Tuesday, January 25, 2011

तसे किती काटे रुतले - गाणारे झाड़


तसे किती काटे रुतले आमुच्या गतीला,
तुझा सूर केवळ होता एक सोबतीला..

अनोळखी बनले अवघे सोबती यशाचे,
दूर दूर झाले सारे सोयरे सुखाचे..
कुणीही न पुसले डोळे हाय त्या घडीला,
तुझा सूर केवळ होता एक सोबतीला..

कसा हाय घरट्यांचा ही उडाला निवारा,
तुझ्या चार चिमण्यांसाठी राहिला ना चारा..
दार दार परके झाले मायबापडीला,
तुझा सूर केवळ होता एक सोबतीला..

मग हळूच आम्हांलाही तुझे पंख आले,
मग हळूच आमुचे डोळे सूर्य-चंद्र झाले..
दिशा दिशा तेवत उठल्या तुझ्या आरतीला,
तुझा सूर केवळ होता एक सोबतीला..

रचना : सुरेश भट
अल्बम : गाणारे झाड़

No comments:

Post a Comment