Thursday, December 23, 2010
दाद
गेलेल्या दिवसांची याद नको!
तो फसव्या स्वप्नांचा नाद नको!
का घालू जगण्याशी व्यर्थ वाद?
मज याही वादाशी वाद नको!
मी उन्हात वणवणेन बेवारस...
मज कुठल्या छायेची साद नको!
मी तुला न प्रश्न 'तो' विचारणार...
उत्तरास मीही मोताद नको!
हा हिशेब दु:खांचा... जुलमांचा
कोणीही यामधून बाद नको!
मी मनात सारे तुज ऐकवीन...
ही आता शब्दांची ब्याद नको!
मी बघतो तुमचे डोळे लबाड -
मज तुमच्या कपटांची दाद नको!
- सुरेश भट
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment