असा मी कसा मी तुम्हा सांगतो मी
रकान्यात बद्नाम ही गाजतो मी
जुगारात मटक्यात माझाच एक्का
तसे राजनीतीतही खेळतो मी
मला वर्ज दारू न बाई कधी ही
तरी साधु संतासवे राहतो मी
जगाचेच होवो किती काय वांदे
कराया भले आपले पाजतो मी
विरोध्यास केले मनानेच जवळी
वरातीत त्यांच्या "असा" नाचतो मी
गुन्हेगार आहे जसा आज मोठा
तुरुंगात जातो सजा भोगतो मी
किती ही असू देत काळेच धंदे
सफेदीस देहावरी घालतो मी
बेहेरे मकरंद
No comments:
Post a Comment