skip to main |
skip to sidebar
मी जेव्हा जाईन तेव्हा, एवढं मात्र जरुर कर...
खोटं-खोटं चालेल बेशक, डोळ्यात थोडं पाणी भर !!
नकोत हिशोब दिल्या-घेतल्याचे,
ओझेही नको आठव-खुणांचे...
डोळे मिटून दोनच क्षण,
झटक तुझ्यातील अपराधीपणं...
मी जेव्हा जाईन तेव्हा, एवढं मात्र जरुर कर...
खोटं-खोटं चालेल बेशक, डोळ्यात थोडं पाणी भर !!
शिकलाच असशील अनुभवातून,
तीच शिदोरी अफ़लातून.....
नको त्याचं-त्या चुका पुन्हा,
झाले-गेले क्षम्य गुन्हा....
मी जेव्हा जाईन तेव्हा, एवढं मात्र जरुर कर...
खोटं-खोटं चालेल बेशक, डोळ्यात थोडं पाणी भर !!
नव्या-नव्याचे चार दिन,
हूरळू नकोस... कर ’प्लॆनिंग’....
कर नविन शिखरे पादाक्रांत,
ध्येय गाठण्या ना पडेल भ्रांत
मी जेव्हा जाईन तेव्हा, एवढं मात्र जरुर कर...
खोटं-खोटं चालेल बेशक, डोळ्यात थोडं पाणी भर !!
No comments:
Post a Comment