Saturday, January 8, 2011

तू लांब तुझ्या विरहात मी ...........


दिवस नसताना पावसाचे
का बर थेम्ब बरसले
तू लांब तुझ्या विरहात मी
मेघानिच तुला कळवले

वीजा सुद्धा चमकल्या ना
माझ्या प्रेमाची त्यात शक्ति होती
तू लांब , तुझ्या नजरेआड मी
तुला सांगायची नामी युक्ति होती

नव्हता मृगाचा पाऊस हा जरी
थोडा मातीचा सुगंध आलाच ना
तू लांब , तुझ्या पासून दूर मी
माझ्या श्वासांचा त्यात गंध होता ना

झाले कृष्ण मेघ बरसून मग
तुला इंद्रधनुष्य दिसले का ?
तू लांब , तुझ्या दर्शना वंचित मी
माझ्या स्वप्नांची ती ओंजळ , समजली का ?

त्या अवचित आलेल्या पावसात
झालास ना तू ओलाचिंब ..........
सांग ना मला , तुला काय म्हणाले
ते पावसाचे थेम्ब सर्व..........

स्नेहा ( देवराई )

No comments:

Post a Comment