Monday, December 26, 2011

प्यासलेल्या पाकळ्या या......


ठेव जपुनी जीव माझा आणलेल्या मोगर्‍याला
आजच्या वेड्या क्षणाला राखलेल्या मोगर्‍याला

रे सख्या लेवून आले साज कंकण कोर भाळी
घे जरा बाहूत तुझिया भाळलेल्या मोगर्‍याला

वाट झाली गंधवेडी हरवली ती साथ माझ्या
परतलो घेऊन सजणे माळलेल्या मोगर्‍याला

काय बोलू शब्द नुरले धुंद झाले कैफ चढला
स्पर्श रे झाला तुझा तो भारलेल्या मोगर्‍याला

प्यासलेल्या पाकळ्या या आज गे माझ्या उशाला
उंबरा घेईल का या मातलेल्या मोगर्‍याला

बेहेरे नेक्टर

No comments:

Post a Comment