तु दिलेल्या जखमा...........
बर्याच रात्री माझ्या इमानी होत्या
ज्या फक्त तुझ्या बाहुत ढळ्लेल्या होत्या
झाले ओठ माझे नक्षत्र एक एक
त्याना स्पर्श झाला तुझ्या ओठान्चा होता
मोगर्याच्या झाल्या पहा चान्द्ण्या सर्व
जवळ घेताना मला तु त्याना कुसकरल्या होत्या
केशरी ती किरणे सुर्याची होती
पहाटेला आपल्या मिलनाचा रन्ग होता
उभ्या रात्रीची निळाई भिनत माझ्या गात्रात
तुझा प्रत्येक डन्ख मला बेहोश करत होता
लावतेय रोज उगाळुन तु दिलेल्या जखमा
त्या सुद्धा चन्दनासारख्या सुगन्धी होत्या
Sunday, January 2, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment