Monday, December 26, 2011

आकाश तारकांनी.....

आकाश तारकांनी सजवून रात गेली
बंधात साजणाच्या भिजवून रात गेली

कळले मला कसे ना हळुवार ज्योत झाली
उडवून होश माझा बहकून रात गेली

आता नवीनव्याने जनलाज सोडली ती
सखया तुझ्या उशाला हरवून रात गेली

माझे गुपित तुजला कळले प्रिया कसे रे
मी बोलले न काही फसवून रात गेली

निजल्या जगास आता उठवायचे कशाला
नाही सरावयाचे ठरवून रात गेली

बेहेरे मकरंद

No comments:

Post a Comment