणे दिन झाले
श्वास क्षीण झाले
दिलासा नसे हुंदक्याना
अश्रुही मूक झाले

झाकोळल्या दाही दिशा
नभी सूर्य नसे
पुनवेची रात तरीही
अमावस्या ही भासे

आला बहर पालवीचा
हसे वृक्षा-लता
पण माझ्या फुलांना
एथे सुगंधही नसे

ऐक गान कोकिळेचे
ऋतू वसंत आला
पैजनांचे घुंगरू माझ्या
का माझ्यावरच रूसले

बरास्तात या सरी
किती आवेश घेऊन
मला चिंब होण्यास
तुझी उगीच ना आहे

शिशिरातला हा दवबिंदू
चमकतोय तुझ्या ओठांवर
टिपून घेण्यास त्याला
माझ्या ओठाना मनाई आहे

जगण्यास काय उरले
मग आता या आयुष्यात
तरीही त्या देवाची मला
जगण्यास बळजबरी आहे

स्नेहा (देवराई)

माझ्यातला तू.....


माझ्या कवितेला मिळते दाद
खर तर ती तुला हवी
जर तू आयुष्यात नसता
तर त्या कुठून जन्मती

हृदयातले प्रेम माझ्या
मनीचे भाव तुझ्या
गुंफुन तयार होते
माझ्या शब्दांची माला

माझ्या शब्दाना आता
तू ओळखीचा झालास
असतो माझ्या मनात
मग ते लेखणीत उतरतात

रहा असाच आयुश्यात
टिपुर चांदन बनून
मग माझ्या शब्द चांदण्या
नाचतील तुला फेर धरून 
स्नेहा ( देवराई ) 

तुझे डोळे....


तुझे डोळे म्हणजे खलखळनारी नदी
भासतात पापण्या नदीचे काठ

तुझे डोळे म्हणजे शांत डोह
वाटत त्यात बुडूनच जाव

तुझे डोळे म्हणजे साकीचा जाम
वाटत तो पिऊन व्हाव बेहोश

तुझे डोळे म्हणजे दोन शिम्पले
उघडले तू तर मोतीच चमकले

तुझे डोळे म्हणजे काळे काळे भोर
उजडतो त्यातूनच रामप्रहार

तुझे डोळे म्हणजे फक्त तरलता
प्रेमाचेच भाव उधळतात

तुझे डोळे म्हणजे बानांचा भाता
तू नजर टाकलिस की समोरचा गार

तुझे डोळे म्हणजे तुझ्या मनाचा आरसा
सुंदर, अप्रतिम तुझ्याचसारखा

तुझे डोळे म्हणजे लोहचुंबक वाटे
तुझ्याकडे पाहील की मी खेचली जाते

तुझे डोळे म्हणजे फक्त तुझेच डोळे
जगात नसणार ईतके सुंदर कोणाचे

स्नेहा {देवराई}

तुझ्या आठवणी....


आठवत मला समुद्रावर बसलेलो
हातात हात घेऊन,डोळ्यात डोळे घालून
पण तो स्पर्श आता शरीर जळत जातो

आठवत मला नेहमी तुझा होकार असायचा
माझ्या प्रत्येक अरेरावीला
पण आता ते शब्द डोळ्यात अश्रू आणतात

आठवत मला चांदण्या रात्री किती
बिलगुन असायचो एकमेकाना
आता त्या चांदण्या मला वाकुल्या दाखवतात

आठवत मला ,माझ्या बोटाना वेड होत
तुझ्या गर्भरेशमी केसांमधून फिरायच
तो रेशमी स्पर्श आता निवडुंग झाला वाटत

आठवत मला सर्व हळवे
प्रेमाचे क्षण तुझ्या बरोबरचे
वाटत त्या क्षणांमध्ये कधीच जिवंत श्वास नव्हता

आठवत मला काहीच नसताना
तू भांडून गेलास कायमचा
वाटत तू लायक नव्हतास प्रेमासाठी खर्या

स्नेहा (देवराई}

खर्या प्रेमाला नाही किंमत..


सर्व वाटा सरल्या
येऊन तुझ्या पाशी
बांधून ठेवले
किती दुख उराशी

आसव ही माझ्याशी
ना बोलती झाली
मी दुखात तरीही
मला उभी करेनाशी झाली

उधळत गेली हा जीव
ज्यांच्यावर ज्यांच्या वर किती
त्यानीच त्याला ठेचून
रक्तबबाळ केले किती

तुलाही नाही उमगली
माझ्या प्रेमाची व्याख्या
खर्या प्रेमाला नाही
किंमत कळले आता

स्नेहा (देवराई )

अश्रू बनून राहशील ना...?


भेटशील मला तू जेव्हा
काय माहीत केव्हा
आवडतेस तू मला
हे तू एकदा बोलशिल ना?

एकदा तरी हातात हात
आणि डोळ्यात डोळे
घालून तू जवळ माझ्या
एक संध्याकाळ बसशिल ना?

मी आणि पान फूल
सर्व पक्षी - बिक्षी
भिजतील या पावसात
तेव्हा तू माझ्या सोबत असशिल ना?

मी असें एकटी एकटी
रात्रीच्या उदास गर्भात
खिडकीतून मग तू हळूच
होऊन चंद्र डोकावशिल ना?

वैशाख वणवा लागला
माझ्या आयुष्याला उभा
उजाड माळरान झाल आयुष्य
मग तू गुलमोहर बनून छाया देशील ना?

मी नसेन कुठेच तुझ्या
आयुश्यात आणि स्वप्नात
तू मग्न असणार पण तुझ्याच विश्वात
पण अश्रू बनून माझ्या डोळ्यात तू राहशील ना??

स्नेहा (देवराई )

नामुमकीन.....


जमाने भर की कशिश दिल मे लिये
आँखो मे आंसू होंगे तुम्हारे लिये

लब्जो पे तुम्हारे ये दिल आ गया
कभी मेरा था अब तुम्हारा हो गया

दिल चाहता है तुम्हारी मुस्कूराहट देखू
वही हसी मेरी जिंदगी मे घोल दू


तनहा नही मै ,न रहुन्गि मै कभी
तुम्हारी यादो के होते ,मै अकेली नही

सिर्फ साथ राहणे का नाम प्यार नही
कभी दूर से आजमा के देखो तो सही

हार जाओगे तुम है मुझे यॅकीन
मुझसे बडा चाहनेवाला मिलना है नामुमकीन


स्नेहा(देवराई)

आक्रोश माझा तुझ्या शब्दांसाठीच.........


रोज रोज मरून उरायच
फक्त तुझ्या आठवणींवर
मी कस काय जगायच?

चांदण्यांची चादर नको
नकोय रातराणीचा अंगरखा
हवा आहे मला फक्त
सहवास तुझ्या उबदार स्पर्शाचा

झाकोळून गेले बघ मी
कठोर तुझ्या रोजच्या वागन्याने
मीच मला दिसत नाही आरशात
आसमांत भरला माझा तू दिलेल्या वेदनेणे

सारख सारख डोळ्यात काय रे.....
कधी ओठांवर पण बघ येऊन
कुठे मुक्काम करायचा ते
तू ठरव मग मला बघून

ना आहे मला कसली खंत,
ना आहे कसली उसंत
तुझ्या मोत्यासारख्या शब्दांची
मी मोहताज फक्त

उधळतॉस शब्द फुले तुझी तू
काही न राखता सर्वांवर
माझ्या साठीही हो ना मग कर्ण
मी ही प्रेम करते तुझ्या शब्दांवर

जपल्या किती मी मनात
हळूवार भावना तुझ्या साठी
नाही का रे ऐकू येत तुला
आक्रोश माझा तुझ्या शब्दांसाठीच

अश्रुंचा ओलावा,शब्दांची आर्तता
मनाची साद की हृदयाची हाक
हे सर्व नाही..मग काय जाणवेल तुला ???
तुझ्या ना झालेली माझी शोकांतिका.......

जाणवेल नक्कीच जाणवेल
माझ्या जिवंत मनाला नाही
पण माझ्या अचेतन शरीराला तरी
तुझ्या पश्चातापाचा स्पर्श होईल...................

स्नेहा (देवराई)

प्राक्तनाची जळ्मटे.............


पिवळा धम्मक गुलमोहर

जमिनिवर पड्ला

जसा पानान्मधुन

भास्करच सान्ड्ला



चाळ्नीच्या जाळीतुन

चन्द्र पाहिलेला

ठिकर्‍या ठिकर्‍या उडलेला

मला मात्र भासलेला



निजुन स्वप्न पहानार्‍यानो

नका येउ देउ स्वप्नाना

चान्द्ण्याचा प्रत्येक कोन

काढेल रक्ताची धार



वडाच्या झाडाला बन्दिस्त...

कोणी?? किती दोरे???

त्या पारमब्यानिच धरावे

बान्धनार्‍यान्चे गळे



रात्रिच्या गर्भात फक्त

घुबडाचे डोळे चकाकती

काजवे समजुन चालले

हे अवसेच्या राती



प्राक्तनाची आयुष्याला

लागली बघा जळ्मटे

हा परत एक चालला

कोळि परत गुरफटायला



स्नेहा (देवराई )

यातनान्चे पन्ख


यातनान्चे देउ का पन्ख माझ्या

बघ दुखात किति दुर उडता येत ते

सतीला आकान्ताने जळताना पाहिल का कधी

बघ तिच्या दुखाचा घट ठेउन मनी



नाचनारीच्या पायातला चाळ होतोस

अपमानाचा आवाज असतो प्रत्येक घुन्गराला



देवदासीच्या नवसाला पुरुन उरता येत?

दासी या शब्दाला भोगनार कोण मग?



अवदसा म्हनुन कपाळाला वगवतोस टिळा

बाल विधवेपेक्षा वाटतो कधी दारचा कुत्रा बरा



तु सौन्दर्याच्या खाणीतला हिरा .....चकाकनारच

पैलु पाडताना किति घण टाळनार मग



बायको होउन बघ ना नवर्‍याची कधी

करपेल स्वपनान्चे इन्द्रधनु त्याच्या नवरेशाही खाली



एकदा एक बलात्कारित स्त्री होशिल..

अपमनाच्या जीवघेण्या कळा उठतील तनामनात



बाईच्या गर्भातला मुलीचा गर्भ होतोस

बघ कसे खरवडुन काढुन तुला बाहेर देतील फेकुन



यातनान्चे घे ना तु माझ्या पन्ख

आणि एक तरी भरारी मारुन ये....................

बघ माझ दुखाच आकाश

आणि अश्रुनी भरलेले ढग...............



स्नेहा (देवराई)

तिचि जबाबदारी?????????????????????/


पुणे तिथे काय उणे

लहानपणापासुन ऐकलय

बरोबरच आहे.....पटलय

सन्तान्च्या वास्तव्याने पावन झालेली

देवदेवतानी युक्त असलेली

शिवाजी महाराजान्ची कर्मभुमी

पेशव्यान्चे वैभव भोगलेली

विद्येच माहेर घर असलेली

आजकालच्या कलाकारानी नटलेली

इन्द्रायणीच्या काठावर वसलेली........

पण म्हणतात ना चान्गल्या गोष्टिला गलबोट लागत...

तस लागल ह्या पुण्यनगरीला...........

बर्‍याच बायका करतात तशी ती नोकरी करणारी

नेहमी जी गाडी येत तीच आली घ्यायला

ती पण बसली आणि गेली..........

जरा वेळाने लक्षात आल तिच्या हा नेहमीचा रस्ता नाही

बराच आरडाओरडा केला तिने..पण गाडीत ८-१० जण होते

ती एकटीच्...काय करनार ती.........

नेल तिला दुरवर..........

आणि सर्वानी मिळुन कुसकरुन दिलि फेकुन तिकडेच लाम्ब..................

( हे सर्व रात्री नाही तर दिवसाच घडल आहे)

पकडले असतील सर्व नराधम

त्याना कोणती शिक्षा करुन तिच नुकसान भरुन येइल...

शरीराच्या जखमा येतील भरुन कदाचित

पण मनाच्या जखमा आयुश्यभर भळभळत राहतील,

कधी खपली धरलीच तर समाज आहे ना खरवडुन कढायला...........

स्नेहा (देवराई)

हिशोब इथेच द्यायचा.............


काहीच नाही जीवनाकडे

तरी आपण मागत राहतो

खोल खोल मडक्यात

उगीच भान्ड खरवडत राहतो



भाबडी आशा मनात ठेवुन

एक एक दिवस ढकलत राहतो

आजच दुख पचवुन उराशी

आशा उशाशी थेवुन झोपतो



प्रारब्ध ,प्राक्तन यान्च्यात

स्वताहाला आपन खेळवत राहतो

नशिबाच्या जाळ्यातच आपणच

अधिकाअधिक गुन्तत जातो



जन्मापासुन मृत्यु पर्यन्त

आपन फक्त प्रवास करतो

हा प्रवास करवला जातो

विध्यात्याने आधीच लिहिलेला असतो



आपल्या नशिबाच्या दुखासाठी

उगाचच दुसर्‍याना जबाबदार धरतो

आपल्या दुखाच निमित्त

विध्यात्यानेच त्याना केलेल असत



जन्माला येवुन प्रत्येक क्षणाचा

हिशोब इथेच द्यायचा असतो

हात -कपाळाची प्रत्येक रेष

इथेच वाचुन जायच असत



स्नेहा {देवराई }

आमचा......आमचे......


आमची सन्स्कृती आमचे बाणे

रात्री उशाला दारुचे पेले



आमची मुल्ये आमची वचने

मिनिटा मिनिटाला धुराची वलये



आमचे भवितव्य आमच्या पिढ्या

बापजाद्यान्ची उडवतात दौलत रात्री गाड्या



आमचा मान आमची शान

बाई दिसली कि नजरेत घाण



आमची चिकाटी भविष्याची हाकाटी

भ्रष्टाचारापाई हे कुत्र्यान्चे तळवे चाटी



आमचे सण आमच्या परम्परा

विचित्र गाणी लावुन फक्त विकृत नाचा



आमच्या रुढी आमच्या पद्धती

बाईला सती करुन गळ्यात हुन्ड्यासाठी दोरी



आमचे अणु करार आमची अणु उर्जा

पण मुलीना मात्र गर्भातच मारा



आमची सुन आमचा मुलगा

म्हातार्‍या आई-बापाना मात्र वृद्धाश्रमात धाडा



आमचा भारत आमचा इन्डिया

बाजारात नेऊन विकायला मांडला


स्नेहा (देवराई)

भेटला एक अनाडी..


कशी रचु मी शब्द्फुले

कसे रन्गवु भाव त्यात

झरा आटला तुझ्या प्रितिचा

कशी भिजु मी त्यात सान्ग??



झरतो झरा प्रेमाचा तुझ्या

तरी तु त्यातला नर्मदेचा गोटा

फक्त शब्दन्ची उधळुन करुन

त्यातले अर्थ जानणार कोन??



गोड गुपितान्ची गुहा ह्रुदय

ठेवल्या जपुन प्रेमाचे क्षण

तु ठेवला दगड गुहेवर

त्यात दिवा लावणार कोन??



भावतरन्ग मनीचे माझ्या

येवुन आदळतात तुझ्यावर

झेलुन त्याना तनामनावर

माझ्या प्रेमात पडनार कोन??



फुटतात अश्रुन्चे बन्ध खुप

डोळ्यासमोर तुझेच रुप

रडताना नाकात शेम्बुड खुप

तुझा रुमाल माझ्या पर्यन्त आणणार कोण??



स्नेहा (देवराई )

त्रासिक मित्र............


मारुन शब्दान्च्या बाणानी

काय मिळवले तु

दिसले ना अश्रु तुला

जरी जखमा खुप



माझे शब्द प्रेमाचे

तुला भासे टोमणे

अबोलीच्या फुलाला का

येउ नये बोलणे



प्रेमाची ओल माझ्या

वाटे तुला फक्त वर्ख

का येतो तुला त्यात

कुचकेपणाचा दर्प



उघड मनाची कवाड

चान्दन्यात भिज शब्दान्च्या

अरे माझे शब्द आहेत ते

नक्षत्र होतील तुझ्या आयुष्यी



प्रेमाची ओल आहे ही

तुझ्या माझ्या मैत्रीतली

रुजेल तिथेच बी

एक सकस नात्याची



पेटाया मैत्रीची ज्योत

लागते तेल प्रेमाचे

मी होते वात जळन्या

तु हो तेल तेवण्याचे...



स्नेहा (देवराई )

मेरी दिवानगी...........


जाओगे तह तक नजर की मेरे
गौहर मिलेन्गे भरभर कर तुम्हे

दिल से मै चाहती हु
तुम्हारी आन्खो मे बस जाउ

अगर नही जगह मेरी वहा
तुम्हारे नजर के जाम तो पि लु

कभी समझ लो मेरी नजर का कहना
दिया तुमने मुझे वहा अश्को का गहना

जरा सम्भालो तुम अपनी नजर को
कयामत ढाती है जब मुझपर पडती है

झाको मेरी आन्खो मे मन्जर तो देखो
जानोगे कितने खन्जर तुमने चलाये दिलपर

जुबा की छोडो बस आखो कि समझ लो
मेरी दिवानगी तुम्हे मिलेगी वहीपर

स्नेहा (देवराई )

निरोप त्याचा...ढगाने आणलेला.......


एक आकाश पहायच
दोघानी एकावेळी
परावर्तीत होतील का
माझे भाव त्यावेळी?

भाव परावर्तीत होताना
ढग होतिल किरमिजी
एक जण उतरुन म्हणेल
मी तिची नजर आणली

बघताना त्या नजरेत तुला
दिसेल सर्व रन्गीबेरन्गी
परत माघारी धाडशील का
तुइझे हास्य त्याच्या सोबती

वाट बघत मी उभी
निरोप तुझा येतो कि नाही
काळा निळा एक ढग
दिसला येताना माझ्यापाशी

मी उभी स्तब्ध्,निश्चल
बसले त्यात रन्ग शोधत
हसुन मला म्हनतो कसा
त्याने दिलाय निरोप तुला

बेचैन मी निरोप काय
तर ढग धोधो बरसला
आणि म्हणाला हा निरोप घे
त्याची ही नजर आहे

ढग बोलला ताकिद त्याने दिली मला
भिजव माझ्या नजरेत तिला
होइल ओलेती ती जेव्हा
इकडे ह्रुदयाला जाणवेल माझ्या

स्नेहा (देवराई )

व्याकुळता ...


हिर्‍याच्या झळाळीने

स्वप्नात माझ्या उतरावे

मनातल्या दिव्याना

माझ्या पेटवुन जावे



वाळलेल्या पानान्चा ढिगारा

साप लपुन बसला

चाहुल तुझ्या पायरवान्ची

सपकन फणा काढला



शब्द भेद माझे तुला

कळतात अर्थ सर्व

पण परतावा असा की

जसे नपुसन्काचे वीर्य



अन्तर असले शरीरात

स्वप्नातला सन्ग उधळतो

स्मरणातला सन्ग स्मरुन

सर्वान्गाला कापत जातो



तुझ्या रन्गात रन्गुन

मीच दिशा हरवली

तुझ्या मनातल्या दवबिन्दुत

स्वप्नान्ची किरणे सान्डली



चन्द्रपाणी पिवून निशा

माझ्या सोबत निजली

माझ्या स्वप्नातल्या तुला

बघायची तिलाही घाई..



स्नेहा (देवराई)

पाण्याविना तडफडनारा मासा .............


अबोला धरु नकोस
चुक नसताना माझी
मनात नकळत आलास
जाणुन बुजुन का करत कोणी?

हा भावनान्चा आलेख
राहिल फक्त माझ्याकडे
कधीच नाही येणार
जमाखर्च तुझ्याकडे

मैत्रीतही प्रेम असतच ना
शिलालेख हा त्याचाच
निखळ,निरपेक्ष्,पारदर्शी
कोणताच मुलामा नसलेला

तुझ मला आवडन
सान्ग यात वावग काय?
कोणावर समरसुन प्रेम करण
हा गुन्हा होतो काय?

केला उघड तुझ्यासमोर
माझ्या मनाचा आरसा
अबोला धरुन करु नको मला
पाण्याविना तडफडनारा मासा

स्नेहा (देवराई )

नियति.........


सावलीने कधी करुणा भाकावी

उजेडालाही मग लाज वाटावी



डोन्गरानी रुसाव्,समुद्रात लपाव

सर्व माशानी मग झाडावर जावुन बसाव



देवुन देवुन पाय तिला पायवाट बनवावी

अन्कुरन्याची निर्मिती वान्झ बनवुन टाकावी



कडेलोट जीवनाचा स्वरानी करावा

मागे एक बेसुर ताल पिच्छा पुरवत रहावा



आपल्याला जे सुलट वाटवाघळाने उलट म्हनाव

इथेच नियतिने खदाखदा हसाव



स्नेहा (देवराई )

माझ आकाश विस्तारतय.................


माझ आकाश विस्तारतय

नाही ना बघवत तुला

झापड लाव मग घोड्यासारखी

आजुबाजुला काही दिसु नये म्हणुन...



थोड मुक्त व्ह्यायच म्हणतेय

तुमच्याच करकचुन बान्धल्या गेलेल्या रुढीमधुन

का नाही???तुझ बाहेरच जग......

माझ्या नजरेच्या टप्प्यात येइल म्हणुन???



चमक तर होतीच्....पण आता

दाखवावी म्हणतेय मीही जगाला

का??उम्बरा का नाही ओलन्डायचा

झाकोळुन जाशील का ढगा आडच्या चन्द्रासारखा?



समजु नको तु मला अबला

दुर्गा.चन्डी,महाकाली होता येत मला

तु ही तुझ्या मनाच क्षितिज विस्तार ना...

की बनवु टाकलेल्या काती पासुन विषाचा प्याला?????



स्नेहा (देवराई)
उन लम्हों को गुस्ताख ना कहो

उसकी यादे समाइ हुई है उसमे

साहील न मेरा बन सका तो क्या

किसी और कश्ती लगा देगा किनारे



दिये खार फिर भी मलाल नही

प्यार का जुनू जो है सवार

मेरे अहसास मे उसके लिये

रहेंगे सदा गुलाब खिलकर



तनहा सही हम महफिल मे चलो

यादों कि रोशनी तो मन मे होगी

उठेगी बात जब मेरे आसुओं की

उसके तज्कीरे के सिवा खत्म ना होगी



स्नेहा (देवराई )

रस्त्यावर होते पुढे वळन आपल्या निरोपाचे...........


ह्या काट्याना उलट उलट फिरवतेय

आणि थांबेल जेव्हा तु कोणाचाच नव्हता तिथे

म्हणजे मग मला तिथुन तुझ्याबरोबर चलता येइल



काल माझ्या बाजुच्या किनार्‍यावर ओहोटी लागली

कदाचित तिच्या किनार्‍याला भरती असेल

भरती -ओहोटी ठरवनारा चंद्र तिकडे होता का?



माझ्या शब्दातुन दिसते हृदय जळताना

आयुष्याच्या त्याच्या वाटेवर प्रकाश रहावा म्हणुन

सोबत आहे बरोबर्.प्रकाशची थोडी उणीव होती



छान विणायला घेतल होत मी नवीन नात

एक रंग माझा,एक रंग तुझा ,पण अपुर्ण राहील

तुझ्या रंगाचा दोरा बाजारात कुठेच मिळत नाहीये



सगळ सगळ रक्तबंबाळ्,तुकडे तुकडे उडालेले

शोधतेय मी कुठेच काही दिसत नाहीये

मग मनात येउन समजल स्वप्नांचेच तुकडे होते उडालेले



हा एक दवबिंदु ओठांवर माझ्या कुठुन आला

घरात मी बंद,घराची दारे -खिडक्या बंद

वर पाहिल तर फुटक्या कौलातुन तुझ्या आठवणी लोंबतायेत



क्षण बरेचसे झेलले निवांत मैत्रीच्या कुशीतले

पण त्याना घर मिळाले पापन्यांच्या अश्रुतले

रस्त्यावर होते पुढे वळन आपल्या निरोपाचे



स्नेहा (देवराई)

फानुस बनकर मिलोगे क्या...........


गुजरे लम्हों की कसम है तुम्हे

पाइ थी तुमने दिवानगी मेरी

कभी बैठ के इतमिनान से

देखो उनकी रवानी कभी



साहील बनाना चाहते थे

प्यार की कश्ती के मेरे

भवर मे छोड मुझको

पलट के भी नही देखा तुमने



तज्कीरा तो आयेगा तेरा

मेरे हर अश्क के साथ

खार दिये है कितने तुमने

प्यार के गुलाब के हाथ



जुनू मेरे प्यार का

महसूस करोगे मेरे लब्जों मे

कभी आइने मे झाको

तुम्हारे पिछे हम नजर आयेंगे



जुस्तजू तो रहेगी सदा

जिंदगी मे तेरे प्यार की

फानुस बनकर मिलोगे क्या

अंधेरी राह पर कभी?



स्नेहा (देवराई )

आयुष्याचे माझ्या कुणी क्षितिज झाकले............


शिंपित गेले चांदणे
सर्व आयुष्य माझे
चांदण्यांच्या प्रकाशातही
चन्द्र धूसर भासे

शब्द गोठतात गळा
अश्रू नयनी बांधले
आयुष्याचे माझ्या
कुणी क्षितिज झाकले

बेबन्द असला मल्हार
तरी श्रावण थबकतो
सूर मारव्याचे लावून
उगा मला झुरवतो

गर्दीत आठवांच्या तुझ्या
मीच गेले हरवून
प्रतिसाद दे एकदाच
जाईन मी मुक्त होऊन


स्नेहा ( देवराई )

आयुष्याचे माझ्या कुणी क्षितिज झाकले............


शिंपित गेले चांदणे
सर्व आयुष्य माझे
चांदण्यांच्या प्रकाशातही
चन्द्र धूसर भासे

शब्द गोठतात गळा
अश्रू नयनी बांधले
आयुष्याचे माझ्या
कुणी क्षितिज झाकले

बेबन्द असला मल्हार
तरी श्रावण थबकतो
सूर मारव्याचे लावून
उगा मला झुरवतो

गर्दीत आठवांच्या तुझ्या
मीच गेले हरवून
प्रतिसाद दे एकदाच
जाईन मी मुक्त होऊन


स्नेहा ( देवराई )

पहाटेने निशब्द व्हावे..............


पाकळ्यानि नये उमलु
कळिला का वाटावे
फुलाची अशी नजरबंदी
पहाटेने निशब्द व्हावे

गंधाळली रातरानी
दवबिन्दुचि ओल शहारे
बेहोश तुझ्या मी बाहूत
चांदण्या देती पहारे

झन्कारतात शब्द तुझे
माझ्या मनाच्या अंगणी
वेडावुन जाते मी
रूप तुझे पाहुनि

फिरते मनावर मोरपिस
विचारांचेच तुझ्या
उमळते आसुसलेपन
खोल ह्रदयि माझ्या

हरवून जा एकदा
श्वासात श्वास तुझे
टिपून घे येऊन
दवबिन्दु ओठांवरचे


स्नेहा ( देवराई )

रेड लाईट एरीया जनातला मनातला..................


रेड लाइट एरीया कळले का?

सान्गते ना मी....त्यात काय...

जिकदे देहाचा व्यापार [ स्त्री च्या ] करनार्‍या बायका राहतात तो भाग....

कशी झली चेहर्‍यावरची रेषा??

वाकडी ना जराशी....वाटलच्...होनारच ती...

अजुन आपन काय करु शकतो........

करन पुर्नवसन्,जोर्णोद्धार्.मनाचा मोठेपणा हे शब्द माहीत नाही आपल्याला त्यान्च्यासाठी....



मजबुरी ,अवहेलना ,फसवेपण

ही मुळ यान्च्या नाशाची

दुर्दैव ,कमनशिब

भर घालते जन्माची



नसताना गुन्हा कोणताही

यावा वातेला उकिरडा

पप्रत्येक वेळी वाटत असेल

आपलाच एक्-एक अवयव जाळावा



गरीबी म्हनुन विकल्या गेलेल्या

नवशनुन सोडल्या गेलेल्या

काही विश्वासघाताने फसलेल्या

तर काही असहाय असलेल्या



कधीच कोणाला वाटात नाही

डोकवाव यान्च्या मनात कधी

चिन्ध्या उडालेल भावविश्व यान्च

शब्दानी तरी लेपाव कधी



गरज भागवुन जानारे

ह्याना गरज म्हनुन तयार करणारे

जन्गली श्वापाद वाटतात सगळी

हेही शब्द वाटतात श्वापदान्चेच अपमान करनारे



जीवघेण्या आजारान्चे

बनत शरीर माहेरघर

झालीच पोर्-बाळ

तर त्यान्चे पाय अजुन खोल

-------------------------------------------------------------------------------------------------

रेड लाइट एरीया माहीत आहे का??

सान्गते....गोरेगाव फिल्मिस्तान स्तुडिओ

चित्रीकरण चाललय्...मल्लिका शेरावत्.राखी सावन्त्,अजुन बर्‍याच...

बरोबरीने ईमरान हाश्मी,फिरोज खान असे मुरलेले कलाकार.....



मल्लिका ,राखी धडे देत आहेत

नवशिक्या मुलिना समजावत आहेत

अर्धे कपडे घालुन यायच कस

अगदी खर वाटेल अस वागायच कस..



पहिला सीन चालु झला रेप चा

अन्गावर दोन कपडे अन हिरो तिच्यावर आडवा

झोम्बाझोम्बी चालली आहे अगदी मस्त

होरोइन विचारतेय सीन झाला का झक्क?



दुसरा सीन झाला चालु किस चा

हिरो-होरौइन तयार अगदी फोर्मात

पेपरला दुसर्‍या दिवशी बातमी

११७ व्या टेकला झाला किस सीन ओक झोकात



येवो कुणी परदेशी कलाकार

त्याना त्या कवटाळनार

सगळीकडे त्याना मुके देवुन

आपाण मुर्ख ह्यान्चे फोतो बघनार



कोणी कोणाला सोडल

कोणी कोणाला पळवल

यातच आपल भारी लक्ष



ह्या भटक भवान्या सर्व

उन्ची राहनीमानाला चटवलेल्या

लाज्-लज्जा सोडुन

आई-वडीलही यान samil

माणसाच्या त्रुटिन्वर प्रेम करण्यात जास्त मजा असते


बघायला गेल तर एकच भेद , नजरेला स्वच्छ दिसणारा...
स्त्री आणि पुरूष....
एक चेहरा सोडल तर बाकी अवयव समान...
पण चेहर्यानुसार व्यक्तिमत्व बदलत जातात....
आणि इथेच खरी गंमत आहे.....
हे व्यक्तिमत्वच आपल्याला भुरळ पाडत असत..
दिसन ही त्यात थोडीफार कामगिरी बजावत, नाही अस नाही,
पण व्यक्तिमत्वाचा वाटा मोठा..........
एखाद्याच व्यक्तिमत्व कोणाला आवडत तर कोणाला आवडत नाही.....
आणि आवडल तरी परिमाण वेगवेगळी लागतात...
एखादा मित्र म्हणून आवडणारा दुसर्या व्यक्तीला प्रेमी महणून आवडेल
तर तिसर्‍याला त्याचा कंटाळा येईल..आणि चवथ्याला अजुन काही वेगळ वाटेल.............असो..
( थोड स्वभावाबद्दल)..............
माणसाचा स्वभाव म्हणाल तर उपजत असतो..
अगदी जवळच्या माणसाकडे तो उघड होतो
तसे प्रत्येकाचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे असतात..
पण हे खायचे दात फक्त जवळची माणसे ओळखून असतात
आपल्या व्यक्तिमत्वाला आपणच उजळू शकतो.
त्यात बाहेरील माहिती, राहणीमान,व्यवहारी जगाचे शिष्टाचार ,समोर माणूस कोण आहे हे पाहून वागणे ई. बार्याच गोष्टी येतात.
पण मूळ स्वाभाव मात्र तोच राहतो........सहसा बदलत नाही.घरात वा जवळच्या व्यक्तीकडे प्रत्येक माणूस आपल्या मूळ स्वभावानुसार वागतो.
व्यक्तिमत्व आणि स्वभाव ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत.तेव्हा एखाद्याच व्यक्तिमत्व आवडल तर मूळ स्वभाव जाणून घेन इष्ट..................
छाप पाडणारी व्यक्तिमत्व , भुरळ पडणारी व्यक्तिमत्व असतात पण त्याला साजेसा स्वभाव असेलच अस नाही. फसगत होण्याची शक्यता जास्त...

तेव्हा कधीही मूळ स्वभावावर प्रेम करणे उत्तम....चांगल्या गोष्टींवर तर माणूस प्रेम करतोच.....
पण माणसाच्या त्रुटिन्वर प्रेम करण्यातही जास्त मजा असते अस मला वाटत.....................
तुमच काय मत आहे??



स्नेहा ( देवराई )

Valentine special.......for valentine...


अंतरंग काळोखाचे
उजेड़ाने शोधावे
गर्भातल्या त्या वेदनेवर
त्याचे किरण पडावे (१)

परावर्तित वेदना तय
दिसतील कुणा कुणा
असतील त्यात बरयाच
तुझ्या खाणा खुणा (२)

भावविश्वात तू तुझ्या
असणार मशगुल
मी फ़क्त भूतकाळ
स्मरणात नसेल बिलकुल( ३ )

म्हणुन तर होवून उजेड
येवू नकोस कधी
तूच तुला बघशील अन
म्हणशील " माझी छाया इथे कशी?(४)

तू नसणार जवळ पण
हीच छाया जपणार मी
विसरु नये मी कधी तुला
म्हणुन मला रोज जिवंत जाळनार ती

स्नेहा ( देवराई)

सगळीकड़े तुझाच सानिध्य का रे मला भासत ?


हि झुलुक वार्याची
गेली स्पर्शुन मला
जाता - जाता कुजबुजली
बोलावले त्याने तुला

रंगित एक फुलपाखरू
हळूच हातावर बसल
म्हणत, घेउन रंग तुझ्यासाठी
त्यानेच मला धाडल

सुर्यफुलाची नजर एकटक
माझ्याकडेच लागली
हा त्याच्याच मिश्किलपणा
फुलाने बाजू मांडली

रातराणीचा गंध हा
रात्र सरून जाईना
मनभर तुझीच मीठी
डोळा लागुन देईना

खिडकितुन चंद्रमा
माझ्या उशाशी डोकावतोय
चांदण्या नजरेच्या तुझ्या
माझ्यावर सांडतोय

हा गजरा मोगर्याचा
मी नाही अजुन माळला
करेल ना एक - एक फुल
माझ्याशी खोडकरपणा

सगळीकड़े तुझाच सानिध्य
का रे मला भासत ?
माझ्या मनी तूच वसलास
म्हणुन मला का अस वाटत ?

स्नेहा ( देवराई )

प्रेमाची ऊब कुठेच नव्हती रे.........


ए , आपण प्रेम करतो ना एकमेकांवर..
मग अस काय बर .....थांब ना थोड़े दिवस
किती दिवस राहिले लग्नाला....मग मी तुझीच आहे.....
हे मन तर कधीच तुझ झाले...हे शरीरही तुझच होइल..
सारखी काय रे घाई तुला...नुसता अंगचटिला येतोस..
फ़क्त हातात हात ..नजरेत नजर घालून किती छान वाटत मला
पण तू ना अगदी खट्याळ आहेस.........
माझ्या हातातला हात सोडवून घेतोस ..आणि मग तो हात कुठे कुठे..........
तुझ्या नजरेत मी माझी नजर मिसळायचा प्रयत्न करत असते
तर तुझी नजर माझ्या ओठांवर ,छातीवर अशी फिरत असते
त्यादिवशी म्हणालास जवळ ये ना आणि मी जवळ आल्यावर ..हे बाघ अजुन तुझ्या दातांचे व्रण आहेत .आणि किती तो धासमुसलेपणा ................
तेव्हा मला क्षनभर वाटल की कदाचित तुला ह्या शरिराच मन कोणीही असेल तरी कदाचित काही फरक नाही पडणार.....फ़क्त तुझ्या शारीरिक गरजेची धग जाणवली............
प्रेमाची ऊब कुठेच नव्हती रे..........

स्नेहा ( देवराई )

तू लांब तुझ्या विरहात मी ...........


दिवस नसताना पावसाचे
का बर थेम्ब बरसले
तू लांब तुझ्या विरहात मी
मेघानिच तुला कळवले

वीजा सुद्धा चमकल्या ना
माझ्या प्रेमाची त्यात शक्ति होती
तू लांब , तुझ्या नजरेआड मी
तुला सांगायची नामी युक्ति होती

नव्हता मृगाचा पाऊस हा जरी
थोडा मातीचा सुगंध आलाच ना
तू लांब , तुझ्या पासून दूर मी
माझ्या श्वासांचा त्यात गंध होता ना

झाले कृष्ण मेघ बरसून मग
तुला इंद्रधनुष्य दिसले का ?
तू लांब , तुझ्या दर्शना वंचित मी
माझ्या स्वप्नांची ती ओंजळ , समजली का ?

त्या अवचित आलेल्या पावसात
झालास ना तू ओलाचिंब ..........
सांग ना मला , तुला काय म्हणाले
ते पावसाचे थेम्ब सर्व..........

स्नेहा ( देवराई )

कफन को जेब सिला दो..........


तुम्हारी खामोशी मेरा मजाक उडाती गई

ऐसे फिसले के कोई दवा काम ना आई



बुनियाद ही झुठी थी सपनों के महल की

जर्र सा झोका आया और नीव हिला दी



फिर भी खडे है जुनु मे तुम्हारे

प्यार नही पर तगाफुल ही सही



नही होगी शायद अहलीयत हमारी

के जगह दो तुम हमे काइनात मे तुम्हारी



मलाल नही है किसी के जफा का

इस शबे- गम का कोई सहर नही



उठने से पहले जनाजा, इक इल्तजा सुन लो हमारी

कफन को जेब सिला दो , रखो तसवीर उसमे तुम्हारी



स्नेहा {देवराई }

सल


मावळतीचे क्षण ते
मिसळले अंधारात
उगवतीचे क्षण
उधळले आसमंतात

पण ती वेळ थिजलेली
डोळ्यात तुझीच वाट
तुझ्या आठवणीत भिजलेली
एक अश्रूंची लाट

वैशाखातला गुलमोहर
फुलवतोय आग मनाची
दुखर्या मनाची अवहेलना
उडते खपली मनाची

एक निश्चिंत श्वास
स्वारस्य तुटले जगण्याचे
तू दंग तुझ्या भाव विश्वात
हृदयात माझ्या सल भूतकाळाचे ........


स्नेहा ( देवराई )

गेम ........


तुझ्या हृदयाला कान लावला
तर ते दुसरीच्याच नावाने बोंबलत होत
आणि मला म्हणतो कसा रोज...
माझ दिल तुझ्याच नावाने धडकत

खिशातल पाकीट जरा उलटसुलट केल
तर माझ्या फोटूचा पत्ताच नाही
आणि ही कोण बया डोकावतेय..
आणि मला म्हणतो तुला बघितल्याशिवाय मला घास जात नही

मोबाईल च्या गॅलरी मध्ये डोकाऊन पाहिलं
एकत्र काढलेले आमचे फोटो सर्व गायब
कोण दुसरी पण मोबाईल चेक करेल??/
आणि म्हणतो मला आपली जोडो लक्षी - नारायण

आय ला ह्याच्या गावात पाय ....
बेन डबल गेम खेळतंय काय ..
पर हम भी किसीसे कम नही
माझा बी गेम बघ आता कसा झक्कास हाय

माझ्या नंबरला I LOVE U टोन सेट
BLUE TOOTH ने आमचे फोटू सेंड
तिसरीचाच फोटू पाकिटात सेट
आता बस बोंबलत ..I M VERY UPSET

स्नेहा ( देवराई  )

Thursday, January 6, 2011

उत्कट-बित्कट होऊ नये, भांडू नये, तंडू नये..
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये

नको कुठला नवा भार, जुनेच गुंते शिल्लक फार..
सूर गाठ-नीर गाठ, राहून द्याव्यात, ओढू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये

असे वाटते बसून घ्यावे, उरले श्वास मोजत रहावे..
जन्मा-बिन्मा आलो त्याचे, पांग सुद्धा फेडू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये

शिंकांसारखे सोपस्कार, मला झालीये गर्दी फार..
असल्या गळक्या जगण्यासाठी, रूमालसुद्धा काढू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये

कुठे कधी रमला जीव, खरंच फार दमला जीव..
वजन, ज्ञान, ओळख, पित्त काही-काही वाढू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये

कसले प्रहर, कसला काळ, मनात कायम संध्याकाळ..
तिच्या कुशीत मांडली कविता, तेवढी मात्र मोडू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये..
पत्रे तिला प्रणयात आम्ही खुप होती धाडली,
धाडली आशी होती की नसतील कोणी धाडली

धाडली मजला तिने ही, काय मी सांगु तीचे
सव॔ ती माझीच होती, एकही नव्हते तीचे

पत्रात त्या जेव्हां तिचे ही पत्र हाती लागले
वाटले जैसे कोणाचे गाल हाती लागले

पत्रात त्या हाय ! तेथे काय ती लिहीते बघा
माकडा आरशात आपुला चेहरा थोडा बघा

साथ॔ता संबोधनाची आजही कळली मला
व्यर्थता या य़ौवनाची तिही आता कळाली मला

नाही तरिही धीर आम्ही सोडीला काही कुठे
ऐसे नव्हे की माकडाला, माकडी नसते कुठे!!!
हृदय फेकले तुझ्या दिशेने
झेलाया तू गेलीस पटकन्‌
गफलत झाली परि क्षणांची
पडता खाली फुटले खळ्‌कन्‌


हृदय फेकले तूही जेंव्हा
सुटले तेही,पडलेही पण
तुटले नाही-फुटले नाही
नाद निघाला केवळ खण्‌कन्‌


गोष्ट येवढी इथेच थांबे
अशा गोष्टींना नसतो नंतर
खळ्‌कन्‌ आणि खण्‌कन्‌ यांतील
कधी कुठे का मिटले अंतर

Wednesday, January 5, 2011

कारण आता तुझ्याशिवाय मी नक्की जगणार आहे

कारण आता तुझ्याशिवाय मी नक्की जगणार आहे
दु:खाला विसरून सुखाला आणणार आहे
आता तुझ्याशिवाय मी नक्की जगणार आहे

मनापासून प्रेम फ़क्त मीच करत होतो
तुला जगता यावे यासाठी फ़क्त मीच मरत होतो
माझ्या प्रेमाची कदर तुला कधीच कळली नाहि
कारण तुझ्या हृदयाची जागा कधीच खाली झाली नाहि
पण मी आनंदी राहू शकतो हेच तुला दिसणार आहे
कारण आता तुझ्याशिवाय मी नक्की जगणार आहे

तुला मी नको फ़क्त पैसा नी आराम हवा होता
तुला मी हेही दिले असते मला फ़क्त जरासा वेळ हवा होता
तुला हे सर्व मिळाले असेल पण मी नाहि मिळणार
कारण प्रेम म्हणजे काय तुला कधीच नाही कळणार
मी किती मजेत आहे हे सर्व जग बघणार आहे
कारण आता तुझ्याशिवाय मी नक्की जगणार आहे, नक्की जगणार आहे

Sunday, January 2, 2011

फुटका पेला (एल्गार)

शेवटी वेदमंत्रांनी अन्याय एवढा केला
मशहूर ज्ञानया झाला....गोठ्यातच जगला हेला


अडवून जरी शब्दांनी भरपूर खुशामत केली
दारात वर्तमानाच्या मी अर्थ उद्याचा नेला!

घासते घरोघर भांडी स्वप्नांची राजकुमारी
वणवणतो पोटासाठी हा राजपुत्र अलबेला

ही कुण्या राजधानीची कापती अजुन खिंडारे?
का कुणी कलंदर येथे गुणगुणत सुळावर गेला?

पुसतात जात हे मुडदे मसणात एकमेकांना
कोणीच विचारत नाही-"माणूस कोणता मेला?"

जर हवे मद्य जगण्याचे....तर हवी धुंद जन्माची
तू विसळ तुझ्या रक्ताने हृदयाचा फुटका पेला!

जानवी (एल्गार)

सांगा कुणीतरी या आकाशखाजव्यांना-
"मातीच मोक्श देई कंगाल नागव्यांना!"

आहे जरी उभा मी निष्पर्ण माळरानी
या स्वप्नपाखरांच्या रोखू कसा थव्यांना?

आली नव्या जगाची आली पहाट आली
आता उन्हात आणू पाळीव काजव्यांना!

येती जरी समोरी सारे नकोनकोसे
मीही नकोनकोसा झालो हव्याहव्यांना

साधाच मी भिकारी, माझी रितीच झोळी
गावात मान त्यांच्या श्रीमंत जोगव्यांना!

प्रत्येक आतड्याचा मी पीळ होत आहे
ते मात्र गाठ देती त्यांच्याच जानव्यांना!

समजावता न आले (रंग माझा वेगळा)

समजावुनी व्यथेला समजावता न आले!
मज दोन आसवांना हुलकावता न आले!

सर एक श्रावणाची आली... निघुन गेली...
माझ्या मुक्या ञुषेला पण बोलता न आले?

सुटला कधी न जो मी मज घातला उखाणा;
माझ्याच उत्तराला मज शोधता न आले!

चुकवुनही कसा हा चुकला न शब्द न माझा
देणे मलाच माझे नाकारता न आले!

लपवीत गीत माझे पळ काढला तरीही
ह्रुदयांतल्या विजांना झिडकारता न आले!

केले जरी खुलासे मीही नकोनकोसे,
जगणे अखरे माझे मज टाळता न आला!

आणखी एक गझल

हा असा चंद्र अशी रात फ़िरायासाठी
तूच नाहीस इथे हात धरायासाठी !

चेहरा तो न इथे, ही न फ़ुलांची वस्ती,
राहिले कोण आता सांग झुरायासाठी !

कालचे तेच फ़िके रंग नकोसे झाले
दे तुझा ओठ नवा रंग भरायासाठी !

आडवी एक तिथे भिंत मनाची आली
दार होतेच कुथे आत शिरायासाठी !

नेहमीचेच जुने घाव कशाला मोजू
ये गडे आज उभा जन्म चिरायासाठी !

- सुरेश भट
हासण्याचा खुळा प्रयास नको
आसवाना उगाच त्रास नको

मॄत्यु जामीन होउनी यावा
जीवनाचा तुरुन्गवास नको
तु दिलेल्या जखमा...........
बर्‍याच रात्री माझ्या इमानी होत्या
ज्या फक्त तुझ्या बाहुत ढळ्लेल्या होत्या

झाले ओठ माझे नक्षत्र एक एक
त्याना स्पर्श झाला तुझ्या ओठान्चा होता

मोगर्‍याच्या झाल्या पहा चान्द्ण्या सर्व
जवळ घेताना मला तु त्याना कुसकरल्या होत्या

केशरी ती किरणे सुर्याची होती
पहाटेला आपल्या मिलनाचा रन्ग होता

उभ्या रात्रीची निळाई भिनत माझ्या गात्रात
तुझा प्रत्येक डन्ख मला बेहोश करत होता

लावतेय रोज उगाळुन तु दिलेल्या जखमा
त्या सुद्धा चन्दनासारख्या सुगन्धी होत्या
आताशा तुझ्या नावाने
माझ दिल नाही धडकत
दिसलास तू समोर
तरी पापणी नाही फडकत

गद्दारीचा लेप लावलेले
तुझे ते शब्द प्रेमळ
उगाच तुझ्या बतावण्या
म्हणे मी चिखलातल कमळ

खर तर तू आता
मनात रुंजीही नाही घालत
आला तुझा फोन, कि घ्यायला
माझा हात नाही उचलत

माझ प्रेम खर होत
नव्हत चहाच्या कपातल वादळ
उगाच मिस यु , लव यु करून
तू मला दाखवलस गाजर

करतोस प्रेम तिच्यावर फक्त
मला उमगल उशिरा
जास्त नाही रे लागल
तशी धडपडायची सवय आहे मला

राग नाही आलाय मला
चुकीला माझ्याच हसतेय
हे डोळ्यातले अश्रू ना ......
खूप हसली ना...म्हणून ते आलेय

पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्यूत व्हावी,

पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्यूत व्हावी,
जीवनापासून माझ्या ह्या मला मुक्ती मिळावी.

वेदनेला अंत नाही अन्‌ कुणाला खंत नाही
गांजणाऱ्या वासनांची बंधने सारी तुटावी.

संपली माझी प्रतीक्षा, गोठली माझी अपेक्षा
कापलेले पंख माझे .... लोचने आता मिटावी.

सोबती काही जिवाचे मात्र यावे न्यावयाला
तारकांच्या मांडवाखाली चिता माझी जळावी.

दूर रानातील माझी पाहुनी साधी समाधी ....
आसवे साऱ्या फुलांची रोज खाली ओघळावी.

कोण मी आहे ? मला ठाऊक नाही नाव माझे !
शेवटी माझ्या धुळीने चौकशी माझी करावी.

हे रिते अस्तित्व, माझे शोध शून्यातील वेडा
माझियामागेच माझी सर्व ही ओझी रहावी !

काय सांगावे तुला मी ? काय मी बोलू तुझ्याशी ?
राख मी झाल्यावरी गीते तुला माझी स्मरावी !
तसे किती काटे रुतले आमुच्या गतीला,
तुझा सूर केवळ होता एक सोबतीला..

अनोळखी बनले अवघे सोबती यशाचे,
दूर दूर झाले सारे सोयरे सुखाचे..
कुणीही न पुसले डोळे हाय त्या घडीला,
तुझा सूर केवळ होता एक सोबतीला..

कसा हाय घरट्यांचा ही उडाला निवारा,
तुझ्या चार चिमण्यांसाठी राहिला ना चारा..
दार दार परके झाले मायबापडीला,
तुझा सूर केवळ होता एक सोबतीला..

मग हळूच आम्हांलाही तुझे पंख आले,
मग हळूच आमुचे डोळे सूर्य-चंद्र झाले..
दिशा दिशा तेवत उठल्या तुझ्या आरतीला,
तुझा सूर केवळ होता एक सोबतीला..

रचना : सुरेश भट
अल्बम : गाणारे झाड़

पापण्यांना भार झाली आसवे,
जाणतीशी....! मौन पाळी आसवे !!

*

काळ-वेळेची नसे यांना क्षिती,
हुंदका जाळून आली आसवे !

*

काळजाला काळजीचे साकडे,
काजळा वाहून काळी आसवे !

*

भूलथापांना अशी गेले बळी,
गोंदली तेव्हाच भाळी आसवे !

*

साथ देते का कुणी जन्मांतरी,
सौख्य-दु:खा नेक साक्षी आसवे !

*


ती म्हणाली काल जेव्हा....श्वास माझा थांबला ना !
मी म्हणालो... सोड बाता, थांबला तो संपला ना !!

*

ती म्हणाली काल जेव्हा....मी तुझी रे, सांग हो ना ?
मी म्हणालो... थांब थोडे, जीव माझा टांगला ना !!

*

ती म्हणाली काल जेव्हा....चंद्र-तारे माळतो ना ?
मी म्हणालो... ना खुळे हा हट्ट वेडा चांगला ना !!

*

ती म्हणाली काल जेव्हा.....प्रेम-रागा आळवू ना,
मी म्हणालो....घाबरोनी...मेघ तो ही पांगला ना !!

*

ती म्हणाली काल जेव्हा.....सातजन्मी मी तुझी ना ?
मी म्हणालो...काय बोलू ? बेत थोडा लांबला ना !!

*

ती म्हणाली काल जेव्हा....घेउ गाडी-बंगला ना,
मी म्हणालो...जा मुली जा...एकटा मी चांगला ना !!

*


मी जेव्हा जाईन तेव्हा, एवढं मात्र जरुर कर...
खोटं-खोटं चालेल बेशक, डोळ्यात थोडं पाणी भर !!

नकोत हिशोब दिल्या-घेतल्याचे,
ओझेही नको आठव-खुणांचे...
डोळे मिटून दोनच क्षण,
झटक तुझ्यातील अपराधीपणं...

मी जेव्हा जाईन तेव्हा, एवढं मात्र जरुर कर...
खोटं-खोटं चालेल बेशक, डोळ्यात थोडं पाणी भर !!

शिकलाच असशील अनुभवातून,
तीच शिदोरी अफ़लातून.....
नको त्याचं-त्या चुका पुन्हा,
झाले-गेले क्षम्य गुन्हा....

मी जेव्हा जाईन तेव्हा, एवढं मात्र जरुर कर...
खोटं-खोटं चालेल बेशक, डोळ्यात थोडं पाणी भर !!

नव्या-नव्याचे चार दिन,
हूरळू नकोस... कर ’प्लॆनिंग’....
कर नविन शिखरे पादाक्रांत,
ध्येय गाठण्या ना पडेल भ्रांत

मी जेव्हा जाईन तेव्हा, एवढं मात्र जरुर कर...
खोटं-खोटं चालेल बेशक, डोळ्यात थोडं पाणी भर !!

मेघ तो ही पाघळाया लागला,
सारखा मागे वळाया लागला !

*

आग ऎशी पावसा ती लागली ,
तोल त्याचाही ढळाया लागला !

*

चिंब ओली यॊंवना तू देखणी ,
धीर त्याचा का चळाया लागला ?

*

गाठ्शी तो पाहुनी तू एकटी ,
डाव त्याचा तो फ़ळाया लागला !

*

दामिनी तू चंचले गे हे प्रिये ,
खेळ प्रेमाचा कळाया लागला !

*

नेत्रभेटी गुंफ़ता तारांगणे ,
श्वास श्वासाला छळाया लागला !
जाळणा-य़ा जाणिवांना आज मी जाळीत गेले !
जिंकण्याचे कायदे ते हाय मी पाळीत गेले !

*

झिंगलेल्य़ा मॆफ़िलींचे दु:ख मी कोळून प्याले,
साजणा रे मी सुखाला चाव-या ढाळीत गेले !

*

पेटल्या त्या ग्रीष्मदाही शिंपुनी प्रेमास न्हाले,
चांदण्यांचे कोष केशी रे सख्या माळीत गेले !

*

प्राक्तनाने फ़ॆसल्याशी गाठ ऎशी पाडलेली,
फ़ास मोहांचे झणीरे मी असे टाळीत गेले !

*

भोगिलेल्या त्या व्यथांची कात ती टाकून झाली,
वाटले जे-जे उणे ते-ते तसे गाळीत गेले !
कोण माझे कोण वॆरी काळजी जाळीत होती ,
सावलीही ना ठरे जी वायदे पाळीत होती !

*

हाय माझ्या आंतरी ती वेदना पोळीत होती,
चांदण्यांचा दाह तू ही रोज का माळीत होती ?

*

ताल त्यांच्या ढोलकीचे तू अशी बेताल होती,
सूर माझे नेमके का ऎकणे गाळीत होती ?

*

वाचले ते फ़ेकले हा खेळ तू माहीर होती,
काव्य माझ्या जीवनीचे का प्रिये चाळीत होती ?

*

चांदणी ’ती’ चांदण्यांच्या आज का टोळीत होती ,
श्वास माझ्या सोबतीचे का सखे टाळीत होती ?

*

पाठ दावी ऎनवेळी काजव्य़ांची चाल होती ,
टोचमारी गीध्द तीही नेमक्या आळीत होती !

*

साथ होती दो घडीची वाट दूजी थेट होती ,
बोललो नाही कधी मी मॊन तू पाळीत होती !

*

झिंगलेल्या श्वापदांची फ़ॊज ती वेढीत होती ,
रात वेडी त्या तिथेही आसवे ढाळीत होती !
अवचित कधीतरी तू असे समोर यावे
नसताना मनातही तू असे समोर यावे


पाहता पाहता चित्र तुझे सजीव व्हावे
चित्रातुन उतरूनी तू असे समोर यावे


म्हणतात लोक मला वेड आहे लागले
सांगावया खरे अता तू असे समोर यावे

चित्रातले का असेना, पाहूनी हास्य तुझे
वाटते हसत दुखां:च्या तसे समोर जावे
दान माझ्या भग्न आयुष्याचे देऊन गेली ती
दु:खही उपकार केल्यासारखे देऊन गेली ती

काहीच नव्हते का देण्यासारखे आणखी मला
भेट आंधळ्यास कशाला आरसे देऊन गेली ती

पायदळी तुडवून चेहरा मोहरा शेवटी माझा
मुखवटे लावण्या मला आपले देऊन गेली ती

अतोनात जखमा काळजास आणि वरती पुन्हा
"आकाश" ओंजळीत रित्या मोगरे देऊन गेली ती
म्हणविती मजला आपले हजारो
फसविती मला सापळे हजारो

स्वत:स विकूनी बाजारी ते पहा
शोधात माझ्या चालले हजारो

सोडले मी घाबरणे वादळाला
ह्रुदयात माझ्या वादळे हजारो

मेलो तरीही भूक तशीच राहीली
शिवले पिंडाला कावळे हजारो

सांगू कसे मी...

सांगू कसे मी तुझे अंतरंग आहे
शांत पाण्यावरी अन तरंग आहे

भिजल्या देहाने आलीस मिठीत तू
आज कसे पेटले अंग अंग आहे

आरशात पाहू नकोस श्रृंगार तू
तुला पाहण्यात आरसा दंग आहे

उचलून मला चार खांदे निघाले
जीव गेला तरी तुझ्यात दंग आहे.