Sunday, January 2, 2011

जाळणा-य़ा जाणिवांना आज मी जाळीत गेले !
जिंकण्याचे कायदे ते हाय मी पाळीत गेले !

*

झिंगलेल्य़ा मॆफ़िलींचे दु:ख मी कोळून प्याले,
साजणा रे मी सुखाला चाव-या ढाळीत गेले !

*

पेटल्या त्या ग्रीष्मदाही शिंपुनी प्रेमास न्हाले,
चांदण्यांचे कोष केशी रे सख्या माळीत गेले !

*

प्राक्तनाने फ़ॆसल्याशी गाठ ऎशी पाडलेली,
फ़ास मोहांचे झणीरे मी असे टाळीत गेले !

*

भोगिलेल्या त्या व्यथांची कात ती टाकून झाली,
वाटले जे-जे उणे ते-ते तसे गाळीत गेले !

No comments:

Post a Comment