Sunday, January 2, 2011

कोण माझे कोण वॆरी काळजी जाळीत होती ,
सावलीही ना ठरे जी वायदे पाळीत होती !

*

हाय माझ्या आंतरी ती वेदना पोळीत होती,
चांदण्यांचा दाह तू ही रोज का माळीत होती ?

*

ताल त्यांच्या ढोलकीचे तू अशी बेताल होती,
सूर माझे नेमके का ऎकणे गाळीत होती ?

*

वाचले ते फ़ेकले हा खेळ तू माहीर होती,
काव्य माझ्या जीवनीचे का प्रिये चाळीत होती ?

*

चांदणी ’ती’ चांदण्यांच्या आज का टोळीत होती ,
श्वास माझ्या सोबतीचे का सखे टाळीत होती ?

*

पाठ दावी ऎनवेळी काजव्य़ांची चाल होती ,
टोचमारी गीध्द तीही नेमक्या आळीत होती !

*

साथ होती दो घडीची वाट दूजी थेट होती ,
बोललो नाही कधी मी मॊन तू पाळीत होती !

*

झिंगलेल्या श्वापदांची फ़ॊज ती वेढीत होती ,
रात वेडी त्या तिथेही आसवे ढाळीत होती !

No comments:

Post a Comment